नोव्हेंबर २०२४

मुखपृष्ठाविषयी : नोव्हेंबर २०२४ 

या वेळच्या मुखपृष्ठ कलाकार आहेत  मेधा चोबे.  त्यांच्या  या सॉफ्ट ऑइल पेस्टल माध्यमातील  निसर्गचित्रात समोरील दृश्याची तंतोतंत नक्कल न करता, ते इंप्रेशनिझम शैलीत साकारलेले दिसते. चित्रातील प्रतिमांच्या बाह्यरेषा धूसर ठेवल्यामुळे चित्रात वेगळीच कलाजाणीव निर्माण झाली आहे. चित्रातील मानवी आकृती हा आकर्षणबिंदू मानून चित्रात पायर्‍या,  कठडा, लालसर फुलझाडांचा  ताटवा इत्यादींची मांडणी… Continue reading मुखपृष्ठाविषयी : नोव्हेंबर २०२४ 

संपादकीय : मेहमान नवाजी

ज्येष्ठ मार्गदर्शक भानू काळे यांच्याबरोबर नुकताच हैदराबादला जायचा योग आला. हैदराबादचे नाव ऐकले की सर्वात प्रथम आठवतो तो हैदराबादचा निजाम आणि लगेच आठवतात चंद्राबाबू नायडू आणि त्यांनी निर्माण केलेले सायबराबाद. या दोन टोकांच्या मध्ये हैदराबादने कसा समतोल साधला आहे आणि आंध्र प्रदेश ते तेलंगण ही वाटचाल कशी झाली आहे हा … Continue reading संपादकीय : मेहमान नवाजी

रंग याचा वेगळा

  १६  ऑक्टोबर रोजी दिल्लीतील एका कार्यक्रमात माजी विदेश सेवा अधिकारी व ख्यातनाम साहित्यिक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना पहिला सी. डी. देशमुख पुरस्कार देण्यात आला.  ९८ व्या नियोजित मराठी साहित्य संमेलनाचे सारथ्य करणाऱ्या ‘सरहद’ या संस्थेच्या वतीने या वर्षापासून हा पुरस्कार देण्यात येणार आहे.  या पुरस्कारासाठी अनुरूप अशा अनेक व्यक्तींमध्ये मुळेसर… Continue reading रंग याचा वेगळा

तमिळनाडू : परंपरा आणि आधुनिकता  

हल्ली बऱ्याच मोठ्या प्रमाणावर  मराठी माणसे परदेशी जात असतात.  प्रवासी कंपन्यांच्या मोठमोठ्या जाहिरातींवरून ते लगेचच लक्षात येते. ते स्वागतार्हच आहे; पण आपला मायदेश तरी त्यांतील किती जणांनी डोळसपणे बघितला असतो? ती उणीव लक्षात घेऊन ‘अंतर्नाद’कार भानू काळे सध्या भारतातील वेगवेगळ्या प्रांतांत प्रवास करत आहेत.  त्यांतील तमिळनाडूप्रवासावर आधारित तीन  लेख आम्ही मागच्या अंकांत… Continue reading तमिळनाडू : परंपरा आणि आधुनिकता  

समर्थ देशातील मार्जार

माझा मुलगा आणि सूनबाई न्यूयॉर्कमधील ब्रूकलीन भागात राहतात.  त्यांच्या परसदारी अचानक एक काळ्या मांजराचे छोटे पिल्लू आले.  माझी सून आत्यंतिक प्राणिमित्र आहे.  तिने पाहिले की हे पिल्लू थोडेसे आजारी वाटते आहे आणि डोळ्यांवर आणि कानामागे जखमा झालेल्या आहेत.  त्या पिलाची दया येऊन तिने त्याला जवळच्या जनावरांच्या दवाखान्यात नेले आणि पुढे… Continue reading समर्थ देशातील मार्जार

साहित्य कोडे

कथा, कादंबर्‍या, व्यक्तिचित्रण, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेखन, पत्रकारिता अशा  विविध साहित्यिक आघाड्यांवर आपल्या तरलतेचा अमीट ठसा उमटवणारे जयवंत दळवी यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांच्या काही साहित्यकृती अंताक्षरीत गुंफून कोडे घातले आहे अंतर्नादच्या वाचकवृंदाला!  खाली वेगवेगळे गट दिले आहेत. ज्या अक्षराने आधीच्या साहित्यकृतीचा  शेवट होतो त्याच अक्षराने पुढच्या साहित्यकृतीची सुरुवात होते. … Continue reading साहित्य कोडे

प्रतिसाद – ऑक्टोबर २०२४

प्रश्नोपनिषद : ऑक्टोबर २०२४ मंडळी,   आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.   या वेळच्या प्रश्नाची थोडीशी पार्श्वभूमी अशी : सध्या जग दोन युद्धांच्या गर्तेत सापडले आहे.  युक्रेन आणि गाझा येथे जे काही चालले आहे ते आपण हताशपणे पाहण्याशिवाय काही करू शकत… Continue reading प्रतिसाद – ऑक्टोबर २०२४

संत,पंत,तंत काव्यविषयक लेखमाला(१२):कवी विठ्ठल भाग २ — ‘रसास्वाद’

न हि रसादृते कश्चिदर्थः प्रवर्तते  रसाशिवाय कलेचं कोणतंही कार्य सिद्ध होत नाही.  रसिकतेने आस्वाद घेणाऱ्या जिभेखेरीज आणखी एक रसेंद्रिय म्हणजे मन. रसाळ लेखनाचा आस्वाद घ्यायला मन आसुसलेले असतं. हा  रस म्हणजे नक्की काय? खरंतर या प्रवाही शब्दाचा अर्थ चिमटीत पकडता येत नाही.  भरत म्हणतो  जसा अन्नरस तसा नाट्यरस! अन्नाची चव… Continue reading संत,पंत,तंत काव्यविषयक लेखमाला(१२):कवी विठ्ठल भाग २ — ‘रसास्वाद’

प्रश्नोपनिषद :नोव्हेंबर   २०२४

मंडळी,   आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.   या वेळच्या प्रश्नाची थोडीशी पार्श्वभूमी अशी : ‘समाजस्वास्थ्य’कार रघुनाथराव धोंडोपंत उर्फ र. धों. उर्फ अप्पासाहेब कर्वे हे महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे ज्येष्ठ चिरंजीव. भारतातील ‘संतती नियमन’ चळवळीचे उद्गाते हे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे एक… Continue reading प्रश्नोपनिषद :नोव्हेंबर   २०२४

पुनर्भेट नॅशनल पार्कची १२ : निसर्गातील जीवनसाखळी

 १.१०.२०२४           ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या  आठवड्यात  उद्यानात वन्यजीव सप्ताहाची धामधूम सुरू होती. पाऊस नुकताच थांबला होता परंतु सर्वत्र दमट हवामान होतं. ही हवा बुरशीच्या वाढीला एकदम योग्य. या वर्षी या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी बुरशीची ओळख करून देणाऱ्या तज्ज्ञ उद्यानात आल्या होत्या. मलाही या विषयात रस असल्याने मी ‘बुरशीची ओळख’ या पदयात्रेत… Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची १२ : निसर्गातील जीवनसाखळी

समुद्रमंथन

   अलीकडे उजव्या गुडघ्याचे दुखणे खूप वाढले आहे. चालणे कठीण  झाले. पायरी चढणे उतरणे सहज जमेची ना. उठता बसता ‘स्स्, हाय, आई गं’ चा  जप सुरू झाला. वयाने  आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली होती. सत्तरी ओलांडल्यावर शरीर झिजणारच की!     ओघानेच सर्व आले  – डॉक्टर, रक्ततपासणी, एक्सरे… रोज उठून  एखादी लॅब नाहीतर… Continue reading समुद्रमंथन

रद्दीतील रत्ने : अथांग भारतीय मनाचा रंजक धांडोळा 

  दिनांक २४ सप्टेंबर २०११ या ‘लोकसत्ता’ वर्तमानपत्राच्या पुरवणीमधील ‘ग्रंथविश्व’या सदरात वरील शीर्षक असलेल्या प्रशांत दीक्षित लिखित  लेखात ‘द इसेन्शियल सुधीर कक्कर’ या पुस्तकाचे परीक्षण आले होते. ते परीक्षण वाचल्यावर हे पुस्तक वाचले पाहिजे असे वाटल्यावरून मी ते परीक्षण कापून ठेवले. या परीक्षणाविषयी मी आपल्याला सांगणार आहेच परंतु आज हे परीक्षण… Continue reading रद्दीतील रत्ने : अथांग भारतीय मनाचा रंजक धांडोळा 

एक पिल्लू, बारा अंडी

   एका पिल्लासमोर  त्याच्याइतकीच निरागस दिसणारी बारा अंडी सुबकपणे एग कार्टनमध्ये ठेवली होती. पिल्लू माणसाचं होतं, अंडी कोंबडीची होती. पिल्लानं प्रथम काही वेळ ह्या नवीन खेळण्याकडे पाहिलं; नंतर आपल्या छोट्या बोटांनी त्यांना चाचपून बघितलं आणि ग्रीक तत्त्ववेत्त्याच्या अभिनिवेशानं एक अंडं जमिनीवर टाकलं. त्याचा आवाज, त्याचं फुटणं, त्यातला बलक जमिनीवर पसरणं ह्या… Continue reading एक पिल्लू, बारा अंडी

संवाद नव्या पिढीशी

पुण्यातील महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेचे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र उर्फ अप्पासाहेब वझे(पु.रा.वझे) यांचे १ ऑगस्ट १९६२ रोजी निधन झाले.  त्यांच्या स्मरणार्थ इ.स.१९६३पासून या संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा चालू केल्या आणि त्या स्पर्धांमधून विजयी होणाऱ्या संघाच्या कॉलेजला पुरस्कार म्हणून, पुरुषोत्तम करंडक देण्यास सुरुवात केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असल्याने एक प्रकारे नाट्यसृष्टीचे भविष्य… Continue reading संवाद नव्या पिढीशी

जगप्रसिद्ध  हॅनोव्हर प्रदर्शनास भेट 

द्वितीय महायुद्धाच्या विध्वंसक परिणामांनंतर जर्मनी व जपान या दोन्ही देशांची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. त्यांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली होती, संरचना नष्ट झाल्या होत्या आणि त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली  होती. या परिस्थितीतून उभारी घेऊन या दोन्ही देशांनी केलेले पुनरुत्थान हे आधुनिक इतिहासातला  एक महत्त्वाचा  अध्याय आहे.जर्मनीने नवीन तंत्रज्ञानावर भर दिला… Continue reading जगप्रसिद्ध  हॅनोव्हर प्रदर्शनास भेट 

ग्रंथयात्रा – एक प्रवास १०

ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी  वेगवेगळ्या  मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे.  यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी… ‘आठवणींचे पक्षी’ हे दलित साहित्यातील एक महत्त्वाचे आत्मकथन म्हणून ओळखले जाते. समाजात खोलवर रुजलेल्या अत्यंत घातक अशा… Continue reading ग्रंथयात्रा – एक प्रवास १०

अभिवाचन भाग ९

ग्रंथाली प्रकाशित ‘मोरपिसं’ या अनुराधा गानू लिखित ललित लेखांच्या अभिवाचनाची शृंखला आपण  सुरू केली आहे.   लेखिकेचा परिचय…  १९७८ सालापासून अमेरिकेत वास्तव्य होतं. टॅक्स आणि अकाउंटिंगचा स्वतःचा व्यवसाय. लॉस एंजेलिसच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्यानं सक्रिय सहभाग. वाचन, लेखन, नाट्य, अभिनय यांची आवड.  स्थानिक संगीतकार गोपाळ मराठे यांनी संगीतबद्ध केलेल्या व श्रीधर… Continue reading अभिवाचन भाग ९

मराठी भाषेच्या संवर्धनासंबंधी –

आव्हाने,जबाबदारी…  मराठी भाषेला निवडणुकीचे निमित्त साधून का होई ना,अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अत्यंत आनंदाची, अभिमानाची बाब आहे. मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी हा संकल्पपूर्तीचे समाधान देणारा क्षण आहे. यासाठी ज्या साहित्यिकांनी, विचारवंतांनी गेली दहा वर्षे प्रयत्न केले त्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानायला हवेत. अभिजात दर्जा मिळाल्याने केंद्र सरकारकडून जी काही… Continue reading मराठी भाषेच्या संवर्धनासंबंधी –

कृत्रिम बुद्धिमत्ता = एक अवयव

आर्टिफिशियल इंटलिजन्स ए आय = कृत्रिम बुद्धिमत्ता = एक अवयव  अगदी आदिम काळापासून माणूस नवनवीन शोध लावत आला आहे – दगडांच्या हत्याराचा, चाकाचा, आगीचा, शोध यांपासून चंद्रावर जाणाऱ्या रॉकेटचा शोध वगैरे. ही सगळी यंत्रे, उपकरणे, आयुधे माणसाने त्याच्यासाठी तयार केलेले नवे अवयव आहेत. स्वयंपाकघरात मिक्सर मोडला तर गृहिणी म्हणते, ‘आज… Continue reading कृत्रिम बुद्धिमत्ता = एक अवयव

कविता – काहीच कळत नाही

ऐकू येतात हुंदके तडा गेलेल्या भिंतीचे ओघळणारे अश्रू सुरकुतलेल्या कांतीचे आहेच कुठे जमीन पायाखाली भेगा पडायला,सारवायला तुम्ही तर चालता गुळगुळीत फरशीवर पडायला घसरायला! भिंतीच्या कोनाड्यात कडी कुलूप नसलेल्या कपाटात साचलाय निरुपयोगी कचरा भिंतीवर लटकलेल्या तसबिरी घरून निघताना नमस्कार करण्यापुरत्या काही ब्लॅक अँड व्हाइट अल्बम जपून ठेवलेले रंगीबेरंगी फोटो जुन्या डायरीतल्या… Continue reading कविता – काहीच कळत नाही

चित्रकाराचे भूत

   पाचगणी हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शैक्षणिक केन्द्र आहे; पण आज जी पाचगणीची खरी प्रगती  दिसत आहे ती खूप हळूहळू झाली आहे. उदा. : पाण्याची सोय. ब्रिटिशांनी ज्या वेळी येथे शाळा बांधल्या, विद्यार्थी आणि पर्यटकांचे येण्याचे प्रमाण वाढू लागले तसतसे पाण्याचे संकटदेखील मोठे होत गेले. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी पाचगणीत पाण्यासाठी फक्त विहिरींचाच वापर… Continue reading चित्रकाराचे भूत

साहित्य कोडे : उत्तरे

वसंत सरवटे  गट११)बॅरिस्टर२)रुक्मिणी३)नातीगोती गट२१)आल्बम२)महानंदा३)दुर्गी गट ३१)कवडसे२)सरमिसळ३)लग्न४)निवडक ठणठणपाळ गट४१)सारे प्रवासी घडीचे२)चक्र३)कावळे४)लोक आणि लौकिक गट५१) संध्याकाळच्या सावल्या२)संध्याछाया३)कौसल्या Continue reading साहित्य कोडे : उत्तरे

पुस्तक परीक्षण : बंध आणि इतर कथा                                                                     

 उमाकांत काशिनाथ घाटे यांचा ‘बंध आणि इतर कथा‘ हा कथासंग्रह मिहाना पब्लिकेशन्समार्फत नुकताच प्रसिद्ध झाला आहे. गेल्या अनेक वर्षांत प्रसिद्ध झालेल्या लेखकाच्या कथांपैकी २० निवडक कथांचा हा संग्रह आहे. लेखकाच्या कथा अंतर्नाद, माहेर, मेनका, किर्लोस्कर, किस्त्रीम, शब्दालय, शब्दगांधार यांसारख्या मातब्बर मासिकांमधून यापूर्वी प्रसिद्ध झाल्या आहेत. लेखकाचा हा पहिलाच कथासंग्रह. लेखकाने… Continue reading पुस्तक परीक्षण : बंध आणि इतर कथा                                                                     

आगामी – मन वढाय वढाय

नमस्कार!  मी डॉ. ऋजुता उत्पात – गोळवलकर – मनोविकारतज्ज्ञ – आता तुमच्या भेटीला येणार आहे अंतर्नाद या डिजिटल मासिकाद्वारे! तुम्ही म्हणाल मनोविकारतज्ज्ञ आमच्या भेटीला? कशासाठी?  खरं म्हणजे आता अशा प्रकारच्या प्रतिसादाची आता सवयच होऊन गेली आहे. असो! मला सांगा तुम्ही Health conscious म्हणजे तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक आहात  ना? तुम्ही म्हणाल,… Continue reading आगामी – मन वढाय वढाय

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

श्रेयनामावली 

 मार्गदर्शक : भानू काळे

 संपादक : अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी 

तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे

Author

Leave a Reply