एप्रिल २०२५ : मुखपृष्ठाविषयी

या वेळचे मुखपृष्ठ छायाचित्रकार आहेत मुरुडचे किशोर चोळकर. ते मुरुडला पालवी कॉटेजेस या नावाने होम स्टे चालवतात.  छायाचित्रण  ही त्यांची आवड आहे व पक्ष्यांची छायाचित्रे काढणे यात त्यांना विशेष रस आहे. या वेळच्या छायाचित्राचा विषय असणारा, आपल्या मोहक निळसर वर्णाने बघणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा आकर्षक पक्षी म्हणजे ‘नीलपंख’(Indian Roller)

निळा माथा, निळसर जांभळे पंख, निळी शेपटी, तांबूस-तपकिरी छाती, अंतर्भाग निळा व पंखांच्या टोकांशी जांभळा पट्टा असा विलक्षण सुंदर असलेला पक्षी ‘चाष’ नावानेही ओळखला जातो.

विशेष  म्हणजे याच्या अप्रतिम सौंदर्यामुळे यास आंध्रप्रदेश, कर्नाटक व ओरिसा या राज्यांचा राज्यपक्षी म्हणून घोषित केलेले आहे.

निवासी व स्थानिक स्थलांतर करणारा हा पक्षी झुडुपे, पानगळीची विरळ जंगले, माळराने व शेती परिसरात आढळतो.

मुख्यतः कीटकाहारी असलेला चाष शेतातील विजेच्या तारा किंवा निष्पर्ण झाडांवर बसून  आपल्या तीक्ष्ण नजरेने शिकार शोधत असतो. टोळ,पाली, बेडूक,उंदीर,अळ्या, सुरवंट, सरडा हे त्याचे खाद्य.

पुरातन काळी राजे-महाराजे दसरा व दुर्गापूजेचा सण साजरा करताना त्यांच्याकडील पिंजऱ्यातील चाष पक्ष्यांना मुक्त करीत; पण दुसरीकडे त्यांचे पंख कापून ते चाऱ्याबरोबर गाई-म्हशींना दिल्यास त्या दूध जास्त देतात अशा गैरसमजापोटी आणि सुंदर पिसांकरिता दुर्दैवाने  यांची शिकार होते.

पक्षिविषयक माहिती सौजन्य : श्रीकांत बडवे,पंढरपूर . 

2 thoughts on “एप्रिल २०२५ : मुखपृष्ठाविषयी

  1. या अंकाचे मुखपृष्ठ खूप आवडले…
    छायाचित्रकार किशोर चोळकर यांचे आणि नीलपंख पक्षाच्या सविस्तर माहिती बद्दल श्रीकांत बडवे यांचेही मनःपूर्वक अभिनंदन!!

  2. “नीलपंख” चे
    खूप सुंदर छायाचित्र आणि अतिशय सुरेख माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.

Leave a Reply