मुखपृष्ठाविषयी : ऑक्टोबर २०२४
या वेळचे मुखपृष्ठ कलाकार आहेत पुन्हा एकदा दत्तात्रेय फडके. यापूर्वी त्यांच्या कलेचा आविष्कार आपण नोव्हेंबर २०२३ च्या मुखपृष्ठाच्या स्वरूपात पाहिला आहे. व्यवसायाने ते शरीरविकृतिशास्त्रज्ञ (पॅथॉलॉजिस्ट) आहेत. सूक्ष्मदर्शी यंत्राखाली वेगवेगळे आकार पाहणे, त्यांच्यातील रंगसंगती पाहणे व त्यातून निदान करणे हे या शास्त्राचे वैशिष्ट्य आहे. फडक्यांची नजर सूक्ष्मदर्शी यंत्रातून बाहेर आली आणि आपला परिसर न्याहाळताना त्यातील वेगवेगळे आकार आणि रंगसंगती यांतही रमून गेली. त्यातून एक ‘कोलाज आर्टिस्ट’ अर्थात तुकड्यांतून सौंदर्य निर्माण करणारा कलाकार जन्माला आला. कोलाज शब्दाचे मूळ फ्रेंच शब्द ‘collér’ हे आहे. याचा अर्थ चिकटवणे असा होतो.
या वेळची त्यांची कलाकृती आहे : ‘Celebration’ A fabric collage on canvas.
–संपादक
