अथातो न्याय जिज्ञासा (३)

‘दैव रुसले दैव हसले’ अहिल्यानगर जिल्ह्यातील ही सत्यकथा आहे. श्रीपती पवार आणि त्यांची पत्नी सोजराबाई हे अल्पभूधारक शेतकरी आपल्या दोन लहान मुलांसोबत आनंदात राहत होते. शेती थोडी असल्यामुळे भाजीपाला पिकवून आठवड्याच्या बाजाराला तालुक्याच्या गावी किंवा जवळच्या मोठ्या गावी जाणे, धान्य व भाजीपाला विक्रीतून येणाऱ्या पैशांतून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणे असा त्यांचा दिनक्रम चालू होता. शेतीचे उत्पन्न कमी असल्यामुळे कुक्कुटपालन, शेळीपालन, दूध विक्री इत्यादी पूरक व्यवसायातून पैसे … Continue reading अथातो न्याय जिज्ञासा (३)

॥अथातो न्याय जिज्ञासा॥ २ 

कायद्यापेक्षा न्याय श्रेष्ठ    न्यायाधीशाला कायद्याच्या चौकटीत राहूनच न्यायनिवाडा करावा लागतो; परंतु एखादा संवेदनशील न्यायाधीश न्यायदानाला कायद्यापेक्षा जास्त महत्त्व देऊन न्यायनिवाडा करतो. पुणे शहरात घडलेली ही सत्यकथा आहे. वासंती आणि अजय या दोघांचा शुभविवाह विवाह मंडळाने दिलेल्या माहितीच्या आधारे कुटुंबीयांच्या संमत‌ीने जमवण्यात आला होता. दोन्ही कुटुंबे  सुशिक्षित असल्यामुळे नियोजित वधूवरांना मोकळीक देण्यात आली होती.  एकमेकांचा परिचय होण्यासाठी दोघेही विवाहपूर्व काळ आनंदात घालवत होती. लग्नाच्या याद्या, साखरपुडा, … Continue reading ॥अथातो न्याय जिज्ञासा॥ २ 

॥अथातो न्याय जिज्ञासा।। कथा पहिली

विनय पांडुरंग उत्पात हे सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश आहेत.  विविध वृत्तपत्रांमधून कायदेशीर बाबींबद्दल ते स्तंभलेखन करतात.  त्यांच्या पुण्यनगरी आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये  प्रसिद्ध होणाऱ्या ‘विधी भाष्य’ या लेखमालिकेला वाचकांचा चांगला  प्रतिसाद मिळाला. आपल्या प्रदीर्घ न्यायालयीन कारकिर्दीत मिळालेल्या अनुभवांवर आधारित ही खास लेखमालिका ते या महिन्यापासून लिहीत आहेत – संपादक  कथा पहिली : मूर्तिमंत ‘नीतिमत्ता’        एकंदरीत न्यायालय, न्यायाधीश, वकील, पोलीस, पुरावे यांविषयी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला आकर्षण असते व … Continue reading ॥अथातो न्याय जिज्ञासा।। कथा पहिली