मुखपृष्ठाविषयी – ऑक्टोबर २०२३
मुखपृष्ठ कलाकार आहेत रेखा श्रीजीत. त्या आपल्या कलाकृतीमधील स्त्री प्रतिमांविषयी लिहितात … My woman I wanted the female figures in my paintings to be bold, caring, motherly as well as beautiful and sensuous at the same time. They are stylishly lissome. But the viewer would be making a mistake if… Continue reading मुखपृष्ठाविषयी – ऑक्टोबर २०२३
संपादकीय : राष्ट्रनिर्माणाची चतुःसूत्री
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०३ व्या पुण्यतिथिदिनी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने( टिळक स्वराज्य ट्रस्ट) ४१ वा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच पुण्यात प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळकपुरस्कृत स्वातंत्र्य ,स्वराज्य, विदेशी मालाचा बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी वापरल्या गेलेल्या सुप्रसिद्ध चतुःसूत्रीवर आधारित राष्ट्रनिर्माणासाठीची नवीन… Continue reading संपादकीय : राष्ट्रनिर्माणाची चतुःसूत्री
मोठी माणसे १: श्री. बा. रानडे
श्री. बा. रानडे अंतर्नाद आंतरजाल माध्यमातून पुन्हा सुरू झाले आहे ही माझ्यासाठी आणि खरेतर सर्वच वाचनप्रेमींसाठी मोठीच आनंदाची आणि स्वागतार्ह गोष्ट आहे. छापील अंतर्नादमधील माझे लेखन मुख्यतः गद्य लेखांच्या स्वरूपात होते; किंबहुना मला गद्य लेखनाची वाट सापडली ती अंतर्नादमुळेच! त्याची सुरुवात झाली २००४ या वर्षी. ‘मनकविता’ सदरासाठी भानू काळे यांनी… Continue reading मोठी माणसे १: श्री. बा. रानडे
कविता : मर्ढेकरांप्रति विडंबनांजली
इरेस पडलो जर बच्चम् जी प्रतिमर्ढेकर बनेन मीही, शब्दांवरती हुकमत थोडी अन् तिरकस रचना झरणीवळणी. का मत्शब्द बापुडे केवळ वारा तव अब्दतेज, बा, शततारा ! सार-असार; मौत्तिक / कचरा ‘श्री+राम’करी; फैसला सारा! फक्कड रंगी शुभ्र नभांगणी स्व-छंदी विदुषके फर्कटावे आम्ल मनीचे ओकून टाकुनी ‘कार्पण्य फेकुनी दिले’ म्हणावे निसर्ग-किमया, क्षणिक कोवळी… Continue reading कविता : मर्ढेकरांप्रति विडंबनांजली
शिक्षण शिक्षेचे
आपल्या महानगरांत अचानक होणारे व आपल्याला काहीसे भयचकित करणारे प्रसंग या विषयावर परवा चर्चा चालली होती. चर्चेदरम्यान मला महाराष्ट्रातील एका विख्यात महानगरात काही वर्षांपूर्वी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत काम करणाऱ्या वाहनचालकाने केलेल्या तांडवाची आठवण झाली . दोन ते तीन तास अनिर्बंध गाडी चालवून त्याने प्रचंड नुकसान केले; अनेक निरपराध व्यक्ती यात… Continue reading शिक्षण शिक्षेचे
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला : भाग दुसरा
संत नामदेव नामदेवांचा जन्म झाला तो काळ होता कर्मकांडं, व्रतवैकल्ये आणि जातिभेदाचा! शिंपी कुळात जन्म झालेल्या नामदेवांचा जन्म शिंपीतून – शिंपल्यातून झाला अशी एक मजेशीर आख्यायिका ऐकायला मिळते. एखाद्या व्यक्तीच्या मागे वलय निर्माण झालं की त्याच्याभोवती अतर्क्य घटनांची रांगोळी चितारणारा समाज प्रत्येक काळात आढळतो. ‘नामदेवांनी सुलतानासमोर मेलेली गाय जिवंत केली,’… Continue reading आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला : भाग दुसरा
माझ्याच बाबतीत . . .
‘माझ्याच बाबतीत असं का होतं…?’ असा प्रश्न मला सतत पडतो. तुम्हांला पडतो का ? पडत असणार; कारण तो तसा अनेकांना पडतो; पण ते उघड बोलत नाहीत! मला इथे त्याविषयी लिहायची संधी मिळाल्याने मी त्याचे मला आलेले अनुभव सांगू शकतो. मी भलताच पंक्च्युअल म्हणजे वक्तशीर माणूस आहे. नाटकाच्या जाहिरातीत सूचना असते,… Continue reading माझ्याच बाबतीत . . .
नागराजन विठ्ठल : प्रशासकीय सेवेचा एक आदर्श
देशाच्या संदर्भात विचार करायला लागले की सर्वप्रथम आपल्या डोळ्यांपुढे सर्वोच्च पदावर असलेले राजकीय नेते उभे राहतात आणि त्यांचीच चर्चा माध्यमांतून अधिक होत असते. याचे कारण देशाची ध्येयधोरणे लोकांनी निवडून दिलेले राजकीय नेतेच ठरवत असतात; ती सत्ता आणि ते अधिकार त्यांच्याच हातात असतात. हे अर्थात खरे असले, आणि लोकशाहीत ते तसेच… Continue reading नागराजन विठ्ठल : प्रशासकीय सेवेचा एक आदर्श
उच्च शिक्षणाचा गाभा – भाग २ :
मन केवढं केवढं… खरं सांगा बरं, शाळा-कॉलेजांमध्ये मनाच्या मशागतीसाठी किती परिश्रम घेतले जातात? शरीराची आपण काळजी घेतो, ज्ञान वाढवतो; पण मनाच्या मशागतीची, मनाच्या वाढीची तसदी कोण घेतो? सध्यातरी उच्च शिक्षणाचा सगळा भर आणि भार विद्यार्थ्यांचं ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यावर असतो; म्हणजे मग मुलांना पदव्या मिळतात, नोकऱ्या मिळतात आणि ते त्यांच्या… Continue reading उच्च शिक्षणाचा गाभा – भाग २ :
कविता : झुलला गं झुलला गं अधांतरी झोका
झुलला गं झुलला गं अधांतरी झोका… झुलला गं झुलला गं अधांतरी झोका… दूर दूर जाते बघ गावाची ही शीव तरी तिथे रेंगाळतो वेडावला जीव वळण हे मागे पाही वळून वळून पळभर विसावला क्षण पळून पळून झुलला गं झुलला गं अधांतरी झोका… चुकला गं चुकला गं काळजाचा ठोका… सरावली होती कधी… Continue reading कविता : झुलला गं झुलला गं अधांतरी झोका
आपले काय चुकते?
खरेतर अशा लेखाच्या शीर्षकाखाली मुलांचे- नवीन पिढीचे काय चुकते? मोठ्यांचे म्हणजे पालकांचे काय चुकते? संसारात नवरा-बायकोंचे काय चुकते? असे वेगवेगळे उपशीर्षक असायला हवे. यात नेत्यांचे,सरकारचे काय चुकते हेही जोडता येईल; कारण अवतीभवतीची कौटुंबिक,सामाजिक,राजकीय परिस्थिती बघितली तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येकाचे काही ना काही चुकते आहे.अवतीभवतीच्या गोंधळाला,अराजकाला,अस्थिर परिस्थितीला आपण सारेच… Continue reading आपले काय चुकते?
गोष्ट अफगाणिस्तानची (उत्तरार्ध)
श्रीपाद रा. टिकेकर यांनी १९३० साली लिहिलेल्या ‘सिंहाला शह’ या पुस्तकाच्या निर्मितीची हकिकत, आधीच्या लेखातून मी आपल्यापुढे मांडली. या लेखातून वरील पुस्तकात अफगाणिस्तानची जी ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक व राजकीय माहिती दिली आहे तिचा गोषवारा मी आपल्यापुढे मांडणार आहे. या माहितीच्या आधारे आजपासून मागील तीस वर्षांत घडलेल्या घटनांमागील सूत्र लक्षात येईल… Continue reading गोष्ट अफगाणिस्तानची (उत्तरार्ध)
ढंग विडंबनाचा
अनुकरण वा नक्कल करणे ही तशी माणसाची जन्मजात प्रवृत्ती असते. विडंबनाचं मूळ या जन्मजात मानवी वृत्तीतच शोधता येते. अगदी वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासून लहान मुलं पक्ष्यांचा आवाज, हम्माचं हंबरणं, आजी आजोबांचं चालणं – बोलणं, बाबांचं रागे भरणं, आईचं डोळे वटारणं, अशा गोष्टी अगदी हुबेहूब करून दाखवितात. शालेय जीवनातील प्रत्येक पिढीमध्ये… Continue reading ढंग विडंबनाचा
कामशेत भाग १
इसवी सन – १९९३ वैद्यक शास्त्रातील पदवी मिळाल्यानंतर(MBBS) ग्रामीण व शहरी भागातील सरकारी दवाखान्यांमध्ये एक वर्ष सेवा द्यावी लागते. अशा सेवेची सुरुवात करताना एका नवशिक्याला आलेले हे अनुभव – संपादक. कामशेतपासून टमटम अथवा बसेस पकडून अंदरमावळ म्हणतात अशा दुर्गम भागात जावं लागतं. छोटी छोटी खेडी, वस्त्या आणि सर्वत्र हिरवंगार असलेला… Continue reading कामशेत भाग १
अभिवाचन :‘नव्या जगाची सुरुवात’
मंडळी नमस्कार, ‘ सामाजिक संस्कारांची पखरण करणारी बोधमालिका’ असे ज्या उपक्रमाचे सार्थ वर्णन केले गेले व ज्याने संपादक भानू काळे यांना भरीव समाधान मिळवून दिले अशी ‘नव्या जगाची सुरवात’ ही ‘अंतर्नाद’मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात मालिका.” Be the Change You Want “ असे वाचकांना हसत खेळत सोप्या शब्दात व नित्याच्या अनुभवांमधून… Continue reading अभिवाचन :‘नव्या जगाची सुरुवात’
पुनर्भेट नॅशनल पार्कची २ : नॅशनल पार्कमधील श्रावण
संततधार धरलेला आषाढ संपून उद्यानात ऊन-पावसाचा श्रावण सुरू होतो. जमिनीलगत उगवणाऱ्या गुलाबी रंगाच्या रानहळदीला बहर येतो . आषाढात समूहाने उगवणारी अळंबी दिसते; तर श्रावणात ही रानहळदीची फुलं काही काही ठिकाणी समूहाने उगवलेली दिसतात . जमिनीलगत गुलाबी रंगाच्या पाकळ्या आणि त्यावर काही ठिकाणी हळदीच्या पिवळ्या रंगांचा फटकारा असलेली रानहळदीची फुलं शोधायला… Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची २ : नॅशनल पार्कमधील श्रावण
मी आणि माझे वाचन
गेली ५० वर्षे मी विविध प्रकारची पुस्तके वाचतो आहे. सुदैवाने पुस्तके वाचायला भरपूर वेळ मिळेल अशी शिक्षकाची नोकरी मिळाली. पुस्तकांनी माझे जीवन पूर्ण बदलले. वाचन ही माझ्या आयुष्यातील अनमोल भेट आहे, असं मला वाटतं. माझ्यासाठी वाचन हा स्वान्त सुखाय भाग आहे. मी आणि पुस्तक हे आमच्या दोघांचं खूप सुंदर प्रेमाचं… Continue reading मी आणि माझे वाचन
पुस्तक परिचय : द विझर्ड अँड द प्रॉफेट
द विझर्ड अँड द प्रॉफेट (टू ग्राउंडब्रेकिंग सायंटिस्ट्स अँड देअर कॉन्फ्लिक्टिंग व्हिजन्स ऑफ द फ्युचर ऑफ अवर प्लॅनेट) – चार्ल्स सी. मान प्रकाशक – पिकॅडोर ६०८ पाने किंमत – रु.५१० किंडल – रु.३९८ अमेरिकन पत्रकार आणि लेखक ‘चार्ल्स मान’ हे विविध पुरस्कारांचे विजेते आहेत. फॉर्च्यून, द न्यूयॉर्क टाइम्स, द वॉशिंग्टन… Continue reading पुस्तक परिचय : द विझर्ड अँड द प्रॉफेट
आमची शेती… आमचं प्रेम..
सुनिल खरे ( माझा नवरा ) एम्.एस्सी. (अॕग्रि) झालेला. सगळ्या प्रकारची पिकं, भाजीपाला, बटण-मश्रूम, आंबा, अननस… त्यांचं कॅनिंग, डेअरी, पिगरी… असा बराच अनुभव एव्हाना गाठीशी आला होता. जागा मिळेपर्यंत सात वर्षं गेली. तोवर बरोबरची मित्रमंडळी पांगली; मग आपल्याला परवडेल असं वाटणारी चार एकर जमीन आमच्या ताब्यात आली. मुख्य… Continue reading आमची शेती… आमचं प्रेम..
स्वागत
१ थोडक्यात पण मार्मिक अंतर्नादचेएक जुने वाचक व लेखक आणि ‘शून्य कचरा’ संकल्पनेचे प्रवर्तक – ठाणे येथील कौस्तुभ ताम्हनकर – यांचे ‘थोडक्यात पण मार्मिक’ हे दुसरे पुस्तक श्रीगणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रसिद्ध झाले आहे. हे पुस्तक त्यांनी आपले आजोबा कैलासवासी ना. धों. ताम्हनकर यांना अर्पण केले आहे. ताम्हनकर यांनी लिहिलेल्या व… Continue reading स्वागत
महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
श्रेयनामावली
मार्गदर्शक: भानू काळे
संपादक: अनिल जोशी
व्याकरण सल्लागार: सुषमा जोशी
व्यवस्थापन मंडळ: अजित कानिटकर, अनिल शिदोरे, उमाकांत घाटे, स्नेहा अवसरीकर
तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे

So glad it has been restarted…..keep up the good work