अभिवाचन भाग ९

ग्रंथाली प्रकाशित ‘मोरपिसं’ या अनुराधा गानू लिखित ललित लेखांच्या अभिवाचनाची शृंखला आपण  सुरू केली आहे. 

 लेखिकेचा परिचय… 

१९७८ सालापासून अमेरिकेत वास्तव्य होतं. टॅक्स आणि अकाउंटिंगचा स्वतःचा व्यवसाय. लॉस एंजेलिसच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्यानं सक्रिय सहभाग. वाचन, लेखन, नाट्य, अभिनय यांची आवड. 

स्थानिक संगीतकार गोपाळ मराठे यांनी संगीतबद्ध केलेल्या व श्रीधर फडके आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या अनुराधाताईंच्या गीतांची ध्वनिफीत  ‘दाटुन आले मेघ नभात’  १९९३ साली प्रसिद्ध झाली. 

‘हरवले ते गवसले का’  हे ग्रंथालीतर्फे प्रसिद्ध झालेलं त्यांचं पाहिलं पुस्तक. 

ग्रंथालीतर्फेच प्रसिद्ध झालेला ‘अजब तुझे सरकार’ हा त्यांचा श्री. प्रभाकर देवधर यांच्या ‘कॅपिटल पनिशमेंट’ या इंग्रजी काव्याचा रूपांतरित काव्यसंग्रह. हे स्वैर रूपांतर इतकं सुंदर वठलंय की कवी मंगेश पाडगांवकरांनी त्यास अनुवाद न म्हणता अनुसर्जन म्हणून गौरवलं.

 पूर्व-पश्चिमेचा दुवा जोडणाऱ्या अनुराधाताईंच्या लोकसत्तेच्या  लोकरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या या ललित लेखांचं हे अभिवाचन…

अभिवाचन करताहेत उमा  खोलगडे. 

 लेख  नववा   : दृष्टी 

Author

Leave a Reply