कविता – गोविंदा

थरावरी थर गगनी चढले ‘गोविंदें’ कान्हाला स्मरले उंच उभा तो तोल सावरी कंपित मन ते दहाव्या थरी ।।१।। हात पित्याचा यंत्रे गिळला मायमजुरी न पुरे भुकेला मातपित्यांच्या थरथर मनिची जाणवली चिमण्या जीवाला ।।२।। वय अवघे त्या थरांएवढे घरचि आपदा करी बापुडे खारीचा वाटा उचलाया पोर गोजिरे बहू धडपडे ।।३।। मातीचा घट नजरेपुढती आशा त्याच्यासह हिंदळती  घटास छोटे हात शोधिती नोटा त्या वाकुल्या दाविती ।।४।। लोटत … Continue reading कविता – गोविंदा