कविता : विनाशक काली
झणझणा झोंबरा वारा थरथरते अंबर सारे चराचर कापती धारा जग गिळले अंधकारे || गडगडा गरजती मेघ दिक्काल चिरडण्या येती कडकडा कोसळे लोळ भयकंपित सारी सृष्टी || उसळते रक्तिम पाणी वेढते वाढत्या वेगे स्थिर जे उच्च ठिकाणी दशदिशा फेकले गेले || जल निर्मल जीवनदायी रसरसती, फुलती वेली स्वमग्न कृद्ध तांडवी बनतसे विनाशक काली || चिंब भिजून वर्षावात मी होतो-नव्हतो झालो माते निश्चिंत मनाने तव कुशीत झेपावलो … Continue reading कविता : विनाशक काली
