प्रश्नोपनिषद

मंडळी, 

या अंकापासून एक नवीन सदर सुरू करत आहोत.  आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा. 

या वेळचा प्रश्न आहे – 

अवैदिक/ अब्राह्मणी संकल्पना आणि आदर्श  हे या देशाचे खरे स्थानिक तत्त्वज्ञान आहे का ? 

उत्तरासाठी शब्द मर्यादा  ३०० शब्द. 

आमच्या या पहिल्याच प्रश्नाला मार्गदर्शक भानू काळे यांनी दिलेले उत्तर खालील प्रमाणे : 

एके काळी केवळ भारतातीलच नव्हे तर जगातल्या सर्वच देशांतील सर्वच माणसे चक्क जंगली होती, पशुवत जगत होती.  त्यांना ना कसले आदर्श होते, ना कसले तत्त्वज्ञान होते.  त्याचे उदात्तीकरण कशासाठी करायचे?

एकूण मानवी इतिहासाचे परिप्रेक्ष्य विचारात घेतले तर संस्कृती ही संकल्पनाच तुलनेने अगदी अलीकडची आहे. त्या अर्थाने आपण सगळेच आदिवासी आहोत. 

जीवनाच्या शर्यतीत स्वतःला थोडा अधिक वाव मिळावा, स्पर्धकांची संख्या कमी व्हावी म्हणून वेळोवेळी अनेक जण आपापल्या कार्यक्षेत्रांतील मतदारसंघ छोटे छोटे करत राहतात. त्यामागे केवळ स्वार्थ असतो. 

आपली उत्तरे/प्रतिसाद  सदराच्या खाली कॉमेंट स्वरूपात देऊ शकता किंवा ई-मेल द्वारा jaysss12@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकता. 

आपले मत आपण 9422647283 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारादेखील पाठवू  शकता. 

आणि हो, 

 या सदरासाठी आपल्याला पडलेले अशा प्रकारचे प्रश्नदेखील आपण पाठवू शकता. 

संपादक 

Author

Leave a Reply