ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी वेगवेगळ्या मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे. यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नामदेव ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडली. जी समाजव्यवस्था दलितांच्या अमानुष छळाला कारणीभूत झाली त्या प्रस्थापिततेच्या सर्वनाशाचा विडा उचललेली ही कविता आहे. दलित साहित्य या नावाने ओळखल्या गेलेल्या विद्रोही साहित्यिक चळवळीतील नामदेव ढसाळ हे एक प्रमुख कवी होते. मराठी कवितेला त्यांनी नवी दिशा कशी दिली ते पहा या व्हिडिओमध्ये. समकालीन कवींच्या तुलनेत त्यांची कविता का उठून दिसते हे जाणून घ्या प्राध्यापक मनोहर जाधव यांच्याकडून.
