कविता : निरोप

कशास आणि कोठून आलो

माहित नाही माहित नाही… 

कधी जायचे कसे जायचे

कशास आणि कुठे जायचे

माहित नाही माहित नाही… 

अनंतातल्या अगम्य,अद्भुत

प्रलयंकारी प्रवासात या

एक सांगतो धुंद मनाने

तृप्त मनाने जाता जाता

पडावं इथला अगम्य होता

अतर्क्य  आणि धमाल होता

Author

One thought on “कविता : निरोप

  1. अज्ञाताविषयीचा मनातील गोंधळ छान शब्दबद्ध केलाय!
    अनेकदा वाचावी अशी अन् मनाला भिडणारी कविता!! सुरेख!

Leave a Reply