लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०३ व्या पुण्यतिथिदिनी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने( टिळक स्वराज्य ट्रस्ट) ४१ वा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच पुण्यात प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळकपुरस्कृत स्वातंत्र्य ,स्वराज्य, विदेशी मालाचा बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी वापरल्या गेलेल्या सुप्रसिद्ध चतुःसूत्रीवर आधारित राष्ट्रनिर्माणासाठीची नवीन चतुःसूत्री पंतप्रधानांनी यावेळी सांगितली. व्यवस्था, व्यवस्थेतून निर्माण झालेल्या विविध संस्था, अशा संस्थांनी परिष्कृत सुजाण नागरिक व अशा नागरिकांचा सुसंस्कृत समाज अशी ती रचना आहे. ही रचना अर्थातच चांगली आहे व तितकीच आवश्यकही आहे.
समाजातील वेगवेगळ्या गरजांचे पोषण करणाऱ्या व्यवस्था ह्या विचारप्रणालीच्या केंद्रस्थानी आहेत. आरोग्य, शिक्षण हे दोन विषय अशा प्रकारच्या कोणत्याही व्यवस्थांमध्ये महत्त्वाचे असतात व ते तसे राहणार. त्याचबरोबर समाजाचे सांस्कृतिक भरण पोषण करण्यासाठी अशा व्यवस्थांमध्ये स्वतंत्र विचार हवा. अन्न ,वस्त्र, निवारा या निर्विवादपणे माणसाच्या मूलभूत गरजा आहेत; पण त्याचबरोबर सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध, विवेकी समाजमन निर्माण करणे हेदेखील एक आवश्यक राष्ट्रकर्तव्य आहे. त्यासाठी काव्य,शास्त्र,विनोद, साहित्य यांवर आधारित विविध उपक्रम सातत्याने घडणे हे गरजेचे आहे.
केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्य खाते, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी यांच्यासारख्या संस्था, विविध पातळ्यांवर होणारी साहित्यसंमेलनेही समाजाच्या पोषणासाठी गरजेची आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. नुसते साक्षर होणे आणि सुसंस्कृत होणे यांतला फरक जाणून तो मिटवणे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजेत. विज्ञान आणि विवेक यांच्यातला संघर्ष ‘ओपनहॅमर’ सिनेमाद्वारे आपण पाहिला. अशा प्रकारच्या संघर्षात योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता समाजात निर्माण करण्यासाठी आपल्याला संस्कृती आवश्यक आहे. सत्याला अनेक बाजू असतात. सत्य अन्य नजरांमधून बघण्याची क्षमता महत्त्वाची. अशी क्षमता असणे म्हणजेच खरी सांस्कृतिक समृद्धी !

आदरणीय डाॅ. अनिल जोशी सर, सस्नेह नमस्कार. वैद्यकीय क्षेत्राला व्यवसाय म्हणून न पहाता, मानवी कल्याणासाठी आपण केलेली सेवा, आम्हाला ज्ञात आहे. आज, आपण “अंतर्यामी ” म्हणून, भारतीय मराठी साहित्य, संस्कृती, आदर्शांना उजागर करीत, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात , युवकांना, आमच्या सारख्या नवशिक्यानां प्राचीन काळापासून चालत आलेली संस्कृती, चालीरिती याचं तर्कशुद्ध मुल्यमापन “अंतर्नाद ” आहात. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी, मिळवणारच..”, ही लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना आजही न्याहक्कासाठी हवी आहे. आम्हीही आमच्या परीने, जागल्या बनून गस्त घालतो आहे. लिहिते रहा. @ समाजमित्र तात्यासाहेब सोनवणे, “जागल्या” बदलापूर ( पूर्व) जिल्हा.ठाणे+ ९३२४३६६७०९
“साहित्याचे मानवी जीवनातील स्थान” यावर सन्माननिय भानू काळे यांनी मांडलेले विचार अतिशय मौलिक आहेत. सर्जनशिल अन् विवेकपूर्ण समाज घडविण्यात साहित्याचे योगदान निश्चितच महत्वाचे आहे.
Good articles Pirachi chichani exceptional work