जुलै २०२४

मुखपृष्ठाविषयी :  जुलै  २०२४  

चाफा  Genus : Plumeria  छायाचित्र : शुभांगी जोशी  चाफा बोले ना  चाफा बोले ना, चाफा चाले ना  चाफा खंत करी काही केल्या फुले ना  गेले आंब्याच्या बनी म्हटली मैनांसवे गाणी  आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे  गेले केतकीच्या बनी  गंध दरवळला वनी  नागासवे गळाले देहभान रे  चल ये रे, ये रे… Continue reading मुखपृष्ठाविषयी :  जुलै  २०२४  

संपादकीय जुलै २०२४ : संघटन कशासाठी? 

  विविध  व्यावसायिकांनी स्थापन केलेल्या आपल्या संघटना हे आपल्या समाजजीवनाचे एक महत्त्वाचे अंग बनल्या आहेत. सनदी लेखापाल,  अभियंते,  वैद्यक-व्यावसायिक,  वकील यांच्या संघटना आपापल्या सदस्यांच्या हितरक्षणासाठी जागरूक असतात.  अशा प्रकारच्या संघटनांचा हेतू काय असावा?  १ आपापल्या क्षेत्रात होणारी प्रगती, येणारे नवीन ज्ञान आपल्या सभासदांपर्यंत पोहोचवून त्यांना अद्ययावत  ठेवणे – यासाठी प्रदर्शने,… Continue reading संपादकीय जुलै २०२४ : संघटन कशासाठी? 

यास्मिन शेख : चिरतरुण वैयायोगिनी

     मराठीप्रेमाचा मूर्तिमंत आविष्कार असे ज्यांचे वर्णन करता येईल त्या प्रा. यास्मिन शेख २१ जून २०२४ रोजी वयाची नव्व्याण्णव वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करत आहेत ही सर्वच मराठीप्रेमींसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या नव्वदीनिमित्त २०१५ साली त्यांचा एक अनौपचारिक खासगी सत्कारसमारंभ त्यांच्या दोन्ही मुलींनी योजला होता. त्यात अंतर्नादच्या वतीने… Continue reading यास्मिन शेख : चिरतरुण वैयायोगिनी

राम दिखाया पत्थरों ने : ४

रामकथा ही भारतीय संस्कृती आणि धर्माचा एक अविभाज्य भाग आहे. रामायण महाकाव्यातील कथानकावर आधारित अनेक कलाकृती निर्माण केल्या गेल्या आहेत; त्यांमध्ये  शिल्पकला हाही  एक महत्त्वाचा प्रकार आहे. रामकथेचे शिल्पांकन हे अनेक रूपांत आढळते. अनेक मंदिरांवर  रामायणामधील विविध प्रसंगांचे शिल्पांकन पाहायला मिळते.  या शिल्पांमध्ये रामायणातील प्रमुख प्रसंग आणि पात्रे यांचे  चित्रण… Continue reading राम दिखाया पत्थरों ने : ४

मोठी माणसे : १० 

कुसुमाग्रज : वि.वा. शिरवाडकर मागचा लेखांक मी शंकर वैद्यांवर लिहिला होता. शंकर वैद्य स्वतःच्या कविता ग्रंथरूपाने संपादित करण्याबाबत उदासीन होते; पण इतर मोठ्या कवींच्या कवितांच्या संपादनाचे काम त्यांनी साकल्याने केले. त्यांतले मुख्य होते कुसुमाग्रज. आजचा लेखांक आहे त्या कुसुमाग्रजांवर. कुसुमाग्रज हे नाव शालेय वयातच पाठ्यपुस्तकांतील कवितांमुळे ओळखीचे झाले होते. नंतर… Continue reading मोठी माणसे : १० 

भेंड्यांचे कूट

मोहगीत/गीतमोह या महिन्यात पुण्यतिथी असलेले दोन कलाकार — अफाट ताकदीचे गायक! स्वरांतून भाव उमटत, भिडत जाईल असं त्यांचं गाणं. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  मोहात पाडणारी   मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांची काही ‘मोहगीते’ ओळखू या आणि   गुणगुणू या…  पहिलं गाणं आहे रफी, दुसरं गीता दत्त! हाच क्रम पुढे सगळ्या गाण्यांना.… Continue reading भेंड्यांचे कूट

बेंगलोर डायरी :९

बेंगलोर हे एक स्वप्न आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही – म्हणजे हैद्राबादमध्ये कितीही चांगल्या आयटी कंपन्या का असेनात किंवा चेन्नई भारतातले प्रमुख शहर का असेना किंवा ‘गॉड’स ओन कंट्री’ म्हणून ओळखले जाणारे केरळ कितीही सुंदर का असेना; तरी या सगळ्या भागांतल्या लोकांची सुप्त इच्छा असते बेंगलोरला जाण्याची… Continue reading बेंगलोर डायरी :९

संत, पंत, तंत  काव्यविषयक लेखमाला: ९

पंतकवी वामन पंडित – काव्यालंकार  पद प्रमेयाचे गुंफणे| श्यामाभुजबंधाते जिणे| कोवळीक घाली सीरणे | शिरीष पुष्पांसी| कवितेतील शब्द आणि अर्थ यांचा सुरेल सुघड संयोग घडला की अशा काव्यसुंदरीपुढे अत्यंत देखण्या  श्यामसुंदरीचे आलिंगनही फिके पडते! महानुभाव भास्कर पंडित अलंकृत काव्याचं असं कौतुक करतात.  अलंकारांनी विनटलेली ही कवितासुंदरी वामन पंडितांच्या काव्यात कशी… Continue reading संत, पंत, तंत  काव्यविषयक लेखमाला: ९

यमकातली मौज – समुद्रक यमक

पूर्ण वाक्याचे यमक हा एक कष्टसाध्य प्रकार. काव्यातील उत्स्फूर्तता यात नसते. पहिल्या वाक्यात  अक्षरे ज्या क्रमाने असतात त्याच क्रमाने दुसर्‍या वाक्यात असतात; पण दोन्ही वाक्यांचे अर्थ वेगवेगळे असतात.  या कवितेत  कृष्णभक्त गवळण, तिचा संशयी, विकारी पती आणि तिला पाठीशी घालणारा, समजून घेणारा तिचा सखा अशी पात्रे आहेत.  पतीच्या मनात तिच्या… Continue reading यमकातली मौज – समुद्रक यमक

कविता : युगानुयुगे

युगानुयुगे  प्रत्येक दारासमोर अखंड उभा असतो तो शांतपणे, न थकता, न कंटाळता अनंतकाल, अविचल अहेतुककृपासिंधु दार उघडले जाण्याची वाट बघत दिसत नाही तो आपल्याला कारण आपल्याला तो बघायचाच नसतो आपल्याला हवी असते फक्त आपली इच्छापूर्ती तीही पावशेर पेढ्यांच्या बदल्यात तोही पावतो म्हणा कधीतरी, कोणाला त्याच्यावरचा आपला विश्वास कापराप्रमाणे जळून जाऊ… Continue reading कविता : युगानुयुगे

 पुनर्भेट नॅशनल पार्कची ८ 

  उन्हाळ्यातील आठवणी   २९.४.२०२४                                                              एप्रिल महिना संपत आला आणि तापत्या उन्हाच्या झळा सुरू झाल्या. दहिसर नदीच्या शेजारी उभी असलेली ताम्हण बहरून आली.  सोनमोहराचा पिवळाधमक बहर ओसरू लागला आणि त्याची जागा ताम्हणीच्या निळ्या जर्द  फुलांनी घेतली. या तळपत्या उन्हात एक हरणाचं पाडस नदीकिनारी असलेल्या उद्यानाच्या भिंतीच्या   नाल्यातून घसरून सात ते आठ मीटर… Continue reading  पुनर्भेट नॅशनल पार्कची ८ 

ग्रंथयात्रा – एक प्रवास  ६

ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी  वेगवेगळ्या  मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे.  यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी… बाळ सीताराम मर्ढेकर यांना मराठीतील नवकवितेचे जनक मानलं जातं. परंपरागत कविसंकेत आणि प्रतिमा झुगारून त्यांनी कोणत्याही चौकटीत न… Continue reading ग्रंथयात्रा – एक प्रवास  ६

कविता : वटसावित्री ते वटधरित्री 

वटपौर्णिमा किंवा सावित्री म्हटले की मला उगीच फार जवळचे वाटते; कदाचित जोतिबांच्या सावित्रीमुळे असेल, कदाचित मूळ कथेचा खोल अर्थ डॉ. तारा भवाळकर यांनी समजावून दिल्यामुळे असेल; पण त्या स्पष्टीकरणानंतर सत्यवानाच्या सावित्रीचे फार कौतुक वाटले. तिच्या नशिबी जे आले ते तिने गपगुमान स्वीकारले नाही; प्रत्यक्ष यमाशी वाद घातला, चातुर्याने आपल्या मागण्या पूर्ण… Continue reading कविता : वटसावित्री ते वटधरित्री 

 रद्दीतील रत्ने ( ४ ): ताजमहालची अपार्थिवता 

   अंतर्नाद मासिकाच्या जून महिन्याच्या अंकात  माझा ‘वा! ताज’ या शीर्षकाखाली जो लेख प्रसिद्ध झाला आहे त्या लेखात ताजमहाल ही वास्तू बघितल्यानंतर विविध परदेशी प्रवाशांच्या  कशा प्रतिक्रिया होत्या याचा आढावा घेतला. या सर्व प्रतिक्रियांचा मध्यवर्ती आशय असा होता की ताजमहाल ही एक अत्यंत सुंदर, स्वर्गातून पृथ्वीवरती अवतरलेली अद्भुत वास्तू असून  या… Continue reading  रद्दीतील रत्ने ( ४ ): ताजमहालची अपार्थिवता 

कोट्यधीश भारतीय संगीत 

(हा लेख कणकवलीत वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान  आयोजित एका संगीत रसग्रहण कार्यशाळेच्या दरम्यान झालेल्या चर्चेच्या आधाराने  लिहिला आहे.) भाग पहिला  संगीताचा अभ्यास करायचा म्हटलं की लोक पळ काढतात. कुठल्याही गोष्टीचा मुळात  अभ्यास करावा लागतो हीच संकल्पना मागे पडत चालली आहे. नीट अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून कलेचा आस्वाद घेतला पाहिजे… Continue reading कोट्यधीश भारतीय संगीत 

अभिवाचन भाग ५

ग्रंथाली प्रकाशित ‘मोरपिसं’ या अनुराधा गानू लिखि त ललित लेखांच्या अभिवाचनाची शृंखला आपण  सुरू केली आहे.   लेखिकेचा परिचय…  १९७८ सालापासून अमेरिकेत वास्तव्य होतं. टॅक्स आणि अकाउंटिंगचा स्वतःचा व्यवसाय. लॉस एंजेलिसच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्यानं सक्रिय सहभाग. वाचन, लेखन, नाट्य, अभिनय यांची आवड.  स्थानिक संगीतकार गोपाळ मराठे यांनी संगीतबद्ध केलेल्या व… Continue reading अभिवाचन भाग ५

गर्भाशयं

 खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एकूणच शवविच्छेदनं फार कमी होतात – होतच नाहीत म्हणू शकतो. आलीच क्वचित तर लहान बाळांची शवविच्छेदनं येतात; त्यामुळे स्टाफमध्ये शवविच्छेदन करण्याचा उत्साह कमीच. अशातच एक दिवस दुपारी बालविभागातला शवविच्छेदनाचा कॉल आला, requisition फॉर्म्सवर पालकांची मान्यतेची सही नाही म्हणून परत पाठवला. वस्तुस्थिती अशी आहे की पालक शवविच्छेदनासाठी सहसा… Continue reading गर्भाशयं

मेनका 

कुर्ल्याच्या लोकमान्य टर्मिनसला गाडी लांबचा भोंगा वाजवून थांबली आणि मेनकाने तिचे लांबसडक काळेसावळे हात पूर्व-पश्चिम पसरत मोठ्ठा आळस दिला. उतारूंच्या नजरा लगोलग तिच्याकडे वेधल्या गेल्या – होतीच ती तशी. नाकीडोळी नेमकेपणा, पांढरेशुभ्र हसरे दात, उंच उचललेल्या  इंद्रधनुष्यी भुवया, उंच गर्दन, सडसडीत मोहक बांधा, बऱ्यापैकी उंची आणि मुख्य म्हणजे या सगळ्याची… Continue reading मेनका 

एकलेपणाची आग

एकाकीपण आणि शारीरिक आरोग्य                                      माझा न्युरॉलॉजिस्ट मित्र  त्याच्याकडे आलेल्या एका पेशंटचा किस्सा सांगत होता.   ८५ वर्षांची महिला हाताला मुंग्या येतात म्हणून त्याच्याकडे आली होती. त्या एकट्याच असतात. मूलबाळ नाही, नवरा जाऊन काही वर्षे झाली –निवृत्त शिक्षिका.  माझा मित्र म्हणाला “तुम्ही एकट्याच असता तर!”                               “हो डॉक्टर, मी एकटी असते; पण… Continue reading एकलेपणाची आग

मोह-गीते उत्तर

मोह-गीते उत्तर १)मुझे तेरी मुहब्बत का सहारा मिल गया होता २)तदबीर से बिगडी हुई…ले ३)लिखे जो खत तुझे…. बन गए ४)ऐ दिल मुझे बता दे…. है ५)हम बेखुदी में तुम को… हम ६)मेरा सुंदर सपना बीत गया ७)याद ना जाए…. सताए ८)एरी मैं तो प्रेमदीवानी… कोय ९) ये चाँद सा… Continue reading मोह-गीते उत्तर

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

श्रेयनामावली 

 मार्गदर्शक: भानू काळे

 संपादक: अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार: सुषमा जोशी 

तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे

Author

3 thoughts on “जुलै २०२४

  1. बावनकशी सोनं, तात्यासाहेब अर्थात आमचं ज्ञानपीठ कवी कुसुमाग्रज तथा वि.वि शिरवाडकर! सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते,उठतील त्या ज्वालेतून‌ भावी क्रांतिचे नेते…आज सगळा चोथा झालाय.. राष्ट्रीय पातळीवर देशभक्ती कुटुंब वत्सले वाटत नाही.

  2. संपादकीयामधे मांडलेला व्यावसायिक संघटनानीं स्वहिताबरोबर परमार्थ ही साधावा हा विचार खूप आवडला

Leave a Reply