कथा, कादंबर्या, व्यक्तिचित्रण, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेखन, पत्रकारिता अशा विविध साहित्यिक आघाड्यांवर आपल्या तरलतेचा अमीट ठसा उमटवणारे जयवंत दळवी यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांच्या काही साहित्यकृती अंताक्षरीत गुंफून कोडे घातले आहे अंतर्नादच्या वाचकवृंदाला!
खाली वेगवेगळे गट दिले आहेत.
ज्या अक्षराने आधीच्या साहित्यकृतीचा शेवट होतो त्याच अक्षराने पुढच्या साहित्यकृतीची सुरुवात होते. ळ आणि ण ऐवजी अनुक्रमे ल आणि न घ्यावे. गाळलेल्या जागा भरायच्या आहेत.
कोड्याची उकल व्हावी यासाठी कंसात त्या साहित्यकृतीतील पात्रे अथवा संदर्भ दिले आहेत.
आणि हो,
हे सोडवून थांबू नका, या निमित्ताने या सिद्धहस्त साहित्यिकाचं अक्षरधन पुन्हा वेचू या.
१) – रि– र (राधाक्का, भाऊराव आणि… )
२)_ _ णी
(कुरूप विठ्ठलराव, त्यांची सहा कुरूप मुलं आणि देखणी पत्नी एक शोकांतिका
३)ना_ _ती
(कहाणी लाली आणि जानकी
वेश्या आणि धर्मपत्नी यांच्या सहवासाची )
गट२
१) आ _ _
(आपल्या कुटुंबातील सर्व छायाचित्रांचा जुना – – – म्हणजे आठवणींचा एक भरगच्च खजिना)
२)_ _ _ दा (देवदासींचे चित्रण)
३)दु _ (सामाजिक नाटक)
गट३
१)क_ ड _
(दारिद्र्याची खिन्न करणारी पार्श्वभूमी असलेली कादंबरी)
२)_ _ मि _ _
(विनोदी कथासंग्रह)
३)ल _
-सुखी संसार म्हणजे गिलीट चढवलेले दागिने)
४)_ व _ क_ _ _ _ पा_
(ललित मासिकातील घटका गेली पळे गेली… संग्रह )
गट४
१)सा _ _ _ सी _ डी _
(दादू गुरवाचं वस्त्रहरण)
२) च _
(झोपडपट्टीतील जीवन)
३)_ व _
वडिलांच्या पैशावर टपलेले
४)_ क _ णि _ कि _
पहिला विमानप्रवास आणि अमेरिकावर्णन
गट ५ ‘या’ अक्षराने शेवट होणाऱ्या साहित्यकृती
१) सं_ _ ळ_ _ _ल्या
(आयुष्याच्या कातरवेळी भेटलेल्या दोघांची कथा)
२)सं _ _या
(आयुष्याच्या कातरवेळी भेडसावणाऱ्या दुःखाची कथा)
३) _ _ ल्या
(शेवटचं कादंबरी अपत्य)
उत्तर इतरत्र
