मुखपृष्ठाविषयी – Northern Shoveler
Northern Shoveler (Spatula clypeata) Clicked by Dr Salil Choksi at Bhandup, Mumbai, Feb ‘20 The Spoony Dabbler! It’s a widespread winter visitor to the marshes & wetlands of the Indian subcontinent. It migrates over the snow-laden peaks of the Himalayas on the Central Asian flyway to escape the harsh winter… Continue reading मुखपृष्ठाविषयी – Northern Shoveler
संपादकीय : दुर्मीळ उलटी गंगा
हल्ली कुठल्याही छोट्या गावात गेले तर गावातील तरुणांचे शिक्षण व रोजगारासाठी मोठ्या शहरांमधून स्थलांतर झाल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते. हे स्थलांतर, त्याची कारणे व परिणाम हा एक स्वतंत्र विषय आहे. नुकतेच पर्यटनासाठी कोल्हापूरजवळील अंबाघाटात गेलो होतो. घाट व कोकण यांच्या सीमारेषेवर असलेला हा प्रदेश निसर्गरम्य आहे. पन्हाळ्यावरून छत्रपती शिवाजी… Continue reading संपादकीय : दुर्मीळ उलटी गंगा
तो राजहंस एक…
सन १९६६ पासून राजहंस प्रकाशनाशी दिलीप माजगावकर निगडित झाले. १९८४ सालापासून या प्रकाशन संस्थेची धुरा पूर्णपणे ‘दिगमा’ यांच्या हाती आली. नवे विषय आणि नवे लेखक यांबाबत ‘राजहंस प्रकाशन’ नेहमीच स्वागतशील राहिले आहे. ‘राजहंस प्रकाशना’ने वाचकांपुढे आणलेल्या अनेक लेखकांनी त्या त्या क्षेत्रांतील आपल्या कामाने आणि त्यासंबंधीच्या पुस्तकलेखनाने अत्यंत आगळीवेगळी कामगिरी उभी केली.… Continue reading तो राजहंस एक…
‘पत्र-सारांश’ एका अवलियाचा अभिनव प्रयोग
डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा यांच्या दिलदार स्वभावाचा एक अनोखा पैलू आहे – त्यांची वाचून झालेली चांगली पुस्तके ते मित्रपरिवारात वाटतात. या ज्ञानवर्षावाचा मलाही बऱ्याच वेळा फायदा होतो. त्यांनी दिलेले असेच एक पुस्तक वाचत असताना त्यातून एक अन्तर्देशीय खाली पडले. दाभोळकर सरांचे एखादे व्यक्तिगत पत्र बहुधा आपल्याकडे आले आहे आणि… Continue reading ‘पत्र-सारांश’ एका अवलियाचा अभिनव प्रयोग
मोठी माणसे ४ :विद्या बाळ
विद्याताईंशी माझा संबंध आला तो किर्लोस्करचे तेव्हाचे कार्यकारी संपादक ह.मो.मराठे यांच्यामार्फत. मी आयआयटीत असल्यापासून कविता लिहू लागलो होतो. सुट्टीत मी पुण्यात आलेलो असताना मराठे यांच्याकडे काही कविता दिल्या. माझी प्रकाशित झालेली पहिली कविता ‘मला एकदा पंख फुटले होते’ त्यांनीच किर्लोस्करच्या एका अंकात छापली. त्यानंतर हळूहळू मराठ्यांकडे माझ्या कविता देऊ लागलो.… Continue reading मोठी माणसे ४ :विद्या बाळ
तेव्हाच्या गोष्टी
चांद्रयान ३ चंद्राच्या भूभागावर अलगद उतरत होतं तेव्हा… टीव्हीवर वृत्तनिवेदिका उत्साहानं काहीतरी अघटित घडल्याच्या थाटात कालच्याच बातम्या आज पुन्हा सांगत होती… एक राजकीय नेता दुसऱ्या एका राजकीय नेत्यावर कसा निशाणा साधत आहे आणि त्या दुसऱ्या नेत्याकडून त्याचा कशा प्रकारे पलटवार केला जातो आहे वगैरे बातम्यांच्या नावाखाली खपवण्याचे तिचे उद्योग चालू… Continue reading तेव्हाच्या गोष्टी
सहृदयी
एक सामान्य आठवण माझ्या मनात का बरं जपून ठेवली गेली असावी? मी आणि माझी आई एका बसची वाट पाहत होतो. बस दुरून येताना दिसत होती; पण तिचा वेग अतिशय कमी आहे असं भासत होतं. ते वाट पाहणं सहनशीलतेची परीक्षा पाहणारं होतं. शेवटी ती बस जेव्हा आमच्या थांब्यावर पोचली तेव्हा मात्र… Continue reading सहृदयी
ये है बॉंबे मेरी जान… भाग ३
मुंबईचा इतिहास भाग ३ (पोर्तुगीज शासनाचा काळ इ.स. १५०० ते १६६१) वरील शीर्षकात लिहिल्याप्रमाणे आपण मुंबई म्हणजे कुलाबा ते माहीम व बृहन्मुंबई म्हणजे वांद्रे ते दहिसर या भागांवरील पोर्तुगीज शासन काळातील इतिहासाचा विचार करणार आहोत. हा इतिहास बघण्याआधी १५व्या आणि १६व्या शतकांत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून होणारा व्यापार बघितल्यास भारत किती… Continue reading ये है बॉंबे मेरी जान… भाग ३
चहा – My cup of tea !
माझे आजोबा मालवणच्या कोर्टात बेलीफ होते. त्यांनी आयुष्यात कधीही चहा घेतला नाही आणि दूधदेखील नाही. चहा न घेण्याचे कारण ब्रिटिश लोकांचा राग असला तरी दूध न घेण्याचे कारण – त्या काळात मालवणात दूधच मिळत नसे. दुसरे आजोबा कोल्हापूरचे. तिथे ‘बाई माणसानं कुक्वाच्या बोटाला आणि गडीमाणसानं च्याच्या कोपाला कंदी नाय म्हणू… Continue reading चहा – My cup of tea !
कविता
१. शून्य आणि पूर्ण असते शून्याला काही किंमत, काही अर्थ व्याख्येनुसार पूर्ण रिते संपूर्ण अभाव हाच स्वभाव तरी किती विलक्षण क्रिया-प्रक्रिया अंकाच्या डावीकडे मांडा : तसुमात्र फरक नाही उजवीकडे आले की मूल्य दशगुणीत मिळवा वा वजा करा : मूळ अंक तसाच गुणाकार : कितीही जटील गणित असो शून्याने गुणले… Continue reading कविता
बेंगलोर डायरी ३
बेंगलोर ही कर्नाटक राज्याची राजधानी असली तरी हे तुलनेने नवीन शहर. जरी मी मागच्या लेखात ९०० वर्षांपूर्वीच्या शिळालेखाचा उल्लेख केला असला; तरी ही हे दुय्यम महत्त्वाचेच शहर होते. आधी विजयनगर साम्राज्य म्हणजे हंपी आणि नंतर मैसूर या शहरांचे स्थानमाहात्म्य जास्त होते; त्यामुळेच की काय भाषावार प्रांतरचना होईपर्यंत हा सगळा इलाखा… Continue reading बेंगलोर डायरी ३
ओळख मृत्युपत्राची
हरीभाऊ एक सधन शेतकरी. चांगली ५०-६० एकर शेती, काही वडिलोपार्जित, काही स्वतः घेतलेली. भरपूर गाई गुरं, पुण्यात २, मुंबईत १ आणि कोल्हापूरला १ फ्लॅट, पैसा-अडका, सोनं-नाणं भरपूर. हरीभाऊंना ५ मुलं. भाऊंची पहिली पत्नी फार लवकर गेली – तिला २ मुलं. मुलं फार लहान म्हणून, दुसरं लग्न केलं, तिची ३… Continue reading ओळख मृत्युपत्राची
कामशेत- ४ … १९९३
इथे आता बरेच साप आणि विंचू चावल्याचे रुग्ण येताहेत. चाव्याचे ठिकाण बधिर करण्याचे झायलोकेन नावाचे औषध असते. (दात काढताना हेच इंजेक्शन देतात.) विंचू चावलेल्या ठिकाणी वरचेवर त्वचेखाली ते द्यायचे म्हणजे वेदना कमी होत जातात; पण साप चावला तर तसे नसते. विषारी/ बिनविषारी असं ठरवून मग साप विषारी असला तर त्याची… Continue reading कामशेत- ४ … १९९३
पुनर्भेट नॅशनल पार्कची ३ : थंडीतील गुलाबी आठवणी
दि. १.११.२०२३ ऑक्टोबर महिना संपला आणि नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी गुलाबी थंडीची चाहूल लागली. गुलाबी थंडीच्या आगमनाबरोबर आइस्क्रीम क्रीपरच्या गुलाबी फुलांना बहर आला. त्रिकोणी पानांची ही वेल. तिच्यावर इवलीशी दोन ते तीन सेंटीमीटर व्यासाची पाच पाकळ्यांची गुलाबी रंगाची असंख्य फुलं आली आहेत. या फुलांच्या मध्यभागी इवले इवले पिवळ्या रंगाचे पुंकेसर दिसतात.… Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची ३ : थंडीतील गुलाबी आठवणी
पंडिता मालिनीताई राजुरकर
गृहिणी ते विख्यात गायिका (उत्तरार्ध) लग्नानंतर मालिनीताईंनी गाणं केलं पाहिजे, ही वसंतरावांची प्रेमळ अटच होती. अनेक गुणवान भारतीय स्त्री कलावंतांना आपली कला अपेक्षेप्रमाणे वाढवता येत नाही; मग ते गाणं असो, वाद्य वादन असो किंवा इतर कुठलीही कला. केवळ कलाच नव्हे; तर अनेक स्त्रियांना अर्धवट राहून गेलेलं शिक्षणही पूर्ण करता येत… Continue reading पंडिता मालिनीताई राजुरकर
उच्च शिक्षणाचा गाभा: भाग ५ – पदवीदान समारंभाची चित्तरकथा!
विद्यापीठाचा बँड वाजू लागला. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचली. त्यांना त्यांची मुलं पदवीदान समारंभासाठी विकत घेतलेल्या खास गाऊन, केप, आणि टोप्या घालून स्टेजवर जाऊन विद्यापीठाच्या प्रेसिडेंटच्या हस्ते पदव्या स्वीकारताना बघायची होती. “विद्यार्थी आता सभागृहात प्रवेश करत आहेत हो! कृपया सगळ्यांनी उठून उभं राहावं!” भालदार चोपदारांनी आवाज दिला. शेकडोंच्या संख्येत प्रेक्षकांत उपस्थित… Continue reading उच्च शिक्षणाचा गाभा: भाग ५ – पदवीदान समारंभाची चित्तरकथा!
आपला तुटत चाललेला समाज
ज्येष्ठ पत्रकार आणि माझे एक स्नेही एकनाथ बागूल यांचे एकुलते एक चिरंजीव अनिरुद्ध यांचा मृतदेह पुण्याच्या पत्रकारनगरमधील त्यांचा घरात सापडल्याची बातमी मध्यंतरी ‘सकाळ’मध्ये वाचली आणि खूपच धक्का बसला. अनिरुद्ध यांचा आणि माझा काहीच पूर्वपरिचय नव्हता आणि त्यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी मला माहिती नाही; पण सकाळमधील बातमीनुसार ते जाहिरात आणि चित्रपटक्षेत्रासाठी छायाचित्रण… Continue reading आपला तुटत चाललेला समाज
स्वागत – समतानंद अनंत हरी गद्रे
समतानंद अनंत हरी गद्रे लेखक : भानू काळे प्रकाशक डायमंड पब्लिकेशन्स किंमत रुपये २२५/- जातिभेद व अस्पृश्यता हे दोन मोठे शाप आपल्या देशाला मिळाले आहेत. त्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता संत, विचारवंत, समाजसुधारक यांनी आपले जीवन समर्पित केले. यांमध्ये सध्याच्या काळात विस्मरणात गेलेले एक नाव म्हणजे समतानंद ऊर्फ अनंत हरी गद्रे. … Continue reading स्वागत – समतानंद अनंत हरी गद्रे
महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
श्रेयनामावली
मार्गदर्शक: भानू काळे
संपादक: अनिल जोशी
व्याकरण सल्लागार: सुषमा जोशी
व्यवस्थापन मंडळ: अजित कानिटकर, अनिल शिदोरे, उमाकांत घाटे, स्नेहा अवसरीकर
तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे

Very informative & interesting too