खाली दोन अक्षरी शब्दांचे अर्थ दिले आहेत.
पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर ही पुढच्या शब्दाची सुरुवात आहे.
उदा.
संताप
हत्ती
दुनिया
असं दिलं असेल तर
संताप = राग
पुढचा शब्द ग पासून सुरू
होणारा, अर्थ हत्ती = गज
ज पासून दुनियेसाठी शब्द = जग
चला तर मग… चालवा डोके
चंबळेची उपनदी
उगवती दिशा
पराभव
पिकदाणी
पातळी
कांती
वाहन
शीर
मित्र
समुद्रविशेष
अंकुर
पृथ्वी
सोबत
नदीची मर्यादा
करंडा
सरशी
रसना
सभ्य
संपत्ती
मग्न
धारणा
घोडा
विवस्वानाचा पुत्र
यज्ञ
लबाड
उत्तर : या अंकातच अन्यत्र दिले आहे .
