ऑगस्ट २०२४

मद्रास ते चेन्नई   

 शनिवार, १३ जानेवारी २०२४.     चेन्नईच्या कामराज डोमेस्टिक विमानतळावर मी आणि माझा पंढरपूरचा मित्र डॉ. अनिल जोशी यांनी पाऊल ठेवले तेव्हा रात्रीचे दोन वाजत आले होते. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या चौदा जानेवारीची सुरुवात झाली होती. पुण्याहून निघालेली आमची फ्लाइट तशीही मध्यरात्रीच पोचणार होती आणि त्यातही पुन्हा त्या दिवशी ती तब्बल दोन तास लेट… Continue reading मद्रास ते चेन्नई   

राम दिखाया पत्थरों ने : ( ५)

राम दिखाया पत्थरों ने : ५ रामकथा ही भारतीय संस्कृती आणि धर्माचा एक अविभाज्य भाग आहे. रामायण महाकाव्यातील कथानकावर आधारित अनेक कलाकृती निर्माण केल्या गेल्या आहेत; त्यांमध्ये  शिल्पकला हाही  एक महत्त्वाचा प्रकार आहे. रामकथेचे शिल्पांकन  अनेक रूपांत आढळते. अनेक मंदिरांवर  रामायणामधील विविध प्रसंगांचे शिल्पांकन पाहायला मिळते.  या शिल्पांमध्ये रामायणातील प्रमुख… Continue reading राम दिखाया पत्थरों ने : ( ५)

 निमित्त एक कविता : कृत्रिम बुद्धिमत्तेचा अचाट अनुभव 

     मिरो आणि किआन ही माझी जुळी नातवंडे. नुकतीच त्यांना पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. सुजन – त्यांचा सुजी, हा माझा धाकटा मुलगा. सर्व जण अमेरिकेत स्थायिक आहेत. मिरो आणि किआनचा जन्मदेखील अमेरिकेतील. त्यांना मराठी येत नाही. अमेरिकेत असलेल्या नातवंडांबरोबर भारतातील आजी-आजोबांनी कसा संपर्क साधावा, आपल्या अनुभवांची बरी-वाईट, उपयुक्त असलेली वा… Continue reading  निमित्त एक कविता : कृत्रिम बुद्धिमत्तेचा अचाट अनुभव 

प्रश्नोपनिषद

मंडळी,  या अंकापासून एक नवीन सदर सुरू करत आहोत.  आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.  या वेळचा प्रश्न आहे –  अवैदिक/ अब्राह्मणी संकल्पना आणि आदर्श  हे या देशाचे खरे स्थानिक तत्त्वज्ञान आहे का ?  उत्तरासाठी शब्द मर्यादा  ३०० शब्द.  आमच्या… Continue reading प्रश्नोपनिषद

बेंगलोर डायरी : १०

    जेव्हा तुम्ही रेल्वेने बेंगलोरला उतरता तेव्हा तुम्ही क्रांतिवीर संगोळी रायण्णा स्थानकावर उतरता. आपण त्या नावाकडे फारसे लक्ष न देता बेंगलोर स्टेशन म्हणत ते नाव अगदी कानामागे टाकून पुढे जातो. मुळात आपल्याकडे स्टेशनला, विमानतळांना, गावांना दिली जाणारे नावं हा एक वेगळाच विषय आहे. अर्थात अनेकदा त्यामागे विशिष्ट स्मृती जागवणे हा… Continue reading बेंगलोर डायरी : १०

संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला भाग १० 

वामन पंडित आणि २५ वृत्तांचा पट संस्कृत पंडित असलेल्या वामनांचं  मराठी भाषेवर उदंड प्रेम होतं. मराठी भाषेबद्दल ते म्हणतात —  ऐसी ही नवयुवा सुंदरी॥ वाग्विलासें नृत्य करी॥ भाषा संस्कृताभीतरी|| गूढध्वनी||  तें सकळां नकळें॥  संस्कृतातलं हे गूढ उकलणं महत्त्वाचं.  म्हणोनी ओवियें गाइलें॥ प्राकृत जन भोळे ॥  तृप्त कराया || ते म्हणतात,… Continue reading संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला भाग १० 

तस्मै श्री गुरवे नमः 

आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो. आज पंचाहत्तरीत मागे वळून पाहताना,आयुष्याचा जमाखर्च मांडताना मला आठवतात ते माझे निवडक शिक्षक. त्यांतील बहुतेक आज हयात नाहीत; पण आयुष्यातील त्यांचे स्थान ध्रुवासारखे अढळ आहे. शाळेतले शिक्षक तर कुणालाच विसरता येत नाहीत. सुरुवात तिथूनच करतो. कायमचा ठसा उमटवणारे दोन शिक्षक – याचा अर्थ… Continue reading तस्मै श्री गुरवे नमः 

फटका

(दृश्यपत्रकारिता)  हरिभगिनी वृत्त  (८,८,८,६) (अंतरा असेल तर ८+६) (चाल: एरवी श्रावणमासी  हा फटका आहे म्हणून चाल: बिकट वाट वहिवाट नसावी)  फटका म्हणजे समाजातील वाईट प्रवृत्तींवर ओढलेला आसूड. अनंतफंदींनी  फटका हा काव्यप्रकार प्रसिद्ध केला. कुसुमाग्रजांचा स्वातंत्र्यदेवतेची विनवणी हा फटकाही याच वृत्तात आहे.  दृश्यपत्रकारिता पत्रकारिता कशी नसावी| नमुना त्याचा होउ नको| लोकशाहिच्या|… Continue reading फटका

पाऊस चित्रातला,पाऊस मनातला !

निसर्ग हा अफलातून कलाकार आहे. त्याने सजवलेल्या  विविध रूपांमुळे, अनोख्या जडणघडणीमुळे, अनेक दृश्य-अदृश्य पैलूंमुळे माणूस मंत्रमुग्ध होऊन जातो. कधीकधी तर त्याचे वर्णन  शब्दांमध्ये करणेही शक्य होत नाही. भारत देशावर  निसर्गाने  मुक्त उधळण केली आहे.  बऱ्याचदा  वाटते,  काही भारतीयांना या विशाल समृद्धतेची जाणीवदेखील नाही.  काही देशांमध्ये कंटाळवाणे फक्त दोनच ऋतू असतात;… Continue reading पाऊस चित्रातला,पाऊस मनातला !

पुनर्भेट नॅशनल पार्कची ९  

वाघिणीचं बाळंतपण                  बाजीराव आणि श्रीवल्ली यांच्या मिलनाबद्दल मी पूर्वीच लिहिलं आहे. आता आम्हांला उत्सुकता होती ती गरोदर आहे की नाही याची. तिच्याजवळ नेहमी काम करणारा गोपाळ म्हणाला, “मॅडम तिच्या पोटाची वाढ झाल्यासारखी वाटते आहे.  ती शांत झाल्यासारखी वाटते आहे.”  वाघांच्या  पिंजऱ्याची स्वच्छता आणि  त्यांना रोजचं बीफ देणं ही कामं… Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची ९  

गंधर्व गौरव गाथा 

१५ जुलै हा नारायण श्रीपाद राजहंस  उर्फ बालगंधर्व (१८८८-१९६७) यांचा स्मृतिदिन. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबई दूरदर्शनवर ‘गंधर्व गौरव’ हा १३ भागांचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. त्याची निर्मिती श्रीमती सुहासिनी मुळगावकर यांनी केली होती. सह्याद्री दूरदर्शनच्या Youtube channel वर यातील बहुतांश भाग उपलब्ध असले तरी त्यांच्या-त्यांच्या thumbnail मध्ये दिलेली माहिती आणि… Continue reading गंधर्व गौरव गाथा 

ग्रंथयात्रा – एक प्रवास ७

ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी  वेगवेगळ्या  मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे.  यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी… बा. भ. बोरकरांची कविता ही निसर्गातील सौंदर्याचा आणि जीवनातील प्रीतीचा रसिकतेने आस्वाद घेणारी आणि ती अनुभूती विलक्षण… Continue reading ग्रंथयात्रा – एक प्रवास ७

पंचमी सामाजिक सौहार्दाची 

फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोले पंचमीचा सण आला, डोळे माझे ओले श्रावणाच्या शिरव्यांनी आनंदली धराराणी माझे पण प्राणनाथ घरी नाही आले जळ भरे पानोपानी, संतोषली वनराणी खळाखळा वाहतात धुंद नदीनाले पागोळ्या गळतात, बुडबुडे पळतात भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले आरशात माझी मला पाहू बाई किती वेळा वळचणीची पाल काही भलेबुरे… Continue reading पंचमी सामाजिक सौहार्दाची 

शब्दकोडे 

देशकूट हे देशकूट आहे.गाळलेल्या जागा भरून जो शब्द तयार होईल, तो त्यापुढील कंसात दिलेल्या देशाशी निगडित असेल. (उदा.द – – – – द ( ६, पाकिस्तान) याचे उत्तर दहशतवाद हे बरोबर ठरेल.)  १.⁠ ⁠बा – – श (४, पोर्तुगाल) २.⁠ ⁠रा – – ती ( ४, फ्रान्स ) ३.⁠ ⁠खि – -… Continue reading शब्दकोडे 

 रद्दीतील रत्ने ( ५ )

येरे येरे ओबामा      दिनांक १९.७.२०१५ या दिवशीच्या मुंबई सकाळच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या  लेखावर आधारित मी हा लेख लिहीत आहे. सप्तरंगमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचे शीर्षक आहे ‘येरे येरे ओबामा.’  नागराज शंकर सिद्दी या नव्या मुंबईतील हॉटेल रॉयल ट्युलिपमध्ये  वेटर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या  सस्मित चेहऱ्यात  व अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक… Continue reading  रद्दीतील रत्ने ( ५ )

अभिवाचन भाग ६

ग्रंथाली प्रकाशित ‘मोरपिसं’ या अनुराधा गानू लिखित ललित लेखांच्या अभिवाचनाची शृंखला आपण  सुरू केली आहे.   लेखिकेचा परिचय…  १९७८ सालापासून अमेरिकेत वास्तव्य होतं. टॅक्स आणि अकाउंटिंगचा स्वतःचा व्यवसाय. लॉस एंजेलिसच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्यानं सक्रिय सहभाग. वाचन, लेखन, नाट्य, अभिनय यांची आवड.  स्थानिक संगीतकार गोपाळ मराठे यांनी संगीतबद्ध केलेल्या व श्रीधर… Continue reading अभिवाचन भाग ६

युद्ध : एक परिवर्तन बिंदू

   माध्यान्ह उलटून गेली होती. आभाळ कसं पसरट लांबलचक झालं होतं आणि  त्याला मनोहर केशरी रंगाची छटा येऊ लागली होती. कलिंग देशात घडलेल्या ताज्या रणधुमाळीचे लोटही त्यात मिसळू पाहत होते जणू! त्यामुळे त्या संध्यासमयातून रम्यतेची जागा खिन्नतेने घेतली होती. सम्राट-महासम्राट-चक्रवर्ती अशी चढत्या क्रमाची बिरुदं मिरवणारा अशोक राजा एका उंच टेकाडावर मनगट… Continue reading युद्ध : एक परिवर्तन बिंदू

शब्दकोडे उत्तर 

 १.⁠ ⁠बारदेश – पोर्तुगाल २.⁠ ⁠राज्यक्रांती -फ्रांस ३.⁠ ⁠खिलाफत – तुर्कस्तान ४.⁠ ⁠पवनचक्की – नेदरलँड्स ५.⁠ ⁠वर्णभेद – दक्षिण आफ्रिका ६.⁠ ⁠पर्यटन – थायलंड ७.⁠ ⁠राजघराणे – ब्रिटन ८.⁠ ⁠कापूस – इजिप्त ९.⁠ ⁠तेलसाठे – सौदी अरबस्तान१०.⁠ ⁠सुकामेवा – अफगाणिस्तान Continue reading शब्दकोडे उत्तर 

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

श्रेयनामावली 

 मार्गदर्शक : भानू काळे

 संपादक : अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी 

तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे

Author

Leave a Reply