The POTUS is on the move !!(3)

My greatest fear on an election day is that my kids will ask me to explain the electoral College : एक अमेरिकन माता 

     मालिकेतील मागचा लेख वाचताना तुमची नक्कीच दमछाक झाली असणार. जे जे अमेरिकन ते ते छान अशी बऱ्याच लोकांची समजूत आहे. त्यात थोडेफार तथ्य असू शकते; पण तेथील अध्यक्षपदाची ‘Electoral College’ ही पद्धती मात्र याला अपवाद आहे. ती पूर्णपणे समजावून घेणे किंवा समजून सांगणे हे जवळपास अशक्यप्राय आहे. थोडीशी उजळणी करून पुढे जाऊ या. अध्यक्ष-निवड प्रक्रियेच्या तीन पायऱ्या :

१ सर्वसामान्य नागरिकांकडून Electors ची निवड

२  या Electors ची अध्यक्ष -उपाध्यक्ष         निवडीसाठीच्या मतदानासाठी बैठक व मतदान 

३  कॉंग्रेसद्वारा या मतांची मोजणी. 

आता electors साठी आपण ‘मतदाते’ हा शब्द वापरू या. जनता आपापल्या राज्यासाठी हे मतदाते निवडते त्यांची संख्या राज्याच्या लोकसंख्येवर ठरते. आता माझ्या पंढरपूर राज्यातून दहा मतदाते निवडायचे आहेत. रिपब्लिकन ट्रंप व डेमोक्रॅट जो बायडन  उमेदवार  आहेत. येथे बायडनना  मतदानाच्या ७१% तर ट्रंपना ३९% मते मिळाली. अर्थात पंढरपूरचे १० मतदाते हिलरींचे झाले. मंगळवेढ्यातही दहाच मतदाते आहेत. येथे ट्रंपना ५१% बायडन  ४९% असे होऊन हे १०  मतदाते ट्रंपना मिळाले. या दोन आकड्यांवरून बायडन यांची  लोकप्रियता जास्त आहे हे उघडपणे दिसते आहे; पण त्यांच्याकडची मतदात्यांची संख्या मात्र तीच म्हणजे दहाच आहे. अमेरिकेत अशी ५० राज्ये आहेत आणि ओबामा यांचा अपवाद वगळता जॉर्ज बुश(२०००)  व डोनाल्ड   ट्रंप(२०१४) हे दोन राष्ट्राध्यक्ष असेच कमी लोकप्रिय मते मिळवूनही  जास्त मतदाते बरोबर असल्याने राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत; त्यामुळे तेथेही ही ‘Electoral College’  च्या निवड प्रक्रियेबाबत उलटसुलट चर्चा चालू असते. काहींना ती आवडते तर काहींना ती अत्यंत चुकीची वाटते. घटनादुरुस्ती होत नाही तोपर्यंत आहे ते चालू राहणार हे उघड आहे. आत्तापर्यंत गेल्या २०० वर्षांच्या अमेरिकन इतिहासात या पद्धतीत बदल सुचविण्यासाठी संसदेत ७०० प्रस्ताव सदर झाले आहेत; पण ते मंजूर होऊ शकले नाहीत. अमेरिकेतल्या वकील संघटनांनीदेखील या पद्धतीला विरोध दर्शवून तिची ‘जुनीपुराणी’ अशी संभावना केली आहे. पूर्वी संपर्क साधनांचा  अभाव असताना ही पद्धती योग्य होती; परंतु आता संपर्काच्या कक्षांचा झालेला विस्तार व वेगवृद्धी लक्षात घेता आता याचा फेरविचार व्हावा असा विचार हळूहळू मूळ धरतो आहे.  अमेरिकेसारख्या खंडप्राय देशात  कुठलीच पद्धती आदर्श ठरणार नाही हे उघड आहे. Electoral College  पद्धतीचे काही ठळक फायदे व तोटे असे सांगता येतील 

फायदे : 

१ तुम्हांला राष्ट्रव्यापी समर्थन असावे लागते.  

२ अल्पसंख्य लोकांना/ समुदायाला आपले मत व्यक्त करता येते व अशा मतांची दखल घ्यावी लागते 

३ या पद्धतीमुळे राजकीय स्थैर्य राहते. आपल्याकडे जो घोडेबाजार होतो तसा तिकडे होऊ शकत नाही   

४ लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व राज्यांना मतदाते मिळतात व त्यामुळे प्रतिनिधित्वही मिळते. ही सर्व प्रक्रिया राज्यांभोवतीच फिरते व त्यामुळे राज्यांचे महत्त्व अबाधित राहते. केंद्रशासन डोईजड होत नाही आणि अमेरिकेत राज्यांची ही अस्मिता अतिशय प्रखर आहे. अमेरिकन Federalism चा तो एक अविभाज्य भाग आहे 

५  काही असाधारण आणीबाणी आल्यास  Electoral College च्या रूपाने साऱ्या राज्यांचे प्रतिनिधित्व करणारी एक अधिकृत यंत्रणा उपलब्ध होऊ शकते.    

तोटे : 

१ काही वेळा लोकप्रिय मते कमी मिळालेला माणूस जास्त electoral मते मिळवून अध्यक्ष होऊ शकतो. 

२ मतदाते(Electors )    त्यांच्या राज्यांनी दिलेल्या जनादेशाविरोधी  – म्हणजेच दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मत देऊ शकतात .

३ इतर  मोठ्या राज्यांतील मतदारांचा  कल पाहून एखाद्या  छोट्या राज्यातले मतदार उदासीन होऊन मत द्यायचे टाळू शकतात . 

४ अंतिम निकाल हा जनादेशाच्या कलाच्या विरोधी येऊ शकतो.

मागच्या एका अमेरिकन अध्यक्ष निवडीत रशियाने केलेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा अजून चर्चेत आहे. ट्रंप महाशयांना त्यामुळे महाभियोगाला (Impeachment) सामोरे जावे लागले होते .  

रशियन विचारसरणीचे एक प्रातिनिधिक उदाहरण पाहून लेख संपवतो .

 The people who cast the votes decide nothing. The people who count the votes decide everything.

                                                   Joseph Stalin

Author

Leave a Reply