मुखपृष्ठाविषयी – Bar-headed Goose
Bar-headed Goose (Anser indicus) Clicked by Dr Salil Choksi at Bhigwan (Pune-Solapur highway), The Astronaut Goose ! A fascinating Goose that breeds in the high altitude lakes of Tibet and winters in the wetlands of peninsular India. Geese are the highest flying birds. During it’s annual migration, it flies across… Continue reading मुखपृष्ठाविषयी – Bar-headed Goose
संपादकीय – पुनर्वसनाच्या वाळवंटातील हिरवळ, मुक्काम पोस्ट चिंचणी
विकास का पर्यावरण ही चर्चा आपण तावातवाने व सतत करतो. पांढरपेशे देश व माणसे प्रायः पर्यावरणाच्या बाजूने बोलतात; तर विकसनशील देश व गरीब माणसे विकासाच्या बाजूने! खरेतर गरिबांना आपली पोटाची आग विझवण्यात असल्या चर्चांमध्ये भाग घेण्याची कुवतच नसते. आदिवासी संस्कृती तशीच राहावी असे बहुतांशी पांढरपेशा विद्वानांनाच वाटत असते. वाढत्या लोकसंख्येच्या… Continue reading संपादकीय – पुनर्वसनाच्या वाळवंटातील हिरवळ, मुक्काम पोस्ट चिंचणी
प्रतिसाद
अंतर्नाद नव्या माध्यमात प्रकाशित होत आहे ही घटना खूप आश्वासक आहे. मुखपृष्ठापासून ते विषयवैविध्य व त्यांची गांभीर्यपूर्ण हाताळणी उल्लेखनीय व अंतर्नादची भावी दिशा दाखवणारी आहे. वाचकांचा प्रतिसाद व सूचना यांनुसार त्यात आवश्यक बदल वेळोवेळी होतील ही खात्री आहे. छापील अंतर्नादचा प्रवास थांबवताना भानू काळे यांना किती मानसिक त्रास झाला असेल याची… Continue reading प्रतिसाद
कविता – आला मानव राशीला …
पाहुनिया चांद्रयान शनि सांगे मंगळाला तुझ्या माझ्या कुंडलीत आला मानव राशीला. दत्तप्रसाद दाभोळकर Continue reading कविता – आला मानव राशीला …
रवींद्रनाथांची स्त्रीविषयक धारणा व भूमिका
रवींद्रनाथांची स्त्रीविषयक धारणा,भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या साहित्य रचना : कथा ,कादंबऱ्या, लेख ,पत्रं यांचा उपयोग होतो; शिवाय त्यांच्याच घरातून प्रसिद्ध होणाऱ्या ‘भारती’ या मासिकात त्यांनी केलेल्या लेखनाचाही! या भारती पत्रिकेची संपादक होती त्यांची ज्येष्ठ दीदी स्वर्णकुमारी देवी घोषाल. ती अत्यंत बाणेदार आणि तल्लख बुद्धिमत्ता असलेली स्त्री होती. तिनेही… Continue reading रवींद्रनाथांची स्त्रीविषयक धारणा व भूमिका
‘आमच्या’ वेळी असे नव्हते!
ही ‘आमची’ वेळ म्हणजे कोणती वेळ ? ‘आमची’ वेळ म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हाची वेळ; पण लहान असलो तरी आजूबाजूचे व्यवहार समजण्याइतके तेव्हा मोठे होतो. नंतर तरुण वयात तर आम्हांला आणखी खूप काही दिसायला, समजायला लागलं. आजूबाजूला त्यावेळी आम्ही जे काही पाहत होतो त्या वस्तू, ती माणसं, त्यांचे व्यवहार… Continue reading ‘आमच्या’ वेळी असे नव्हते!
ओ माझी रे …
आज सकाळी अचानक ‘ओ माझी रे …’ ची सुरावट कानावर आली . तसे हे गाणे अनेक वेळा ऐकलेले आहे; पण आज त्यातल्या शब्दांकडे जरा जास्तच लक्ष गेले . ‘ओ माझी रे अपना किनारा नदिया की धारा है|साहिलो पे बहनेवाले कभी सुना तो होगा कहीकागजोकी कश्तियोंका कहीं किनारा होता नहींओ माझी… Continue reading ओ माझी रे …
केशवराव कोठावळे : मराठी साहित्याचा वसंतऋतु
Lives of great men all remind us, We can make our lives sublime, And, departing, leave behind us, Footprints on the sands of time. (श्रेष्ठ अमेरिकन कवी हेन्री वॅड्सवर्थ लॉन्गफेलो याच्या दोनशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या अजरामर ओळी) मॅजेस्टिक शब्दाचा अर्थ आहे भव्य, दिव्य, नेत्रदीपक. ते विशेषण सामान्यतः एखाद्या खूप मोठया वास्तूला… Continue reading केशवराव कोठावळे : मराठी साहित्याचा वसंतऋतु
उच्च शिक्षणाचा गाभा – भाग १ – रेड इंडियन
उच्च शिक्षणाचा गाभा – भाग १ – रेड इंडियन परदेशी आलेल्यांपैकी बरेच जण मूलत: उच्च शिक्षणासाठी परदेशात येतात. यावर आपण एक मूलभूत प्रश्न विचारू या – उच्च शिक्षण – मग ते मायदेशात असो वा परदेशात, आपल्याला नक्की कशासाठी उच्च शिक्षण हवं आहे? त्या मागचा आपला उद्देश काय आहे? खरं सांगू… Continue reading उच्च शिक्षणाचा गाभा – भाग १ – रेड इंडियन
पुस्तक परीक्षण – ‘In the name of Honour’
‘बलात्कार’ हा शब्दच इतका भयावह आहे की उच्चारतानासुद्धा माणसाला त्रास होतो आणि असा प्रसंग जिच्या वाट्याला येतो तिचे तर आयुष्य उद्ध्वस्त होतेच; त्याचबरोबर ते कुटुंबही उद्ध्वस्त होते; पण अशाही काही वीरांगना असतात,ज्या अशा प्रसंगाचा अत्यंत झुंजारपणे सामना करतात, त्याला सामोऱ्या जाऊन आपल्या समाजासाठी काही काम करण्यासाठी उभ्या राहतात. अशांतीलच एक… Continue reading पुस्तक परीक्षण – ‘In the name of Honour’
आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे – भाग २
माणसं आपल्याला कधी ना कधी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भेटत असतात ;मग ती कुठल्याही क्षेत्रातली असोत. त्यांचा थोडा सहवासही आपल्याला खूप काही देऊन जातो, शिकवून जातो.काही वर्षांपूर्वी असंच एक असामान्य, अलौकिक व्यक्तिमत्त्व मला भेटलं, ज्यांचं नाव आहे आहिताग्नि राजवाडे. खरंतर त्यांना मी प्रत्यक्ष पाहिलं नाही, ऐकलंही नाही; तरीही ते मला भेटले असं मी म्हणतेय.… Continue reading आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे – भाग २
गोष्ट अफगाणिस्तानची
इंग्रजांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले, भारताला लुटले, भारताची शिक्षणपद्धती बदलून आपल्याला बौद्धिक गुलाम केले. (ज्या गुलामगिरीतून आपण अजून पूर्णपणे मुक्त झालेलो नाही.) आपल्यावर अत्याचार केले वगैरे सर्व गोष्टी अगदी पूर्णत: खऱ्या असल्या; तरी आपल्याला इंग्रजांच्या साहस व अभ्यासूवृत्ती या दोन गुणांचे कौतुक करावेच लागेल; किंबहुना त्यांच्या या दोन गुणांमुळेच… Continue reading गोष्ट अफगाणिस्तानची
बंध
चारी बाजूंना दूरवर पसरलेला पिवळा शुष्क माळ. त्यावर एकट्याने संकटांना झुंज देत वाढलेला धीरगंभीर विस्तीर्ण वड! एकाकी! कधीतरी वार्याच्या इवल्या झुळुकेवर भुरभुरत एक बीज येऊन पडलं. कोवळा गुलाबी-तपकिरी कोंब तरारला. स्वत:त निमिषानिमिषानं होत जाणारा बदल पाहून चकित होणारा. मश्गूल… आणि एका तिन्हीसांजेला मंद-मंजूळ संगीत त्याच्या कानावर आलं. अंगावर सुखद रोमांच… Continue reading बंध
बचत आणि गुंतवणूक
भारतीयांची मानसिकता पूर्वापारपासून बचत करण्याची आहे. बचतीचे महत्त्व अगदी ऋग्वेदापासून ते कौटिल्याच्या अर्थशास्त्रापर्यंत आणि नीतिशास्त्रापासून ते अगदी आत्ताच्या वर्तमानपत्राच्या अर्थविषयक पुरवण्यांपर्यंत सगळीकडे चर्चिलेलं आढळून येतं. भारतीय लोक जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी त्यांच्या रक्तात भिनलेली ही बचतीची वृत्ती तसूभरही कमी होत नाही आणि एवढंच नाही तर ती पुढच्या पिढ्यांमध्ये… Continue reading बचत आणि गुंतवणूक
मित्र नावाचा नातलग…
ना जवळचा ना लांबचा… पण हाकेच्या अंतरावरचा… मित्र नावाचा नातलग… ना जवळचा ना लांबचा…पण हाकेच्या अंतरावरचा… एकेकाळचा अनोळखी पण आता जिवलग ना जातीचा ना पातीचा ना रक्ताचा ना वंशावळीचा मीही तोच, तोच तूही मीपणाच नाही कुठे… वयं वाढली… बुद्धी वाढली… तशी इयत्ताही वाढत गेली… बालवाडीची झाली शाळा… शाळेचं झालं विद्यालय..… Continue reading मित्र नावाचा नातलग…
कविता – गोविंदा
थरावरी थर गगनी चढले ‘गोविंदें’ कान्हाला स्मरले उंच उभा तो तोल सावरी कंपित मन ते दहाव्या थरी ।।१।। हात पित्याचा यंत्रे गिळला मायमजुरी न पुरे भुकेला मातपित्यांच्या थरथर मनिची जाणवली चिमण्या जीवाला ।।२।। वय अवघे त्या थरांएवढे घरचि आपदा करी बापुडे खारीचा वाटा उचलाया पोर गोजिरे बहू धडपडे ।।३।। मातीचा… Continue reading कविता – गोविंदा
स्वागत - शिवराज्याभिषेक
श्रीशिवछत्रपतींचे संपूर्ण जीवन अवघ्या महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान आहे आणि त्यांच्या जीवनकालातील वेगवेगळ्या घटनांवर विपुल प्रमाणात लेखन आणि संशोधन झाले आहे. त्यांच्या जीवनातील परमोच्च बिंदू म्हणजे त्यांचा राज्याभिषेक आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्या दिवसापासून सुरू झालेला राज्याभिषेक शक. शिवराज्याभिषेकाविषयी मराठीत विपुल संशोधन आणि लेखन झाले आहे; परंतु ते सर्व… Continue reading स्वागत - शिवराज्याभिषेक
चंद्रयान-३ च्या निमित्ताने
२३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) वैज्ञानिक व तंत्रज्ञांनी चंद्रयान-३ मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम हे यान यशस्वीरित्या उतरवले. या मोहिमेतील ही अत्यंत महत्त्वाची पायरी होती. चंद्रयान-२ च्या मोहिमेत या टप्प्यावर इस्रोच्या पदरी अपयश पडले होते पण यावेळी यशाला गवसणी घालता आली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान… Continue reading चंद्रयान-३ च्या निमित्ताने
महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
श्रेयनामावली
मार्गदर्शक: भानू काळे
संपादक: अनिल जोशी
व्याकरण सल्लागार: सुषमा जोशी
व्यवस्थापन मंडळ: अजित कानिटकर, अनिल शिदोरे, उमाकांत घाटे, स्नेहा अवसरीकर
तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे

सवडीने वाचतो हा अंक
Digital अंका साठी हार्दिक शुभेच्छा 👏💐😊
Most of the articles are meanful, heart touching & inspirating.