प्रश्नोपनिषद : जानेवारी २०२५ 

 

 मंडळी, 

 आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा. 

वाचन संस्कृती सध्या कमी कमी होत नाहीशी होत आहे असे जेव्हा आपण म्हणतो त्या वेळी वाचन संस्कृती केव्हा आणि कशी निर्माण झाली असेल आणि कशी वाढली असेल हे  प्रथम लक्षात घ्यावयास हवे आहे का? 

काही शतकांच्या पूर्वी किंवा काही दशकांच्या पूर्वी वेळ घालवण्यासाठी कथा, कीर्तने आणि घरी वाचण्यासाठी पोथी अशा गोष्टी होत्या. १०-१२  दशकांपूर्वी वेळ घालवण्यासाठी काही  पुस्तके, थोडे दिवाळी अंक असे होते आणि त्यात लोक छानपणे वेळ घालवत.  आता पुस्तकांची आणि दिवाळी अंकांची संख्या त्यात आपण गटांगळ्या खाव्यात एवढी वाढली आहे आणि त्याहीपेक्षा वेळ छानपणे घालवण्यासाठी youtube, दूरदर्शन मालिका, Whatsapp वर दंगामस्ती असे इतर अनेक प्रकार आहेत.  त्यामुळे वाचन संस्कृती हा काही काळ वाढलेला, थोडेफार मूळ धरत आहे असा वाटलेला आणि आता कालबाह्य होऊन संपू लागलेला असा एक प्रकार आहे का? 

आपली उत्तरे/प्रतिसाद  सदराच्या खाली कॉमेंट स्वरूपात देऊ शकता किंवा ई-मेल द्वारा jaysss12@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकता. 

आपले मत आपण 9422647283 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारादेखील पाठवू  शकता. 

आणि हो, 

या सदरासाठी आपल्याला पडलेले अशा प्रकारचे प्रश्नदेखील आपण पाठवू शकता. 

संपादक 

Author

One thought on “प्रश्नोपनिषद : जानेवारी २०२५ 

  1. जाणकार मंडळी यावर अधिक प्रकाश टाकू शकतील का?…..
    ग.दि.मा. यांना काय अभिप्रेत असावे,जेव्हा त्यांनी ….”उद्धवा अजब तुझे सरकार” कविता लिहिली.

Leave a Reply