मे २०२४

मुखपृष्ठाविषयी : मे २०२४

 छायाचित्र : श्रीराम दांडेकर  रोमेरबर्ग स्क्वेअर फ्रँकफर्ट (Römerberg Square, Frankfurt) सोळाव्या शतकापासून  फ्रॅंकफर्टमध्ये घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला हा चौक! राज्याभिषेक, वेगवेगळ्या जत्रा – मेळे यांचे अत्यंत लोकप्रिय असे ठिकाण. सिटी हॉल आणि फाउंटन ऑफ जस्टीस यासाठी  हा चौक  प्रसिद्ध आहे.  Continue reading मुखपृष्ठाविषयी : मे २०२४

संपादकीय : हाक मायमराठीची

 महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतेच म्हणजे गेल्या मार्च महिन्यात पुढील २५  वर्षांसाठीचे भाषा धोरण जाहीर केले आहे.  या बाबत १२ पानी  शासन निर्णय नुकताच जाहीर झाला आहे.  अर्थातच निर्णयाची भाषा खास शासकीय मराठी आहे. एक मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.  द्विभाषकापासून हे मराठी भाषिक  राज्य निर्माण झाल्याने आता मराठीला… Continue reading संपादकीय : हाक मायमराठीची

राम दिखाया पत्थरोंने : ( २) 

रामकथा ही भारतीय संस्कृती आणि धर्माचा एक अविभाज्य भाग आहे. रामायण महाकाव्यातील कथानकावर आधारित अनेक कलाकृती निर्माण केल्या गेल्या आहेत. त्यांमध्ये  शिल्पकला हाही  एक महत्त्वाचा प्रकार आहे. रामकथेचे शिल्पांकन हे अनेक रूपांत आढळते. अनेक मंदिरांवर  रामायणामधील विविध प्रसंगांचे शिल्पांकन पाहायला मिळते.  या शिल्पांमध्ये रामायणातील प्रमुख प्रसंग आणि पात्रे यांचे  चित्रण… Continue reading राम दिखाया पत्थरोंने : ( २) 

मोठी माणसे ८ : दिलीप पुरुषोत्तम चित्रे 

   दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे नाव मी प्रथम सत्यकथेच्या (किंवा मौजेच्या) १९६४ च्या दिवाळी अंकात वाचले. मला वाटते, ‘आणि गुरुदत्त मेलेला आढळतो’ अशी त्यांची कविता होती. कविता पूर्ण आकळण्याचे माझे वय नव्हते; पण ही कविता अंकातील इतर कवितांपेक्षा वेगळी होती आणि म्हणूनच माझ्या लक्षात राहिली. ही कविता केवळ त्या अंकातल्या इतर… Continue reading मोठी माणसे ८ : दिलीप पुरुषोत्तम चित्रे 

चालवा डोकं ….    सोडवा कोडं 

खाली दोन अक्षरी शब्दांचे अर्थ दिले आहेत.  पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर ही पुढच्या शब्दाची सुरुवात आहे.  उदा.  संताप  हत्ती दुनिया  असं दिलं असेल तर संताप = राग पुढचा शब्द ग पासून सुरू  होणारा, अर्थ हत्ती = गज ज पासून दुनियेसाठी शब्द = जग चला तर मग… चालवा डोके चंबळेची उपनदी… Continue reading चालवा डोकं ….    सोडवा कोडं 

बेंगलोर डायरी ७

   फळांचा राजा आंब्याला म्हणतात आणि आंब्यांचा राजा हापूस.  आंबा म्हणजे फक्त हापूस या माझ्या समजाला मोठा छेद गेला बेंगलोरला आल्यावर. इथे हापूसच्या झगमगाटात इतर आंबे लपून जात नाहीत. येथील प्रसिद्ध बदामी म्हणजेच  कर्नाटक हापूससुद्धा जरा इतर आंब्यांना दबूनच असतो. इथे मोठा मान असतो तो बैंगनपल्ली या आंध्र प्रदेशातील आंब्यांना, त्यानंतर… Continue reading बेंगलोर डायरी ७

संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला :भाग ७ वा

मुक्तेश्वर भाग २ रसोत्पत्ती, अलंकार, व्यक्तिचित्रण अशा  काव्यपूरक सौंदर्यगुणांनी मुक्तेश्वरांच्या  काव्याला आगळा बहर लाभला आहे.   मुक्तेश्वरांची रचना मुख्यतः ओवीबद्ध. ओवी चार पंक्तींची. पहिल्या तीन ओळींत विषयाच्या भावाला अनुरूप असं सुरेल यमक : येथील श्रोते हे परिसणे| तुमचें अवधान परीस तेणें माझे वक्तृत्व हें लोहगुणें | अमूल्य होईल कांचन || व्यासांची… Continue reading संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला :भाग ७ वा

रद्दीतील रत्ने २ : हुसैनी ब्राह्मण

  या लेखाचे शीर्षक वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल; परंतु अशी ब्राह्मणांची एक पोटजात भारतात अस्तित्वात आहे. मी हा लेख २८ एप्रिल २०१०  रोजी लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीत ‘इंटरेस्टिंग’ या सदरात श्री.उमेश करंदीकर यांनी हुसैनी ब्राह्मणांविषयी जी माहिती दिली आहे त्याचा आधार घेऊन लिहिला आहे. मला ही माहिती खरोखरच इंटरेस्टिंग वाटल्यामुळे मी … Continue reading रद्दीतील रत्ने २ : हुसैनी ब्राह्मण

कविता : गाभारा 

मला ठाऊक आहे मीच सोडलंय तुला पण, तू तरी कुठे प्रतिकार केलास? तू प्रतिकार केला नाहीस…  माझ्या वागण्याला पुष्टी मिळाली दुखऱ्या मनाने घेतलेला निर्णय  अहंकार जागृत करून गेला आणि मन आणखी आणखी कडू होत गेलं गतकाळाचा विचार करताना जाणवत गेलं की विरघळण्याचे क्षण तर खूप होते मग आपलं विरघळणं खोटं… Continue reading कविता : गाभारा 

वासकसज्जा

अष्टनायिकांपैकी वासकसज्जा, लाटानुप्रास, साकी वृत्त असा हा प्रयोग  आहे. या दोन्ही गोष्टींचं थोडं स्पष्टीकरण : लाटानुप्रास  अनुप्रास हा भाषेच्या अलंकारांपैकी मोहक असा दागिना. अनुप्रास म्हणजे पुनरावृत्ती – ती अक्षरांची, शब्दांची किंवा वाक्यांची असू शकते. अनुप्रासाच्या विविध प्रकारांपैकी एक लाटानुप्रास.  शब्दर्थयोः पौनरुक्त्यं भेदे तात्पर्यमात्रतः लाटानुप्रास इत्युक्तो| लाटानुप्रासाचं वैशिष्ट्य काय?  लाटानुप्रासात शब्दांची… Continue reading वासकसज्जा

पुनर्भेट नॅशनल पार्कची ६ : चैत्रपालवीचे  दिवस  

 दि. ११.४.२०२४                                                          फाल्गुन संपला आणि  उद्यानात उन्हं तापू लागली आणि  करंजाच्या झाडांना बहर येऊ लागला. फाल्गुनात  करंजाचं झाड चकचकीत हिरव्या पानांनी भरून गेलं होतं;त्यावर आता  फिकट गुलाबी कळ्यांसारखी दिसणारी फुलं गुच्छाने येऊ लागली. करंजाचं फूल तीन पाकळ्यांचं. वरच्या दोन पाकळ्या   मुळाला लालसर गुलाबी रंगाच्या.नमस्कारासाठी जोडलेल्या दोन फुगीर हातांप्रमाणे एकमेकांना… Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची ६ : चैत्रपालवीचे  दिवस  

ईश्वरभक्ती, अध्यात्म वगैरे 

भारतीय समाजात पूर्वापारपासून धार्मिकता कमी-अधिक प्रमाणात बहुसंख्य लोकांमध्ये असल्याचे दिसून येते. धार्मिकतेचा प्रभाव हिंदू समाजामध्ये मर्यादित प्रमाणात तर मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजात कितीतरी जास्त असल्याचे अनुभवायला येते. विशेष म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पंचाहत्तर वर्षांच्या काळात साक्षरतेचे प्रमाण खूपच वाढले, विज्ञानाची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली; तरी त्यामुळे अधार्मिक, विवेकवादी प्रवृत्ती असणार्‍यांच्या… Continue reading ईश्वरभक्ती, अध्यात्म वगैरे 

ग्रंथयात्रा – एक प्रवास  ४

ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी  वेगवेगळ्या  मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे.  यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी… दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर फुलणारी चक्रधर आणि हॅर्टा यांची प्रेमकथा हे विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण’ या कादंबरीचं मुख्य… Continue reading ग्रंथयात्रा – एक प्रवास  ४

बांधवगड : व्याघ्रदर्शन 

 .                 तशी ही आहे  २००९ ची गोष्ट. जुन्या गोष्टींचा कधीकधी वेगळाच आनंद असतो. कालौघात  तिकडची गर्दी, बंधने  वाढत जातात.  अशा वेळी  त्या जुन्या गोष्टी स्मरून त्याविषयी पुन्हा एकदा  वाचायला, लिहायला आणि तो निवांतपणा आठवायलाही खूप छान वाटते.  अशा एका बिनगर्दीच्या वेळची ही गोष्ट.                    पेपरमध्ये जाहिरात बघितली. व्याघ्रदर्शनाची ही सहल  होती.… Continue reading बांधवगड : व्याघ्रदर्शन 

अंतर्नाद उदयास्त – पुस्तक रसग्रहण

अंतर्नाद – एका मासिकाचा उदयास्त   नुकतेच भानू काळे यांचे ‘एका मासिकाचा उदयास्त’ हे पुस्तक वाचनात आले. काळे यांनी अंतर्नाद हे नियतकालिक १९९५ पासून २३ वर्षं मासिक स्वरूपात आणि आणखी ३ वर्षं ‘दिवाळी अंक’ या स्वरूपात मालक आणि संपादक अशा दुहेरी भूमिकेतून प्रसिद्ध केले. या पुस्तकात स्मरणरंजन, किस्सेवजा कथन (anecdotal account),… Continue reading अंतर्नाद उदयास्त – पुस्तक रसग्रहण

अभिवाचन – मोरपिसं – लेख  ३  रा

ग्रंथाली प्रकाशित ‘मोरपिसं’ या अनुराधा गानू लिखित ललित लेखांच्या अभिवाचनाची शृंखला आपण  सुरू केली आहे .   लेखिकेचा परिचय…  १९७८ सालापासून अमेरिकेत वास्तव्य होतं. टॅक्स आणि अकाउंटिंगचा स्वतःचा व्यवसाय. लॉस एंजेलिसच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्यानं सक्रिय सहभाग. वाचन, लेखन, नाट्य, अभिनय यांची आवड.  स्थानिक संगीतकार गोपाळ मराठे यांनी संगीतबद्ध केलेल्या व… Continue reading अभिवाचन – मोरपिसं – लेख  ३  रा

पन्नास वर्षांची अक्षरयात्रा

   उतार वयात आपण जुने हिशेब चाळत बसतो. मागच्या काळात रमायला आवडते सत्तरी पार केलेल्या आमच्यासारख्यांना! सहज हिशेब करताना आठवले : आपली पहिली कादंबरी ‘अंधारातल्या सावल्या’ १९७३ साली प्रसिद्ध झाली – त्याला या वर्षी ५० वर्षे पूर्ण झाली! काळ असा चंद्र यानाच्या वेगाने धावतो. या निमित्ताने मागे वळून साहित्यिक प्रवासाची… Continue reading पन्नास वर्षांची अक्षरयात्रा

प्रतिसाद : मे २०२४

रसिकत्वाची साधना हवी.      ‘जयपुर लिटफेस्ट ‘ हा विचार प्रवर्तक लेख आवडला.  या संमेलनाचा जरूर  अभ्यास व्हायला हवा पण त्यापूर्वी मराठी समाजात अभ्यासू वृत्ती निर्माण व्हायला हवी. मराठी भाषेच्या अभिजात स्वरूपाला मान्यता मिळण्यासाठी हरी नरके यांच्यासारखे साहित्यिक, विचारवंत आयुष्यभर झगडत राहिले.  तर दुसरीकडे इंग्रजी माध्यमाकडे मराठी समाज झुकत चाललेला आहे.  माझे… Continue reading प्रतिसाद : मे २०२४

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

श्रेयनामावली 

 मार्गदर्शक: भानू काळे

 संपादक: अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार: सुषमा जोशी 

तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे

Author

One thought on “मे २०२४

  1. संपादक डॉ. जोशी
    अंर्तनादचा अंक खूप छान असतो. बेंगलोर डायरी, हुसैनी ब्राह्मण हे लेख इंटरेस्टिंग वाटले. बाकी ऑल ओव्हर अंक खूप छान आहे.

Leave a Reply