१५ जुलै हा नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व (१८८८-१९६७) यांचा स्मृतिदिन. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबई दूरदर्शनवर ‘गंधर्व गौरव’ हा १३ भागांचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. त्याची निर्मिती श्रीमती सुहासिनी मुळगावकर यांनी केली होती. सह्याद्री दूरदर्शनच्या Youtube channel वर यातील बहुतांश भाग उपलब्ध असले तरी त्यांच्या-त्यांच्या thumbnail मध्ये दिलेली माहिती आणि त्या-त्या भागाचा प्रत्यक्षातील क्रम हा मेळ खात नाही. एकूणच माहिती देण्यात काहीतरी गोंधळ झालेला असावा. या कार्यक्रमाचे तपशील पुढील प्रमाणे –
सूत्रसंचालन आणि निवेदन – डॉ.अशोक रानडे
सहभाग – श्रीमती जयमाला शिलेदार, श्री.कृष्णराव चोणकर, श्रीमती श्रुती सडोलीकर-काटकर तसेच बालगंधर्वांच्या कन्या श्रीमती नलिनी वाबळे. साथीला असणाऱ्यांची नावे श्रेय नामावलीत दिसली नाहीत. ऑर्गनवर बहुधा श्री.तुळशीदास बोरकर.
अरुण आठल्ये यांनी या कार्यक्रमात दिलेल्या माहितीनुसार बालगंधर्वांनी २७ नाटकांमधून ३६ भूमिका केल्या; यांपैकी केवळ ७ पुरुष भूमिका होत्या; तर उर्वरित स्त्री भूमिका होत्या. आपले सौंदर्य ओसरल्यावर बालगंधर्वांनी पुरुष भूमिका केल्या ही श्री.आठल्ये यांची टिप्पणी बरेच काही सांगून जाते.
या कार्यक्रमामध्ये आपल्या लहानपणी संगीत स्वयंवरचा पहिला प्रयोग पाहिलेले श्री.रसिकभाई हे गुजराती भाषक बोलले. त्यांना त्यांचे वडील नाटकाला घेऊन गेले होते. या नाटकाला गुजराती भाषक समाजातील अनेक सधन आणि प्रतिष्ठित हिंदू, जैन आणि पारशी व्यक्ती हजर होत्या. स्वयंवराच्या या आणि मुंबईत झालेल्या प्रयोगांची चर्चा चौपाटीवरील हिंदू मर्चंट्स क्लबमध्ये होत असे अशी आठवण श्री.रसिकभाई यांनी सांगितली आहे. जो तो एकमेकाला तुम्ही बालगंधर्वांचे स्वयंवर पाहिले का असे विचारत असत आणि पाहिले नसले तर, ‘अरे काय हे,’ अशा आशयाचे उद्गार काढत असत. मुंबईतील त्या काळातील आघाडीची गुजराती दैनिके असलेल्या मुंबई समाचार आणि सांज वर्तमानात या नाटकाबद्दल बातम्या येत असत आणि हे प्रयोग बघायला आलेल्या प्रेक्षकांमधील अर्धे प्रेक्षक हे गुजराती भाषक असत. या नाटकाच्या लोकप्रियतेमुळे season ticket हा प्रकार सुरू झाला असेदेखील त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन आणि निवेदन – डॉ.अशोक रानडे
सहभाग – श्रीमती जयमाला शिलेदार, श्री.कृष्णराव चोणकर, बालगंधर्वांच्या कन्या श्रीमती पद्मा खेडेकर आणि अविनाश आणि शुभांगी तावडे तसेच श्री.अरुण आठल्ये आणि बालगंधर्व यांचे पुतणे श्री.वसंत राजहंस.
३. हा भाग उपलब्ध आहे असे दिसत नाही. ४ थ्या भागातील निवेदनातील उल्लेख पाहता या भागात पं.राम मराठे यांचा सहभाग होता असे दिसते.
सूत्रसंचालन आणि निवेदन – श्री.दाजी भाटवडेकर
सहभाग – श्री.जयराम शिलेदार, श्रीमती अंजनीबाई लोलेकर, श्रीमती कुसुम शेंडे आणि श्रीमती योजना सप्रे (शिवानंद).
सूत्रसंचालन आणि निवेदन – श्री.विद्याधर गोखले
सहभाग – श्रीमती माणिक वर्मा, श्री. बबनराव नावडीकर आणि श्रीमती कल्याणी देशमुख
सूत्रसंचालन आणि निवेदन – श्री. विद्याधर गोखले
सहभाग – श्री. भार्गवराम आचरेकर, श्री.अप्पासाहेब देशपांडे, श्रीमती फैयाझ आणि श्रीमती सुचेता अवचट-ठोमरे
सूत्रसंचालन आणि निवेदन – श्री. रघुवीर नेवरेकर
सहभाग – श्रीमती योगिनी जोगळेकर, श्री.महमद हुस्सैन खान आणि श्रीमती मधुवंती दांडेकर.
श्री.खान यांचे वडिल नामवंत सारंगीवादक
श्री.कादर बक्ष खान.
कादर बक्ष आणि महमद हुस्सैन खान या दोघांनीही बालगंधर्वांना सारंगीवर साथ दिली. गंधर्व नाटक मंडळीच्या दौऱ्यांबद्दलच्या श्री.खान यांनी सांगितलेल्या आठवणी रोचक आहेत.
८. हा भाग उपल्बध नाही.
सूत्रसंचालन आणि निवेदन – श्रीमती निर्मला गोगटे
सहभाग – श्रीमती पद्मावती शाळिग्राम-गोखले,
श्री.पुरुषोत्तम वालावलकर, डॉ.क्षमा वैद्य, श्री.चंद्रकांत कोळी आणि श्री. संजय देशपांडे.
श्री.देशपांडे यांचे वडील श्री.हरीभाऊ देशपांडे हे बालगंधर्व यांना ऑर्गनवर साथ देत असत.
सूत्रसंचालन आणि निवेदन –
श्री.पुरुषोत्तम दारव्हेकर
सहभाग – श्री.भालचंद्र पेंढारकर, श्रीमती रजनी जोशी, श्रीमती शशी सडोलीकर-भिडे, श्री.धनंजय जोशी
सूत्रसंचालन आणि निवेदन – श्री.सुधीर दामले
सहभाग – श्रीमती इंदिराबाई खाडिलकर,
श्री.दादासाहेब नाईक, श्रीमती वर्षा भावे आणि श्रीमती मेधा गोगटे
सूत्रसंचालन आणि निवेदन – श्री.पुरुषोत्तम दारव्हेकर
सहभाग – श्रीमती नीलाक्षी जुवेकर, श्री.पांडुरंग काळे, श्रीमती सुनीता गुणे आणि श्रीमती आशा खाडिलकर
सांगता करणारा भाग. सूत्रसंचालन आणि निवेदन – श्रीमती सुहासिनी मुळगावकर
सहभाग – श्रीमती मीनाक्षी शिरोडकर, श्री.विद्याधर गोखले, श्री.सुधीर फडके, श्री.चंद्रकांत काळे, श्री.ओंकार दादरकर आणि श्रीमती प्रज्ञा जावळे.
अभय दातार
