दोन कविता
१
काळा असो गोरा असो
अजूनही नखे का वाढती
हा संत तो आहे खुनी
नाही नखांना माहिती
ज्यांच्या गळ्याला लागली
अस्तित्व त्यांचे संपले
ज्यांच्या गळाला लागली
त्यांनी जगाला जिंकले
सांगेल का कोणी कधी
आहे नखांना हा गुन्हा
येणे तयांनी कोरल्या
विकृतीच्या या खुणा
नाकारली नाही कुणी
अजूनी नखांना थोरवी
रंगात रंगे प्रेमिका
अजूनही नखांना रंगवी
२
अंधार येतोय
असे पाहून
सूर्य पळतो ?
की सूर्य येतोय
हे पाहून
अंधार पळतो ?
पहाट आणि
संध्याकाळ
यांची ही
गहन गूढ चर्चा
ऋतुपर्ण वेदांत !

