मुखपृष्ठाविषयी – डिसेंबर २०२३
मुखपृष्ठ कलाकार आहेत रेखा श्रीजीत. त्या आपल्या कलाकृतीमधील स्त्री प्रतिमांविषयी लिहितात … My woman I wanted the female figures in my paintings to be bold, caring, motherly as well as beautiful and sensuous at the same time. They are stylishly lissome. But the viewer would be making a mistake if… Continue reading मुखपृष्ठाविषयी – डिसेंबर २०२३
संपादकीय : रत्नपारखी रत्नागिरी
The small wisdom is like water in a glass : clear, transparent, pure. The great wisdom is like the water in the sea : dark, mysterious, impenetrable – शहाणीव ही ग्लासातल्या निवळशंख पाण्यासारखी असते; तर शहाणपण अथांग गूढ सागरासारखे – गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. बंगाल आणि महाराष्ट्र यांच्यातील अनेक पदरी अनुबंधातील… Continue reading संपादकीय : रत्नपारखी रत्नागिरी
The POTUS is on the move !!(२ )
The Democrats are the party that says government will make you smarter, taller, richer and remove the crabgrass on your lawn. The Republicans are the party that says government does not work and then they get elected and prove it .: P J O’Rourke आता थोडेसे या निवडणूक प्रक्रियेविषयी पाहू… Continue reading The POTUS is on the move !!(२ )
मोठी माणसे ३
शांताबाई शेळके शांता शेळके हे नाव अगदी लहानपणापासून माहीत झालेले होते. पाठ्यपुस्तकातील त्यांची ‘बघ आई आकाशात सूर्य हा आला’ सारखी कविता पाठ करताना त्याखालचे ‘शांता ज. शेळके’ हे नावदेखील मी पाठ करून ठेवले होते; मग हळूहळू त्यांचे बालसाहित्य – तीन शिलेदारसारखी रूपांतरित कादंबरिका वाचता वाचता, मी त्यांच्या परदेशी चित्रपट… Continue reading मोठी माणसे ३
अरबांच्या आद्य देशात
मुंबई म्हणजे मूळ सात बेटांचा समूह आणि त्यांना वेढणारा समुद्र म्हणजे अरबी समुद्र. एक मुंबईकर या नात्याने साहजिकच अरबी हा शब्द चिरपरिचित. नरीमन पॉइंटवर फिरायला येणारे, पायघोळ झगा घातलेले अरबी प्रवासी लहानपणापासून पाहिले होते. पावसाळ्यात पाऊस बघायला ते मुंबईला येत! शेजारच्या मरीन ड्राइव्हवरील एखाद्या हॉटेलात मुक्काम करत कारण तेथील खोल्यांच्या… Continue reading अरबांच्या आद्य देशात
कामशेत ३
वैद्यक शास्त्रातील पदवी मिळाल्यानंतर(MBBS) ग्रामीण व शहरी भागातील सरकारी दवाखान्यांमध्ये एक वर्ष सेवा द्यावी लागते. अशा सेवेची सुरुवात करताना एका नवशिक्याला आलेले हे अनुभव – संपादक. कामशेत न सोडता राहायचा महिना झाला. पगार झाला. दोनशे रुपये उधारी चुकवली – परत हजार रुपयेच उरले. कसं जमवावं आता? एवढ्यात एक मित्र असाच… Continue reading कामशेत ३
आत्ता या क्षणी…
मागणं आज लग्नाचा पन्नासावा वाढदिवस, बोल तुला काय देऊ? फूल, अत्तर, साडी? अरे हो, तुझा विश्वास तर ढगात बसलेल्या देवाला साकडं घालण्यावर आहे नाही का? त्याच्याकडेच सतत काही ना काहीतरी मागत असतेस! आमचं दीर्घायुष्य असो, मुलाचा संसार असो, मुलीची बढती असो – सतत दुसऱ्यासाठी मागणं असतं. मग म्हणतेस की “तुमच्या… Continue reading आत्ता या क्षणी…
माय ओन वर्ड्स
रुथ बॅडर गिंझ्बर्ग या अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होत्या. ‘माय ओन वर्ड्स’ या पुस्तकात मेरी हार्टनेट आणि वेंडी विल्यम्स यांनी संकलित केलेले न्या. गिंझ्बर्ग यांचे विविध लेख, भाषणे आणि निकालपत्रे यांचा समावेश आहे. त्याची सुरुवात शाळकरी रुथच्या आठव्या इयत्तेत लिहिलेल्या एका संपादकीयापासून होते. हे रूढार्थाने आत्मचरित्र नसले तरी न्या. गिंझ्बर्ग… Continue reading माय ओन वर्ड्स
कविता : उपचार
माझ्या नैतिक कण्याला सदसद्विवेकाची टोचणी लागलीय हात पाय बधिर होतात, कधीमधी बोबडी वळते. हल्ली आजार थोडासा बळावलाय मेंदूही बधिर होतो. ‘डाव्या’ इतिहासाचे चुकीचे ट्रॅक्शन लावल्याचा हा सारा परिणाम असे तज्ज्ञ म्हणतात . नशीब … हा आजार फारसा संसर्गजन्य नाही , शिवाय आजाराविरोधात हर्ड इम्युनिटी चांगली काम करते. याला धर्माची गोळी… Continue reading कविता : उपचार
अभिवाचन – डिसेंबर २०२३
‘सामाजिक संस्कारांची पखरण करणारी बोधमालिका’ असे ज्या उपक्रमाचे सार्थ वर्णन केले गेले व ज्याने संपादक भानू काळे यांना भरीव समाधान मिळवून दिले अशी ‘नव्या जगाची सुरुवात’ ही ‘अंतर्नाद’मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात मालिका.” Be the Change You Want “ असे वाचकांना हसत खेळत सोप्या शब्दात व नित्याच्या अनुभवांमधून सांगणारी ही मालिका… Continue reading अभिवाचन – डिसेंबर २०२३
बेंगलोर डायरी २
बेंगलोर की बंगळुरू? सदराचे नाव ठेवतानापण मला प्रश्न पडला होता; पण जरी कागदोपत्री नाव बदलले असले तरी तोंडी बसलेले नावच ठेवू म्हणत ‘बेंगलोर डायरी’ हे नाव ठेवले. या शहराच्या या नावाबाबतपण एक आख्यायिका आहे. बाराव्या शतकातील होयसळ राजा वीर बल्लाळ दुसरा हा शिकारीहून येताना रस्ता चुकला; तेव्हा त्याला… Continue reading बेंगलोर डायरी २
एक न-खेळाडूंचा क्रिकेट सामना
‘भारताची ओळख काय?’ असा प्रश्न जर विचारला तर सिनेमा व क्रिकेट यांचे वेड हे एक संभाव्य उत्तर देता येईल. आपण सर्वजण नुकतेच जागतिक करंडकाच्या निमित्ताने भारतात आलेल्या क्रिकेट प्रेमाच्या साथीतून हळूहळू बरे होत आहोत. या क्रिकेट प्रेमाला मराठी सारस्वतदेखील कसे अपवाद असेल? नानासाहेब गोरे, माधव मनोहर, ग. ल. ठोकळ इत्यादी… Continue reading एक न-खेळाडूंचा क्रिकेट सामना
पंडिता मालिनीताई राजूरकर
गृहिणी ते विख्यात गायिका त्यांची माझी प्रत्यक्ष भेट फक्त दोन वेळा झाली होती. एरवी त्या व्यासपीठावर गायिका म्हणून आणि मी समोर श्रोता हेच आमचं मुख्य नातं होतं. त्यांच्या असंख्य सामान्य चाहत्यांपैकी, रसिकांपैकी मी एक! संगीताच्या व्याकरणापर्यंत मी कधी पोहोचले नाही – पोहोचावं असं कधी वाटलंही नाही. संगीतानंदाच्या पायरीवरच थांबले. त्यांचं… Continue reading पंडिता मालिनीताई राजूरकर
ये है बॉंबे मेरी जान… भाग २
बृहन्मुंबईचा इतिहास (२) आपण ज्या भागाच्या इतिहासाचा मागोवा घेणार आहोत तो भाग ऐतिहासिक काळातील उत्तर कोकण या प्रदेशात येतो. या प्रदेशाच्या सीमा कोणत्या? तर दक्षिणेस चौल बंदरापासून (रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग) उत्तरेला दमणगंगा नदीपर्यंत (जी आज गुजराथमध्ये येते) व पूर्वीचा संपूर्ण ठाणे जिल्हा. या प्रदेशाचा सर्वात जुना उल्लेख इसवी सनाच्या… Continue reading ये है बॉंबे मेरी जान… भाग २
उच्च शिक्षणाचा गाभा ४ – नेतृत्व पाहिजे
अमेरिकेत पाय ठेवल्यापासून अगदी बालवाडीपासून ते कॉलेजपर्यंत आणि त्यानंतर नोकरी धंद्यामध्येसुद्धा सतत नेते व्हा’ हा धोशा ऐकू येतो. ‘काम सुरू करा! थांबू नका! पुढे व्हा! करून बघा! मोठी स्वप्नं बघा! नव्या कल्पना मांडा!’ असा आग्रह जिकडे तिकडे चालू असतो. सुरुवातीला ह्याचा मला फार विस्मय वाटायचा. कळायचंच नाही की बालवाडीतल्या… Continue reading उच्च शिक्षणाचा गाभा ४ – नेतृत्व पाहिजे
स्वागत -आरोही
‘मूल वाढताना बघणं हा मोठा आनंद असतो; पण मुलाच्या वाढीचा एक क्षण एका वर्षाएवढा असेल तर…?’ चटका लावणारा हा प्रश्न समोर ठेवत राजेश्वरी किशोर ‘आरोही-विशेष फूल फुलताना’ या अंतर्मुख करणाऱ्या कथनाची सुरुवात करतात. संसाराच्या वेलीवर फुललेलं पहिलं फूल दिव्यांग आहे हे स्वीकारण्यापासून सुरू होणारी ही अवघड वळणांची कहाणी. शारीरिक,… Continue reading स्वागत -आरोही
अमूर्ततेचा शोध
भारतात अनेक जातींची, वेगवेगळ्या धर्मांची, विविध पंथांची, विविध भाषांची, वेगवेगळ्या विचारसरणींची, वेगवेगळा पेहराव करणाऱ्यांची जशी रेलचेल आहे तसेच चित्रकलेच्या क्षेत्रातही असंख्य वेगवेगळे प्रकार आहेत. काही जण वास्तववादी चित्रं काढण्यात, काही जण व्यक्तिचित्रं रेखाटण्यात; तर काही जण निसर्गचित्रांत माहीर असतात. काही जण अमूर्त आकारांच्या चित्रशोधात सतत मग्न व तल्लीन झालेले असतात.… Continue reading अमूर्ततेचा शोध
‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें’ – संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला – भाग ४
ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास हे संतकविपंचक. त्यांच्या काव्यवैशिष्ट्यांचा रसास्वाद घेणाऱ्या लेखमालेचा भाग चौथा ‘संतकवी तुकाराम’ ‘भगवद्भक्ति कराया बहु जड जीवांसी जो तुका शिकवी| त्याच्या दुसरा धरणीवरि येइल कोण हो तुकासि कवी?’ ‘तुकारामांनी आपल्या भक्तिरसपूर्ण अभंगांतून जडजीवांना शिकवण दिली. त्याच्या ‘तुका’सी कोणीही येणार नाही. – त्यांच्याशी कोणत्याही कवीची तुलना होऊ… Continue reading ‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें’ – संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला – भाग ४
महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
श्रेयनामावली
मार्गदर्शक: भानू काळे
संपादक: अनिल जोशी
व्याकरण सल्लागार: सुषमा जोशी
व्यवस्थापन मंडळ: अजित कानिटकर, अनिल शिदोरे, उमाकांत घाटे, स्नेहा अवसरीकर
तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे
