एप्रिल २०२५

एप्रिल २०२५ : मुखपृष्ठाविषयी

या वेळचे मुखपृष्ठ छायाचित्रकार आहेत मुरुडचे किशोर चोळकर. ते मुरुडला पालवी कॉटेजेस या नावाने होम स्टे चालवतात.  छायाचित्रण  ही त्यांची आवड आहे व पक्ष्यांची छायाचित्रे काढणे यात त्यांना विशेष रस आहे. या वेळच्या छायाचित्राचा विषय असणारा, आपल्या मोहक निळसर वर्णाने बघणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा आकर्षक पक्षी म्हणजे ‘नीलपंख’(Indian Roller) निळा… Continue reading एप्रिल २०२५ : मुखपृष्ठाविषयी

 संपादकीय एप्रिल २०२५ 

रोखठोक भाषण  संपले…  बीबीसी (ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) ही जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रभावशाली सार्वजनिक सेवा प्रसारण  संस्था आहे. १८ ऑक्टोबर १९२२ साली या संस्थेची स्थापना झाली. ती एक स्वायत्त संस्था आहे.  गेली अनेक  दशके बीबीसीने निष्पक्ष आणि उच्च दर्जाचे कार्यक्रम, बातम्या आणि माहिती देऊन जगभरातील लोकांचा विश्वास संपादन केला आहे.… Continue reading  संपादकीय एप्रिल २०२५ 

दक्षिणचित्र

   चेन्नईपासून २५ किलोमीटर अंतरावर, मम्मलापुरमच्या वाटेवरच लागणारे ‘दक्षिणचित्र हेरिटेज म्युझियम’ प्रवाशांनी आवर्जून बघावे अशी शिफारस मी करेन. या म्युझियमची पूर्वी आम्हांला काहीच माहिती नव्हती. अगदी आयत्या वेळी आणि वाटेवरच असल्याने आम्ही तिथे थांबायचा निर्णय घेतला आणि मागे वळून बघताना तो अगदी योग्य होता असे वाटते.    आंध्र आणि तेलंगणा मिळून पूर्वीसारखे… Continue reading दक्षिणचित्र

आनंदाचा धबधबा – अनंत भावे

अनंत भावे पहिल्यांदा भेटले ते दूरदर्शनच्या पडद्यावर. दूरदर्शनवर तेव्हा ते आठवड्यातून तीन दिवस बातमीपत्र वाचून दाखवायचे काम करत. गोरापान तेजस्वी चेहरा आणि मधमाश्यांच्या पोळ्यासारखी दिसणारी दाढी (तेव्हा ती काळी होती!). डोक्यावरचे केस मागे जाऊ लागले होते. आपल्या भेदक आवाजात, सुस्पष्ट, अचूक उच्चारांत ते बातम्या देत असत. ते स्वतः अभिनेतेही असल्यामुळे… Continue reading आनंदाचा धबधबा – अनंत भावे

भारत गायन समाज – भाग ३

लेखन अनुभवएका सांस्कृतिक इतिहासाची शतकोत्तर वाटचालपुणे भारत गायन समाजएक सुरेल स्वरयात्रा – ११० वर्षांचा सांगीतिक प्रवास(भाग ३ ) आपण आपल्याच तंद्रीत चालत असावं आणि एका वळणावर अनपेक्षित मुक्कामी पोहोचावं, तसं मला या ग्रंथाचं लेखन करताना वाटलं. एक नाही, दोन नाही, अनेक दिवस. या वळणानं मला एका वेगळ्याच विश्वाची ओळख करून… Continue reading भारत गायन समाज – भाग ३

 संत, पंत, तंत — काव्यविषयक लेखमाला 

रघुनाथ पंडित भाग २ आधीच नैषधकथा नवनीत भेलाहोता अलंकरणरूप इच्या जिभेला… ||१०४||रघुनाथ पंडितांच्या काव्यपंक्तीतील हा छोटासा भाग नलदमयंती स्वयंवराचं मूळ काव्य आणि रघुनाथ पंडितांनी तिच्यावर चढवलेल्या अलंकारांचं रूप दाखवतं. लोण्याचा गोळा असावा अशी ही मृदू कथा आणि तिने परिधान केलेले अलंकार आणि आभूषणं!अलंकार हा शब्द कसा आला? संस्कृतात अलम् हे… Continue reading  संत, पंत, तंत — काव्यविषयक लेखमाला 

उच्च शिक्षण क्षेत्रात भविष्याचे नंतर पाहू; आधी वर्तमान सुधारू या!

  सध्या उच्च शिक्षणासंदर्भात विविध विषयांवर बरीच उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्यात गुणवत्ता तपासणारी मानांकन पद्धत, कुलगुरू निवडीची पद्धत, त्या संबंधीचे निकष, प्राध्यापक निवडीचे निकष, त्यासाठी लागणारी अर्हता, नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, पीएच. डी. संशोधनाचे निकष, प्रबंधांचा दर्जा, विद्यार्थी, पालक यांची शिक्षणाविषयीची अनास्था, विद्यार्थ्यांची गैरहजेरी अन् भविष्य काळात येऊ घातलेले… Continue reading उच्च शिक्षण क्षेत्रात भविष्याचे नंतर पाहू; आधी वर्तमान सुधारू या!

विनोबांच्या भूदान यज्ञामागील प्रेरणा

विनोबा भावे यांच्या भूदान यज्ञ चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लिहिलेला हा विशेष लेख या ऐतिहासिक अहिंसक चळवळीचा आणि तिच्या दूरगामी परिणामांचा आढावा घेतो. भूमिहीनांना जमीन मिळवून देण्याच्या उदात्त हेतूने सुरू झालेल्या या चळवळीने सामाजिक आणि आर्थिक बदलांना कशा प्रकारे चालना दिली, हे यात विशद केले आहे. वर्तमान परिस्थितीत या चळवळीचे… Continue reading विनोबांच्या भूदान यज्ञामागील प्रेरणा

पुनरपि जननं : प्रकरण दुसरे

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे… Continue reading पुनरपि जननं : प्रकरण दुसरे

झुकझुक आगीनगाडी  : लेख क्र.२ 

   रेल्वेमध्ये नोकर भरतीचे विविध प्रकार आहेत : १ रेल्वे भरती मंडळ (RRB) / भारतीय प्रशासनिक सेवा (UPSC)  यांच्याद्वारे  २ कला/खेळ  विशेष प्रावीण्यप्राप्त खेळाडूंची थेट भरती   ३ अनुकंपा तत्त्वावर भरती    ४ SCOUTआणि GUIDE यांत प्रावीण्य मिळवलेल्या मुलांना प्रवेश  ५ इतर सक्षम अधिकारान्वये जेव्हा  सरळ क्र. १ द्वारे भरती होते तेव्हा… Continue reading झुकझुक आगीनगाडी  : लेख क्र.२ 

॥अथातो न्याय जिज्ञासा।। कथा पहिली

विनय पांडुरंग उत्पात हे सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश आहेत.  विविध वृत्तपत्रांमधून कायदेशीर बाबींबद्दल ते स्तंभलेखन करतात.  त्यांच्या पुण्यनगरी आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये  प्रसिद्ध होणाऱ्या ‘विधी भाष्य’ या लेखमालिकेला वाचकांचा चांगला  प्रतिसाद मिळाला. आपल्या प्रदीर्घ न्यायालयीन कारकिर्दीत मिळालेल्या अनुभवांवर आधारित ही खास लेखमालिका ते या महिन्यापासून लिहीत आहेत – संपादक  कथा पहिली :… Continue reading ॥अथातो न्याय जिज्ञासा।। कथा पहिली

प्रश्नोपनिषद :एप्रिल  २०२५  

मंडळी,   आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.  जात हे एक प्रकारचे सामाजिक भांडवल (सोशल कॅपिटल )आहे का? आपली उत्तरे/प्रतिसाद  सदराच्या खाली कॉमेंट स्वरूपात देऊ शकता किंवा ई-मेल द्वारा  jaysss12@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकता.  आपले मत आपण 9422647283 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारादेखील… Continue reading प्रश्नोपनिषद :एप्रिल  २०२५  

जाडेपणावरची औषधे

मधुमेह आणि जाडेपणावरच्या औषध-शोधकांना लॅस्कर पुरस्कार     लॅस्कर पुरस्कार                               आज जगभर जाडेपणाचे प्रमाण वाढत आहे आणि भारत त्यात मागे नाही. ओबेसिटी म्हणजे सुदृढता  नसून ती एक विकृती आहे, असा त्या शब्दाचा आशय आहे. आज यातूनच एक नवा शब्द आकाराला येत आहे तो आहे : ‘डायाबेसिटी.’ डायबेटीस  आणि ओबेसिटी या दोन्ही विकृती… Continue reading जाडेपणावरची औषधे

कवितेचे पान : अघटितांचं घटित

जग अनेक अनाकलनीय घटितांनी, अक्रितांनी भरलेलं आहे यावर माझा लहानपणापासून विश्वास आहे.उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या की मुक्ततेच्या आनंदाच्या हातात हात घालून आणखी एक आनंद यायचा तो म्हणजे आजी आजोबांकडून किस्से कहाण्या ऐकण्याचा. याची तयारी संध्याकाळपासूनच होई. तुळशीच्या अंगणात भरपूर पाणी टाकायचं. तापलेलं अंगण निवलं की बाजा टाकायच्या. गाद्याबिद्या पद्धतशीर घालून आम्ही… Continue reading कवितेचे पान : अघटितांचं घटित

पुस्तक परीक्षण : द लायब्ररी

‘द लायब्ररी’त जाच ‘चुकलीमाकली पुस्तकप्रेमी माणसं पुस्तकांच्या दुकानात, स्टॉलवर किंवा लायब्ररीत सापडतात,’ अशा अर्थाची एक जपानी म्हण आहे म्हणे! त्यातली वास्तव-अवास्तव बाजू सोडून द्या आणि मूळ मुद्दा लक्षात घ्या. अनेकदा पुस्तक-वाचन आवडणारी माणसं लायब्ररीत जातात, तिथंच पडीक असतात किंवा पुस्तकांचा महिनाभर पुरेल इतका साठा घेऊन घरी येतात. ग्रंथालयांचे साधी, फक्त… Continue reading पुस्तक परीक्षण : द लायब्ररी

स्वागत – एप्रिल २०२५

महाराष्ट्र भूषण प्रकल्प :व्ही. शांताराम यांच्यावरील संकेतस्थळ.    शनिवार दिनांक २२ मार्च २०२५ रोजी ठाणे मुक्कामी सुप्रसिद्ध सिने -चित्रपट अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते व्ही. शांताराम यांच्यावरील वेबसाईटचे उद्घाटन झाले.  त्या प्रसंगी डावीकडून उजवीकडे :  दिनकर गांगल, संजय आचार्य, गिरीश घाटे व सुहास जोशी.   ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वतीने १९०० ते १९३०… Continue reading स्वागत – एप्रिल २०२५

मन वढाय वढाय भाग ४ 

महिलांचे मानसिक आरोग्य भारतीय संस्कृतीमध्ये ऐश्वर्य देणारी श्रीलक्ष्मी , बुद्धिदेवता सरस्वती आणि आदिशक्ती पार्वती या सर्व स्त्रीदेवता आहेत. म्हणजेच एकीकडे दगडातील स्त्रीला आपण देवत्व प्रदान करतो पण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जिवंत स्त्रीला मात्र आपण दुय्यम ठरवतो, तिच्यावर अनन्वित अत्याचार करतो.आज महिलांचे मानसिक आरोग्य याविषयी लिहिताना ‘तिच्या ‘आयुष्यातील टप्पे आणि तिचे… Continue reading मन वढाय वढाय भाग ४ 

स्वागत – आम्ही पुस्तकप्रेमी सातारकर समूह

वाचन चळवळ वाढावी, ‘समव्यसनी’ मित्रमैत्रिणी यांनी एकत्र यावे ह्या हेतूने अनेक समूह आजकाल व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवर स्थापन झालेले असतात. अशाच एका ‘पुस्तकप्रेमी’ समूहाचा मी सभासद झालो, त्या समूहातील सदस्यांचे ग्रंथप्रेम आणि वाचनाचा आवाका बघून मी थक्क झालो, ठरवले, की असाच एखादा समूह आपण सातारकर पुस्तकप्रेमींसाठी सुरू करायचा. त्यातूनच स्फूर्ती घेत… Continue reading स्वागत – आम्ही पुस्तकप्रेमी सातारकर समूह

महूद ते ह्यूस्टन ३

मुंबई  आयआयटीतील  शिक्षण (जुलै १९७४ – ऑगस्ट १९८१) आयआयटी मुंबई  बी.टेक. वर्षे (जुलै १९७४ – एप्रिल १९७९) आयआयटीचे पहिले चार सेमिस्टर सर्व शाखांसाठी समान होते – यात मूलतः सर्व अभियंत्यांसाठी आवश्यक असलेल्या विविध मूलभूत विषयांचे अनेक अभ्यासक्रम : गणित (४ अभ्यासक्रम), भौतिकशास्त्र (५), रसायनशास्त्र (४), अभियांत्रिकी रेखाचित्र (२) यासोबत इंग्रजी… Continue reading महूद ते ह्यूस्टन ३

पुस्तक परिचय :  ‘लिंब आणि परिसर : सांस्कृतिक परिचय ‘

सातारा- वाई जवळील, कृष्णेकाठी वसलेल्या लिंब गावावर,  ‘लिंब आणि परिसर : सांस्कृतिक परिचय ‘ हे अनिता आगाशे  यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.       लिंब या गावाशी विनोबांचा व भावे  कुटुंबाचा संबंध राहिला आहे.  विनोबांचे पणजोबा कृष्णराव भावे हे,  लिंब येथील कोटेश्वराचा मुखवटा, दरवर्षी  कार्तिक शुद्ध अष्टमीला वाई येथील घरी आणून… Continue reading पुस्तक परिचय :  ‘लिंब आणि परिसर : सांस्कृतिक परिचय ‘

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

श्रेयनामावली 

 मार्गदर्शक : भानू काळे

 संपादक : अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी 

तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी, स्नेहल आपटे

Author

One thought on “एप्रिल २०२५

  1. कवितेचे पान, मन वाढाय वाढाय, मधुमेह, झुक झुक आगीनगाडी, आनंद मेळावा. वाचनीय आहेत. झुक झुक आगीनगाडी मध्ये प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे जास्त प्रभावी वाटते

Leave a Reply