फेब्रुवारी २०२४

मुखपृष्ठाविषयी – Great Rosefinch

Great Rosefinch (Carpodacus rubicilla)Clicked by Dr Salil Choksi at Everest Base Camp (17598 feet), Nepal Oct ‘18 A Spotted Rose! One of the joys of high altitude trekking is to encounter specialised birds residing at those rarefied heights. So in Oct 2018, when we did the challenging, high altitude, 16… Continue reading मुखपृष्ठाविषयी – Great Rosefinch

संपादकीय : फेब्रुवारी २०२४ 

आम्ही लटिके  ना बोलू!   सोमवार दि. ४ व मंगळवार दि. ५ मार्च २०२४  रोजी सह्याद्री फार्म्स परिसर, मोहाडी ता. दिंडोरी जि. नाशिक येथे  ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. शेतीउद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करून शेतीउद्योगाला नवी दिशा देणाऱ्या मोहाडी (जि. नाशिक) येथील सह्याद्री फार्म्स… Continue reading संपादकीय : फेब्रुवारी २०२४ 

संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला

भाग ५ वा समर्थ रामदास : भाग १  एका बाजूला समर्थांची ‘ब्रह्मांड रचनेहून जाड’ अशी काव्यरचना, दुसर्‍या बाजूला अंतर्नादचा जाणकार, रसिक वाचकवर्ग आणि काव्यरचनेविषयी भरभरून बोलावंसं वाटलं तरी ‘गौल्यता नाही वचनाची!’ अशी आत्मस्थिती!   तरीही ‘येत्न साक्षेपी जोडावा’ या उक्तीला अनुसरून समर्थांच्या काव्यरचनांचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न! समर्थांची काव्यरचना कशी? … Continue reading संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला

The POTUS is on the move !!(3)

My greatest fear on an election day is that my kids will ask me to explain the electoral College : एक अमेरिकन माता       मालिकेतील मागचा लेख वाचताना तुमची नक्कीच दमछाक झाली असणार. जे जे अमेरिकन ते ते छान अशी बऱ्याच लोकांची समजूत आहे. त्यात थोडेफार तथ्य असू शकते; पण तेथील… Continue reading The POTUS is on the move !!(3)

कालेलकर मार्गावर चालताना

 लेखन हा  माझा व्यवसाय. गेल्या काही वर्षांत मी या व्यवसायात जे काही काम केले त्याकडे जेव्हा मी पाहिले, तेव्हा मला जे यश मिळालं त्यात फक्त मी आणि माझं यशच मला दिसू लागलं. कदाचित लोकांनाही तेच यश दिसेल; पण मी थोडेसे अधिक मागे जात गतकाळाचे चिंतन केले  तेव्हा माझ्या दृष्टीला काही… Continue reading कालेलकर मार्गावर चालताना

तेव्हाच्या गोष्टी

चांद्रयान ३ चंद्राच्या भूभागावर अलगद उतरत होतं तेव्हा…  टीव्हीवर वृत्तनिवेदिका उत्साहानं काहीतरी  अघटित घडल्याच्या थाटात कालच्याच बातम्या आज पुन्हा सांगत होती… एक राजकीय नेता दुसऱ्या एका  राजकीय नेत्यावर कसा निशाणा साधत आहे आणि त्या दुसऱ्या नेत्याकडून त्याचा कशा प्रकारे पलटवार केला जातो आहे वगैरे  बातम्यांच्या नावाखाली खपवण्याचे तिचे उद्योग चालू… Continue reading तेव्हाच्या गोष्टी

ये है बॉंबे मेरी जान 

मुंबईचा इतिहास भाग ४ ब्रिटिशांचा काळ सन १६६१ ते १८०० मुंबईचा खरा विकास कोणी केला असेल तर तो इंग्रजांनी केला. मागील लेखात आपण पोर्तुगीज व इंग्रज यांच्या दृष्टिकोनांतील फरक समजून घेतला आहे. मुंबईची सात बेटे व त्याला लागून असलेला साष्टी तालुका म्हणजे आताचा बृहन्मुंबईचा प्रदेश १३४ वर्षे पोर्तुगिजांच्या ताब्यात होता;… Continue reading ये है बॉंबे मेरी जान 

कविता – फेब्रुवारी २०२४

दोन कविता  १  काळा असो गोरा असो अजूनही नखे का वाढती हा संत तो आहे खुनी  नाही नखांना माहिती ज्यांच्या गळ्याला लागली अस्तित्व त्यांचे संपले ज्यांच्या गळाला लागली त्यांनी जगाला जिंकले   सांगेल का कोणी कधी आहे नखांना हा गुन्हा येणे तयांनी कोरल्या विकृतीच्या या खुणा नाकारली नाही कुणी अजूनी … Continue reading कविता – फेब्रुवारी २०२४

पुनर्भेट नॅशनल पार्कची ४ :  विरहाच्या आणि मिलनाच्या गोष्टी  

  दि.  १४.११.२०२३         नॅशनल पार्कमध्ये नदीच्या आसपास एक जखमी माकड फिरत आहे असा निरोप आम्हांला मिळाला. आम्ही त्या माकडाला शोधण्यासाठी बाहेर पडलो. पार्कमध्ये नेहमी चिंचा बोरे विकणाऱ्या बायकांना विचारलं तर त्या म्हणाल्या, “आता तर इकडेच होतं! बहुतेक त्या दिशेला गेलं.”  दुसरी म्हणे, “या दिशेला गेलं.”  पण माकड काही त्या दिवशी सापडलं… Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची ४ :  विरहाच्या आणि मिलनाच्या गोष्टी  

मोठी माणसे ५

बाळ गाडगीळ    बाळ गाडगीळ यांचे विनोदी लेखन मी लहानपणापासून वाचत आलो होतो. मला त्यांचे विडंबनपर लेखन विशेष आवडत होते; विशेषतः ‘अखेर पडदा पडला, एकच प्याला पण कोण?’  वगैरे नाटकांचे विडंबन करणारे लेखन; पण प्रत्यक्ष भेट बरीच उशिरा झाली. तसा मी १९६५ ते १९६७ पर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयात होतो. तेव्हा ते तिथे… Continue reading मोठी माणसे ५

देवराया – देवाचे जंगल

पारंपरिक निसर्ग बेटे. मित्रहो,  ब्रह्मांडाची निर्मिती झाली,  पाठोपाठ आकाशगंगा, सूर्यमाला जन्म घेऊ लागल्या; मग त्यातच आपल्या वसुंधरेचा जन्म झाला.    त्यानंतर सृष्टीची निर्मिती होऊ लागली, मग त्या सृष्टीमध्ये सजीव उत्क्रांत झाले. शेवटच्या टप्प्यात मानवजात जन्मली, आणि मग त्यानंतर बहुदा, देवांचा जन्म झाला असावा. असे म्हणतात ना…  ‘देव दानवा नरे जन्मले…’ अगदी… Continue reading देवराया – देवाचे जंगल

झेन आणि आनंदी राहण्याची कला

काही दिवसांपूर्वी झेन तत्त्वज्ञानाविषयी एक पोस्ट वाचनात आली होती. त्या पोस्टमध्ये फार सोप्या शब्दांत जीवन आनंदाने जगण्याची तत्त्वे सांगितली होती.          *कोणतीही गोष्ट करताना ती मनाच्या विशिष्ट एकाग्रतेने, मनाच्या शांतपणानं आणि साधेपणानं करणं. ज्यात ज्ञानाचा अनुभव येतो आणि त्या अनुभवातून आनंद मिळतो  ती गोष्ट म्हणजे झेन होय.         *आपले आयुष्य जगत असताना… Continue reading झेन आणि आनंदी राहण्याची कला

ब्लॅक स्वान

ब्लॅक स्वान (द इंपॅक्ट ऑफ द हायली इंप्रॉबेबल) – नस्सिम निकोलस तालेब  प्रकाशक – पेंग्विन  ४८० पाने   किंमत – रु.४१५ किंडल – रु.२५०   नस्सिम निकोलस तालेब हा मूळचा लेबनीज वंशाचा अमेरिकन लेखक, संपादक, संख्याशास्त्रज्ञ आणि वॉल स्ट्रीटवरचा माजी ट्रेडर आहे. यादृच्छिकता (randomness), संभाव्यता आणि अनिश्चितता हे त्याच्या अभ्यासाचे विषय आहेत.… Continue reading ब्लॅक स्वान

८१ वे औदुंबर साहित्य संमेलन

  दत्तकृपेने मंतरलेल्या,  कवी सुधांशु व सदानंद यांच्या कर्तृत्वाने  पुनीत  झालेल्या भूमीत नुकतेच सर्वस्वी लोकसहभागावर चालणारे ८१ वे औदुंबर साहित्य संमेलन संपन्न झाले.  ‘सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर’ ही संस्था या संमेलनाची आयोजक होती.  सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, साहित्यिक, विचारवंत डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. औदुंबर (जिल्हा सांगली) या गावी १९३९पासून… Continue reading ८१ वे औदुंबर साहित्य संमेलन

‘मला उमगलेला भारत’ या पुस्तकाची भूमिका

बदलता भारत हे भानू काळे यांचे गाजलेले पुस्तक बऱ्याच भ्रमंतीनंतर सिद्ध झाले होते.  अनेक व्यक्ती, संस्था व शहरे यांना भेट दिल्यानंतर जागतिकीकरण व त्याचे भारतावर झालेले  सकारात्मक परिणाम आपण वाचले होते.  (या गोष्टीला  जवळपास वीस वर्षे होत आली.  वीस वर्षांत भारत काही बदलला आहे का याचा पुन्हा एकदा शोध घेण्याची… Continue reading ‘मला उमगलेला भारत’ या पुस्तकाची भूमिका

गेले ते दिन गेले

कोरा कागद… निळी शाई…  आम्ही कुणाला भीत नाही… दगड का माती… असे खेळ खेळत मोठी झालेली आपली पिढी ! या निळ्या शाईने आपल्याला सहनशीलता दिली, उज्ज्वल भवितव्य दिलं, लढण्याचं बळ दिलं! पेनामध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी… दुकानदारही शाईचे थेंब मोजून पेनमध्ये टाकायचा. आधीच होल्डर उघडून… Continue reading गेले ते दिन गेले

बेंगलोर डायरी ४ 

 प्रत्येक शहराचे असे एक अंतरंग असते. मूळ शहर हळू हळू वाढत जाते; पण तरी त्या मूळ भागाचा स्वतःचा असा एक अभिमान असतो. मुळात प्राचीन काळात कोणतेही गाव शहर वसत होते ते पाण्याच्या उपलब्धतेवरून! आता त्यात वाहतूक, नोकरी-व्यवसायाच्या संधी अशा अनेक गोष्टींची भर पडली आहे. मुंबईमध्ये रेल्वे लाईनवरून जागेचा अभिमान बाळगला… Continue reading बेंगलोर डायरी ४ 

पदर जळू नये निखारे विझू नयेत

 हा संकल्प करणे ही सामाजिक जबाबदारी…   निवृत्तीपूर्वी नुकत्याच एका मित्र कुलगुरूंनी दिलेल्या मुलाखती वाचण्यात आल्या. कुलगुरूचे पद म्हणजे फक्त काटेरी मुकुटच नव्हे; तर ती बाणांची काटेरी भीष्मशय्यादेखील असते. प्रसिद्ध नाटककार  पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या नाटकात एक वाक्य आहे – नुकत्याच लग्न होऊन घरात आलेल्या सुनेला सावध करताना सासरा म्हणतो, “बाई गं,तुझ्या… Continue reading पदर जळू नये निखारे विझू नयेत

ग्रंथयात्रा – एक प्रवास

ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे . शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे वेगवेगळे मराठी साहित्य मांडले जात आहे. या एका आगळ्या प्रयोगाविषयी लिहिताहेत या मालिकेच्या सादरकर्त्या अर्चना मिरजकर.         ते लॉकडाऊनचे दिवस होते. २०२० सालच्या एप्रिल-मे महिन्याचे. देशात कोव्हिडची पहिली लाट उसळली होती. आमच्या दिल्लीच्या अपार्टमेंटमध्ये मी… Continue reading ग्रंथयात्रा – एक प्रवास

रामकृष्ण नायक : निरलस समाजसेवेचा नंदादीप 

 रामकृष्ण केशव नायक यांचे पाच-सहा दिवसांपूर्वी, म्हणजे २८ जानेवारी रोजी मडगाव येथे वयाच्या ९४व्या वर्षी झालेले निधन खूप चटका लावून गेले. वयाचा विचार केला तर ते अगदी अकाली म्हणता येणार नाही; पण तरीही त्यांच्या निधनाने अंतःकरणात खोलवर कुठेतरी एक कळ उमटली. साधारण वर्षापूर्वी दत्तप्रसाद दाभोळकर, अनिल व  शुभांगी जोशी, तसेच… Continue reading रामकृष्ण नायक : निरलस समाजसेवेचा नंदादीप 

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

श्रेयनामावली

 मार्गदर्शक: भानू काळे

 संपादक: अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार: सुषमा जोशी

 व्यवस्थापन मंडळ: अजित  कानिटकर, अनिल शिदोरे, उमाकांत घाटे, स्नेहा अवसरीकर 

तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे

Author

One thought on “फेब्रुवारी २०२४

  1. खूप छान व संग्राह्य अंक. आशयघन साहित्य व अभ्यासपूर्ण माहिती.

Leave a Reply