समतानंद
अनंत हरी गद्रे
लेखक : भानू काळे
प्रकाशक डायमंड पब्लिकेशन्स
किंमत रुपये २२५/-
जातिभेद व अस्पृश्यता हे दोन मोठे शाप आपल्या देशाला मिळाले आहेत. त्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता संत, विचारवंत, समाजसुधारक यांनी आपले जीवन समर्पित केले. यांमध्ये सध्याच्या काळात विस्मरणात गेलेले एक नाव म्हणजे समतानंद ऊर्फ अनंत हरी गद्रे. ऑक्टोबर १८९० मध्ये जन्म व १९६७ मध्ये मृत्यू असा त्यांचा जीवनप्रवास.
ह्या प्रवासामध्ये, त्यांच्या शब्दांत सांगायचे तर, त्यांनी अनेक ‘भानगडी’ केल्या : टिळकांच्या दौऱ्यातील भाषणांचे शब्दांकन करणारे वृत्तपत्रकार, ‘मौज’ व ‘निर्भीड’ साप्ताहिकांचे संस्थापक व संपादक आणि सरते शेवटी अस्पृश्यता निवारणाचे काम निष्ठेने करणारे समाज सुधारक. सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी गोरगरिबांना परवडणारा झुणका भाकरीचा प्रसाद वाटणे आणि विशेष म्हणजे पूजेला बसलेल्या हरिजन दांपत्याचे चरणतीर्थ प्राशन करणे हा त्यांच्या अस्पृश्यता निवारण चळवळीतील परमोच्च बिंदू!
असे हे बहुपेडी, बहुआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कार्याची दखल, आठवण व नोंद, कायमस्वरूपी राहावी म्हणून लिहिलेले हे चरित्र.
हे पुस्तक वाचून आकाशवाणीचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी गोपाळ आवटी यांनी लेखक भानू काळे यांना पाठवलेली प्रतिक्रिया ऐकण्यासारखी आहे.

नमस्कार!
सर्व प्रथम गोपाळ आवटी यांचे, या बहुमोल चरित्र लेखनाची इतकी सुंदर ओळख आपल्या उत्कृष्ट अभिवाचानाने करुन दिल्याबद्दल मनापासून आभार!
मी भानूजींच्या लिखाणाची चाहती आहे…
काय ताकदीच्या माणसांची परंपरा आपल्याला लाभलेली आहे हे आजच्या पिढीला कळणे गरजेचे वाटते… हे पुस्तक सर्वदूर पोचायला हवे.
धन्यवाद!
Thanks a lot Madam Umaji