मुखपृष्ठाविषयी : नोव्हेंबर २०२४ 

या वेळच्या मुखपृष्ठ कलाकार आहेत  मेधा चोबे. 

त्यांच्या  या सॉफ्ट ऑइल पेस्टल माध्यमातील  निसर्गचित्रात समोरील दृश्याची तंतोतंत नक्कल न करता, ते इंप्रेशनिझम शैलीत साकारलेले दिसते. चित्रातील प्रतिमांच्या बाह्यरेषा धूसर ठेवल्यामुळे चित्रात वेगळीच कलाजाणीव निर्माण झाली आहे. चित्रातील मानवी आकृती हा आकर्षणबिंदू मानून चित्रात पायर्‍या,  कठडा, लालसर फुलझाडांचा  ताटवा इत्यादींची मांडणी अशी केली आहे की त्या चित्रघटकांवरून पाहणाऱ्याची नजर आकर्षणबिंदूकडे जाते व चित्रावर खिळून राहते.

डॉ. गोपाळ नेने : 

व्यवसायाने फॅमिली फिजिशियन, दि आर्ट  सोसायटी  ऑफ इंडिया या चित्रशिल्पादि दृश्यकलेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या शतकपूर्ती झालेल्या संस्थेचे माजी कार्यवाह, राज्यकलापुरस्कारप्राप्त चित्रकार, कलामहाविद्यालयांमध्ये मानवी शरीरशास्त्र विषयाचे मानद व्याख्याता,संस्कृत अभ्यासक व अध्यापक.  

छायाचित्र सौजन्य :  डॉ.वर्षा प्रभू

One thought on “मुखपृष्ठाविषयी : नोव्हेंबर २०२४ 

  1. खूप छान!!! भूतदया अंगी असणारी व्यक्ती ही सर्वांसाठी आदरयुक्त असते.

Leave a Reply