मुखपृष्ठाविषयी :  जुलै  २०२४  

चाफा 

Genus : Plumeria 

छायाचित्र : शुभांगी जोशी 

चाफा बोले ना 

चाफा बोले ना, चाफा चाले ना 

चाफा खंत करी काही केल्या फुले ना 

गेले आंब्याच्या बनी म्हटली मैनांसवे गाणी 

आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे 

गेले केतकीच्या बनी

 गंध दरवळला वनी 

नागासवे गळाले देहभान रे 

चल ये रे, ये रे गड्या नाचु ,उडू, 

घालु फुगड्या

 खेळु झिम्मा झिम्‌पोरी झिम्‌पोरी झिम्‌ 

हे विश्वाचे अंगण आम्हां दिले आहे आंदण 

उणे करू आपण दोघेजण रे 

जन विषयाचे किडे 

यांची धाव बाह्याकडे 

आपण करू शुद्ध रसपान रे 

चाफा फुली आला फुलून 

तेजी दिशा गेल्या आटुन 

कोण मी – चाफा? कोठे दोघे जण रे? 

गीत – कवी ‘बी’ 

संगीत – वसंत प्रभु 

स्वर – लता मंगेशकर

Author

Leave a Reply