ग्रंथयात्रा – एक प्रवास  ६

ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी  वेगवेगळ्या  मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे.  यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी…

बाळ सीताराम मर्ढेकर यांना मराठीतील नवकवितेचे जनक मानलं जातं. परंपरागत कविसंकेत आणि प्रतिमा झुगारून त्यांनी कोणत्याही चौकटीत न बसणारी एक स्वतंत्र प्रवृत्तीची कविता लिहिली. वाचकांना वस्तुस्थितीचे भान यावे आणि त्यातून जीवनातील मंगल, शाश्वत मूल्यांकडे मानवाची वाटचाल व्हावी ही मर्ढेकरांची कवितेमागील प्रेरणा होती.१९४७ मध्ये त्यांचा ‘काही कविता’ हा संग्रह प्रकाशित झाला आणि यातील कवितांनी वाचकांच्या संवेदनशीलतेला प्रचंड हादरा दिला. कशी होती ही नव्या वळणाची कविता? पाहू या, या व्हिडिओमध्ये. अक्षयकुमार काळे यांच्याकडून ऐकू या, या कवितेवर उमटलेली प्रतिक्रिया.

ग्रंथयात्रा भाग ३३ – मर्ढेकरांची कविता

Author

Leave a Reply