मुखपृष्ठाविषयी : जानेवारी २०२५
या वेळच्या मुखपृष्ठ छायाचित्रकार आहेत मुंबई येथील राधिका कुंटे… आपल्या छायाचित्राविषयी त्या म्हणतात : सदाफुली परवाच जवळच्या एका बागेत गेले होते तर ही दिसली – ‘सदाफुली.’ बागेत असो किंवा कुंडीत, ती नेहमीच दिसते एकदम टवटवीत नि तजेलदार… अगदी नावाप्रमाणंच! लगेच तिला म्हटलं ‘हॅलो’… आम्ही एकमेकींची खुशाली विचारली; मग फेरी… Continue reading मुखपृष्ठाविषयी : जानेवारी २०२५
संपादकीय : डेव्हिल्स ॲडव्होकेट
मुलाखत या शब्दाला हिंदीमध्ये ‘साक्षात्कार’ म्हणतात. मुलाखत म्हणजे नक्की काय हे समजावून घ्यायचे असेल तर हा साक्षात्कार हा शब्द योग्य आहे. मुलाखत म्हटले की कोणीतरी कुणाला तरी प्रश्न विचारायचे असा सर्वसाधारण प्रकार. म्हणजे ती फक्त उत्तर देणाऱ्याचीच परीक्षा असते असे काहीसे वाटू शकते. प्रत्यक्षात माझ्या मते ती प्रश्न विचारणाऱ्याचीही परीक्षा… Continue reading संपादकीय : डेव्हिल्स ॲडव्होकेट
वाचकांना साद – जानेवारी २०२५
मंडळी नमस्कार, आभासी अंतर्नाद सुरू होऊन पंधरा महिने झाले. भानू काळे आणि छापील अंतर्नाद हे दोन दीपस्तंभ समोर होते. त्यांच्या प्रकाशातच ही वाटचाल सुरू झाली, चालू आहे व होईल. हा प्रयोग सुरू करताना मनात नाही म्हटले तरी धाकधूक होती. एकंदरीत प्रतिसाद पाहता हा प्रयोग स्थिरावला आहे असे वाटण्याइतपत परिस्थिती आहे.… Continue reading वाचकांना साद – जानेवारी २०२५
आदरांजली : देवकिसन सारडा – सामाजिक भान जपणारा उद्योगपती
सामाजिक भान जपणारे नाशिकचे ज्येष्ठ उद्योगपती देवकिसन सारडा यांचे नुकतेच २० डिसेंबर २०२४ रोजी दुपारी दोनच्या सुमारास वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने आपल्या निवासस्थानी दुःखद निधन झाले. महाराष्ट्रात एके काळी सर्वत्र विकल्या जाणाऱ्या ‘उंट’छाप बिडीचे ते निर्माते. अवघ्या तीन कामगारांना घेऊन १९२२ साली सिन्नर येथे सुरू झालेल्या या कारखान्यामुळे काही… Continue reading आदरांजली : देवकिसन सारडा – सामाजिक भान जपणारा उद्योगपती
अभिवाचन भाग ११
ग्रंथाली प्रकाशित ‘मोरपिसं’ या अनुराधा गानू लिखित ललित लेखांच्या अभिवाचनाची शृंखला आपण सुरू केली आहे. लेखिकेचा परिचय… १९७८ सालापासून अमेरिकेत वास्तव्य होतं. टॅक्स आणि अकाउंटिंगचा स्वतःचा व्यवसाय. लॉस एंजेलिसच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्यानं सक्रिय सहभाग. वाचन, लेखन, नाट्य, अभिनय यांची आवड. स्थानिक संगीतकार गोपाळ मराठे यांनी संगीतबद्ध केलेल्या व श्रीधर… Continue reading अभिवाचन भाग ११
प्रकाशन वृत्तान्त
डावीकडून चंद्रकांत झटाले,भानू काळे, शरद अभ्यंकर, दत्तप्रसाद दाभोळकर, रूपा अभ्यंकर शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४ ची संध्याकाळ. वाई येथील टिळक वाचनालयाचे रमेश गरवारे सभागृह साहित्यप्रेमींनी भरले होते. निमित्त होते डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेल्या ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ (मनोविकास प्रकाशन, पुणे) या पुस्तकाच्या डॉ.शंतनु अभ्यंकर यांनी केलेल्या ‘Unraveling the Real Swami… Continue reading प्रकाशन वृत्तान्त
प्रश्नोपनिषद : जानेवारी २०२५
मंडळी, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू. त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा. वाचन संस्कृती सध्या कमी कमी होत नाहीशी होत आहे असे जेव्हा आपण म्हणतो त्या वेळी वाचन संस्कृती केव्हा आणि कशी निर्माण झाली असेल आणि कशी वाढली असेल हे प्रथम लक्षात घ्यावयास हवे… Continue reading प्रश्नोपनिषद : जानेवारी २०२५
पत्रकारदिनानिमित्त कोडे
नराणां नापितो धूर्तः पक्षिणां चैव वायसः चतुष्पदां शृगालस्तु स्त्रीणां धूर्ता च मालिनी नारद, नापित आणि माळणी यांना घटनांचा प्रसार करणारे असं संबोधलं आहे. बातम्या मिळवण्यासाठी हेरांची नेमणूक करणे अगदी आत्ताच्या काळातही महत्त्वाचे आहे. मोगल काळात त्यांना वाक़िआ नवीस म्हणत असत. वाक़िआ म्हणजे घटना आणि नवीस म्हणजे लिहिणारा. घटना लिहिणारे म्हणजे… Continue reading पत्रकारदिनानिमित्त कोडे
कविताचित्र : रानफूल
हा इवला देहच माझा बघ सांग कसा फुलवावा जरी दाही दिशांनी साऱ्या तो वारा धावून यावा मी गाणे गाते फुलता रेशमी धुक्यातून आता मग सूरही ते पानांचे मज साथ सुगंधी करीता शोधूच नका कुणी मजला रानात हरवूनी गेले मी रानफूल हो आहे विसरून मला मी गेले कुणी आनंदाने यावे अन्… Continue reading कविताचित्र : रानफूल
ग्रंथयात्रा – एक प्रवास १२
ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी वेगवेगळ्या मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे. यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी… डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नामदेव ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडली.… Continue reading ग्रंथयात्रा – एक प्रवास १२
आगामी – महुद ते ह्युस्टन
११ नोव्हेंबरला माझा मित्र (अंतर्नाद संपादक) डॉ. अनिल जोशी याचा मला फोन आला. त्याने मला माझ्या जीवनप्रवासाबद्दल लिहिण्याचे सुचवले. मी स्वतःला विचारले,असे लेखन करण्यासारखे मी काही विशेष केले आहे का? उत्तर म्हणून कदाचित काही गोष्टी असतील – १) मी एका लहान गावात, महुद बुद्रुक येथे (पंढरपूरपासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर,… Continue reading आगामी – महुद ते ह्युस्टन
कविता – जुनी कपाटं
गोदरेजची जुनी लोखंडी कपाटं… मागच्या तीन पिढ्यांनी वापरलेली गंजत चाललेली तरीही टाकून द्यावीशी न वाटणारी रंग मारून पुन्हा नवीन झाल्यासारखी वाटणारी तरीही व्हॅलिडिटी संपलेली दार उघड बंद करताना खडखडणारी करकरणारी आरशावर तडा गेलेली आत तिजोरी असली तरीपण चाव्या हरवलेली पोरांनी लहानपणी लावलेल्या फुलपाखरांच्या पिवळ्या पडलेल्या स्टिकर्समधे त्यांचं बालपण जपून ठेवणारी… Continue reading कविता – जुनी कपाटं
जगणं समृद्ध करणारी ‘माती माय…’ जनाबाई
परभणीहून मुंबईला जाण्यासाठी स्टेशनवर पोहोचले तर गाडी लेट झालेली. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं म्हणून जरा निवांतशी बसले होते. तेवढ्यात शेजारी कोणी मायलेकी येऊन बसल्या. लेक अगदी पोरसवदा. बोलक्या डोळ्यांची. सुंदर, चमकदार, लांबसडक केसांचं ऐश्वर्य घेऊन आलेली. मुंबईला शिकायला निघालेल्या लेकीत आईचा जीव अडकलेला; त्यातही लेकीच्या मऊसूत केसांमध्ये तर अधिकच अडकलेला.… Continue reading जगणं समृद्ध करणारी ‘माती माय…’ जनाबाई
मन वढाय वढाय(१)
गैरसमजांच्या विळख्यात मानसशास्त्र सायकीॲट्री म्हणजेच मनोविकृती आणि मानसशास्त्र! ही एक अतिपुरातन काळापासून अभ्यासली गेलेली पण इतर वैद्यकीय शाखांपेक्षा उशिरा उदयास आलेली वेगळीच वैद्यकीय शाखा. अज्ञान, अंधश्रद्धा, गैरसमज आणि कुतूहल यांसारख्या संमिश्र गोष्टींचे घट्ट वेढे या शाखेभोवती आहेत ज्यामुळे दिवसेंदिवस मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. मुळातच माणसाचं मन हा हजारो… Continue reading मन वढाय वढाय(१)
मेंदूचे आरोग्य आणि स्वास्थ्य
माझा एक न्युरॉलॉजिस्ट मित्र आहे; त्याच्याशी गप्पा मारत होतो. तो म्हणाला, “हृदयविकारावर प्रतिबंधक उपायांसाठी ‘प्रिव्हेंटिव्ह कार्डिऑलॉजी’ ही शाखा आहे, तशीच पोटाच्या विकारांवरही असेल; पण मेंदूच्या विकारांच्या प्रतिबंधासाठी अशी शाखा नाही.” त्यावर मी म्हणालो “अरे हृदयविकारांवरचे प्रतिबंधक उपाय मेंदूच्या विकारालाही लागू आहेत.” “तू म्हणतोस ते थोडेफार खरे आहे पण… Continue reading मेंदूचे आरोग्य आणि स्वास्थ्य
एक स्तुत्य उपक्रम
गोव्यातील एक आघाडीचे उद्योजक चिराग दत्ता नायक यांनी आपले वडील – कोकणी व मराठीतील ख्यातनाम साहित्यिक दत्ता दामोदर नायक – यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कोकणी भाषा मंडळाला एक कोटी रुपयांची देणगी देत असल्याचे एका पत्रकार परिषदेत जाहीर केले. या रकमेच्या व्याजातून कोकणी भाषा मंडळ दरवर्षाआड ‘चित्रंगी महिला मेळावा’ व सामाजिक… Continue reading एक स्तुत्य उपक्रम
संत, पंत, तंत काव्यविषयक लेखमाला (१४)
विठ्ठल कवी आणि चित्रकाव्यबंध विठ्ठलाने अलंकार, वृत्तं आणि कथांनी कवितासुंदरी सजवली. त्याने चढवलेले आणखी एक काव्यलेणे म्हणजे चित्रकाव्य.एखाद्या वस्तूची, विषयाची, आकृतीची मनात कल्पना करून त्या कल्पनेला अनुरूप अशी शब्दरचना करणे –विवक्षित वर्ण ठरावीक ठिकाणी आणणे आणि ती शब्दरचना चित्ररूपात रसिकांपुढे ठेवणे याला कृत्रिम काव्य समजलं जात असलं तरी विठ्ठलाची नवीन काही… Continue reading संत, पंत, तंत काव्यविषयक लेखमाला (१४)
पुनर्भेट नॅशनल पार्कची १४
माणूस आणि निसर्ग दि. ३.१२.२०२४ जंगलातील गवत सुकू लागलं. त्याचा रंग काळपट तपकिरी होऊ लागला. या सुकलेल्या गवतात काय पाहावं? असा विचार करत असतानाच त्या गवतातून गडद निळ्या रंगाची दशमुळीची फुलं डोकावू लागतात. निळ्या फुलोऱ्यामुळे दशमुळीची एखाद फूट उंचीची रोपटी डोळ्यांत भरू लागतात. दशमुळीची फुलं दोन ते तीन सेंटीमीटर व्यासाची,… Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची १४
हिंदी चित्रपटातील काही उत्तम कथ्थक नृत्ये(१)
हिंदी चित्रपट संगीत हे भारतीयत्वाचे एक अविभाज्य अंग आहे. अनेक गायक, कवी,संगीतकार यांच्या प्रतिभेच्या स्पर्शाने नटलेले हे संगीत आहे. त्याने आपले जीवन सुसह्य व समृद्ध केले आहे. या संगीतप्रकाराकडे बघण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. हिंदी चित्रपट संगीतात सादर केल्या गेलेल्या कथ्थक नृत्य प्रकारावर आधारित काही गाण्यांचा रसास्वाद घेत आहेत दिनेश… Continue reading हिंदी चित्रपटातील काही उत्तम कथ्थक नृत्ये(१)
प्रतिसाद :जानेवारी २०२५
तुमचे डिसेंबर २०२४ संपादकीय वाचले. चांगले आहे. त्यात डॉ.जेस्ते यांचा उल्लेख आहे. त्यांनी पदवी शिक्षण बी. जे. मेडिकल पुणे येथून व पदव्युत्तर मुंबईतील G. S. Medical College येथून घेतले. त्यांची व्याख्याने मुंबईत झाली होती ती मी आवर्जून ऐकली होती. डॉ.जेस्ते माझे मित्र डॉ.विहंग वाहिया यांच्या ओळखीचे आहेत. डॉ. जेस्ते… Continue reading प्रतिसाद :जानेवारी २०२५
पत्रकार कोडे उत्तर
१)तानूबाई बिर्जे २)न. चिं. केळकर ३)ग. त्र्यं. माडखोलकर ४)नानासाहेब परुळेकर ५)बापूसाहेब भिशीकर ६)वि. वि. करमरकर ७)प्रमोद नवलकर ८)गोविंदराव तळवलकर ९)बाबासाहेब आंबेडकर १०)कृष्णराव भालेकर ११)नीळकंठ खाडिलकर १२)दत्तू बांदेकर १३)प्र.के.अत्रे १४)बाळासाहेब ठाकरे १५)ग. वा. बेहेरे Continue reading पत्रकार कोडे उत्तर
महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
श्रेयनामावली
मार्गदर्शक : भानू काळे
संपादक : अनिल जोशी
व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी
तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे
