ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यूट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी वेगवेगळ्या मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे. यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी…
मराठी कादंबरीची जुनी परिमाणे बदलून टाकणारी आणि अत्यंत गाजलेली ‘कोसला’ ही कादंबरी नेमाडेंनी वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी लिहिली. त्यातील अनुभवाचा सच्चेपणा आणि अभिव्यक्तीचा परखडपणा यांमुळे ही कादंबरी तरुण पिढीला अधिकच भावली. आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही बाबतींत परंपरेची चौकट मोडून टाकणार्या या कादंबरीने मराठी साहित्यात क्रांती कशी घडवून आणली ते पाहू या ग्रंथयात्रेच्या या विशेष भागात. प्रत्यक्ष भालचंद्र नेमाडे यांच्याकडून ऐकू या त्यांचे अनुभव.
