रामकथा ही भारतीय संस्कृती आणि धर्माचा एक अविभाज्य भाग आहे. रामायण महाकाव्यातील कथानकावर आधारित अनेक कलाकृती निर्माण केल्या गेल्या आहेत. त्यांमध्ये शिल्पकला हाही एक महत्त्वाचा प्रकार आहे. रामकथेचे शिल्पांकन हे अनेक रूपांत आढळते. अनेक मंदिरांवर रामायणामधील विविध प्रसंगांचे शिल्पांकन पाहायला मिळते. या शिल्पांमध्ये रामायणातील प्रमुख प्रसंग आणि पात्रे यांचे चित्रण आहे. या आगळ्या रामकथेचे निरूपण करताहेत नीलिमा थत्ते .


“ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा
यज्ञ रक्षण्या समर्थ तोचि सर्वथा”
यज्ञकार्यात विघ्न आणणाऱ्या राक्षसांचा त्रास दूर करण्यासाठी विश्वामित्र ऋषींनी दशरथाकडे अशी मागणी केली. रामासह लक्ष्मणही त्यांच्याबरोबर गेला. दोघांनी मिळून त्राटिका, सुबाहू, दीर्घबाहू अशा सर्वांचा नाश केला. मारिच तेवढा पळून जाण्यात यशस्वी झाला. सती अहल्येचा उद्धारही याच काळात झाला.
सोमनाथपूर नि हंपीला हे छान पहायला मिळते.
विश्वामित्रांची दशरथाकडे मागणी नि राम-लक्ष्मण रवाना
राक्षसांचा वध- सुबाहु वध
ताटका वध
हंपी हजारराममंदिर- विश्वामित्रांची दशरथाकडे मागणी नि रामलक्ष्मणांकडून राक्षसांचा वध
त्राटिका(ताटका) वध
अहल्या उद्धार
रामलक्ष्मणांमुळे यज्ञ निर्विघ्नपणे पार पडले.
“चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला” म्हणत विश्वामित्र त्यांना घेऊन जनकराजाकडे पोचले. पुढे मग सीतेचा पण, रावणाची फजिती आणि “आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे स्वयंवर झाले सीतेचे” ही सर्वांना माहित असलेली गोष्ट मंदिरांवर छान दाखवली आहे. एक जावई इतका चांगला मिळाल्यावर त्याचेच बंधू निवडून एकाच मांडवात चारही राजकन्यांचे विवाह करण्याची चतुराई जनकाने दाखवली आणि चार गोड सुना स्वीकारण्याची तयारी दशरथानेही दाखवली.
हंपीला सुटी सुटी शिल्पे दिसतात. सोमनाथपूर-हळेबीडुला वर मकरांची रांग, मधे शिल्पपट्ट, खाली फुलंवेली असं दिसतं.
विश्वामित्रांचे राम-लक्ष्मणासह मिथिलेत आगमन. जनक राजा पत्नी व चार राजकन्यांसह-सीता,उर्मिला,मांडवी,श्रुतकीर्ती
रावणाची फजिती-रामाने शिवधनुष्याला प्रत्यंचा लावली. डावीकडे वरमालेसह सीता
ऊर्मिला-मांडवी-श्रुतकीर्ती लक्ष्मण-भरत-शत्रुघ्न यांसह
मग वाजतगाजत वरात अयोध्येला निघाली. याचेही सुरेख शिल्पांकन दिसते. अयोध्या रंगून गेली होती चार नववधूंच्या स्वागतात.
दोन दोन जोड्या रथात
वाजतगाजत मिरवणूक व निरोप
मिथिलेकडून अयोध्येकडे
दोन-दोन जोडप्यांची हत्तीवरून वरात
दोन-दोन जोडप्यांची हत्तीवरून वरात
अयोध्येत आगमन
क्रमश:
