फेब्रुवारी २०२५

मुखपृष्ठाविषयी : फेब्रुवारी २०२५ 

या वेळच्या  मुखपृष्ठ  चित्रकार आहेत प्रियांका काळे… आपल्या या चित्राविषयी त्या  म्हणतात :  A few years back, while speaking to someone, I realised that I had no hobbies. I do not count watching TV or reading books in that category. So on a whim, I decided to go to  a… Continue reading मुखपृष्ठाविषयी : फेब्रुवारी २०२५ 

प्रकाशन वृत्तांत – शेवटचा दिस गोड व्हावा

डॉ.अनिल जोशी लिखित ‘शेवटचा दिस गोड व्हावा!’ या पुस्तकाचा प्रकाशन वृत्तांत.    राजा असो वा रंक, आयुष्याचा शेवट गोडच व्हावा, क्लेशदायक, दुःखदायक असू नये हीच प्रत्येक मनुष्यप्राण्याची कायम इच्छा असते आणि अर्थातच  तसा शेवट सर्वांनाच मिळतो असे नाही; मग आपण उगाच त्यातही एक उतरंड लावतो. पुढच्या पिढीचे चांगले दिवस पाहून समाधानाने… Continue reading प्रकाशन वृत्तांत – शेवटचा दिस गोड व्हावा

गांधारी 

  चिंता ही वैशाखातल्या वणव्यासारखी असते. वणव्यात अर्धेअधिक जंगल खाक होते. झाडे, वेली, जनावरे, पक्षी, रानवासी सगळे भस्म होतात. शिकारीला गेलेला असताना एकदा देवव्रत भीष्म वणव्यात सापडला; त्याचे सर्वांग भाजून गेले; केवळ नशीब बलवत्तर म्हणून भीष्म वाचला. ह्या ग्रीष्मातली ही अंगाची लाहीलाही करणारी दुपार आणि मनाला जाळणाऱ्या चिंतेचा वणवा! माता… Continue reading गांधारी 

आठवणीतील प्राध्यापक निशिकांत मिरजकर

दिल्ली विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख, तौलनिक साहित्याभ्यासाचे प्राध्यापक आणि ख्यातनाम अनुवादक निशिकांत धोंडोपंत मिरजकर यांचे शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी निधन झाले. ते दिल्ली विद्यापीठात सहा वर्षे विभाग प्रमुख आणि तीन वर्षे कलाशाखेचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. काव्यलेखनाने त्यांनी साहित्य निर्मितीला सुरुवात केली. संत साहित्य, आधुनिक मराठी साहित्य व तौलनिक… Continue reading आठवणीतील प्राध्यापक निशिकांत मिरजकर

‘शुभाशुभाचा फिटे किनारा’ 

   ते १९६१-६२ चे वर्ष होते. मी नौरोसजी वाडिया कॉलेज, पुणे येथे बी. ए.च्या प्रथम वर्षाच्या वर्गात शिकत होते. दरवर्षी कॉलेजचे (Miscellaneous) ‘मिसलेनियस्’ नावाचे एक  नियतकालिक  प्रसिद्ध होत असे. त्यात मराठी, हिंदी, इंग्लीश अशा तिन्ही भाषांमधून विद्यार्थ्यांचे साहित्यिक लेखन प्रसिद्ध होत असे. लेखनाची आवड असल्यामुळे मीही त्यात माझी एक कविता,… Continue reading ‘शुभाशुभाचा फिटे किनारा’ 

गुरु असावा परमगुणी

शनिवारी दि. १० जानेवारीला सर गेल्याची बातमी वाचली आणि मन उदास झाले. त्यांच्या सहवासातील आठवणींनी अंतःकरण व्याकूळ केले. एक गुरू, शिक्षक, मार्गदर्शक म्हणून त्यांचे माझ्या जीवनात अनन्यसाधारण स्थान आहे. त्यांच्या विचारांचा, संस्कारांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. त्यांचा जो सहवास मला मिळाला त्यामुळे माझे जीवन समृद्ध झाले आहे. त्या आठवणी माझा… Continue reading गुरु असावा परमगुणी

प्रश्नोपनिषद :फेब्रुवारी २०२५ 

मंडळी,   आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.  केवळ  बाणाचे टोक आणि झाडाच्या फांदीवर बसलेल्या त्या पक्ष्याचा डोळा पाहणारी  एकाग्र नजर   ही एका  धनुर्धराची  गोष्ट आपण ऐकत आलो आहोत. पण हे परिस्थितीचे सम्यक  चित्र असू शकत नाही.  बाण  आणि डोळा… Continue reading प्रश्नोपनिषद :फेब्रुवारी २०२५ 

हिंदी चित्रपटातील काही उत्तम कथ्थक नृत्ये (२)

 गाण्यांप्रमाणेच नृत्य हा भारतीय चित्रपटांचा अविभाज्य भाग  आहे. भारतात कथ्थक, ओडिसी, मणिपुरी आणि भरतनाट्यम हे मुख्य ‘शास्त्रीय’ नृत्यप्रकार. केरळचे मोहिनीअट्टमही यांत धरायला हवे. हिंदी चित्रपटात लोकनृत्ये, पाश्चात्त्य नृत्यप्रकार यांशिवाय या प्रकारातील नृत्ये सादर झालीच. या लेखात काही उत्तम कथ्थक नृत्यांची ओळख करून घेऊ. ज्या प्रमाणे चित्रपटगीते जरी एखाद्या रागात बांधलेली… Continue reading हिंदी चित्रपटातील काही उत्तम कथ्थक नृत्ये (२)

लेखन अनुभव

एका सांस्कृतिक इतिहासाची शतकोत्तर वाटचाल पुणे भारत गायन समाज एक सुरेल स्वरयात्रा – ११० वर्षांचा सांगीतिक प्रवास (भाग १) २०१७-१८ सालची गोष्ट आहे. गायिका पंडिता शैला सुधीर दातार यांचा फोन आला. “अगं! एक सप्टेंबर १९११ रोजी देवगंधर्व भास्करबुवा बखले – माझे आजेसासरे – यांनी ‘किर्लोस्कर भारत गायन समाजा’ची स्थापना केली.… Continue reading लेखन अनुभव

विचार आणि भावना

         मानवी शरीर हे अत्यंत गुंतागुंतीचे, अजब यंत्र आहे असे म्हणतात. एखाद्या उत्पादनाची अचूक आणि अपेक्षित रूपात निर्मिती करण्यासाठी आधी एका यंत्राची निर्मिती होत असते. कापडाचे तुकडे एकत्र आणून कपडे शिवण्यासाठची बारीकशी सुई हे एक प्रकारचे यंत्र आणि असंख्य सुटे भाग एकत्र आणून अतिभव्य वस्तूचे उत्पादन करणारे साधनही यंत्रच. अशा… Continue reading विचार आणि भावना

जात का जात नाही? 

 भारतीय समाजात  असलेली जातिव्यवस्था नष्ट केली पाहिजे, जातिव्यवस्था हा भारतीय समाजावरचा कलंक आहे वगैरे वैचारिक प्रहार जातिव्यवस्थेवर गेली अनेक वर्षे होत आहेत; परंतु ‘जात काही जात नाही’ ही एक वस्तुस्थिती आहे. जातिव्यवस्था हजारो वर्षे टिकून आहे हेसुद्धा एक वास्तवच आहे. कोणतीही व्यवस्था उपयोगी नसेल तर ती गोष्ट किंवा व्यवस्था नष्ट… Continue reading जात का जात नाही? 

अभिवाचन भाग १२

ग्रंथाली प्रकाशित ‘मोरपिसं’ या अनुराधा गानू लिखित ललित लेखांच्या अभिवाचनाची शृंखला या अंकासोबत समाप्त होते आहे .     लेखिकेचा परिचय…  १९७८ सालापासून अमेरिकेत वास्तव्य होतं. टॅक्स आणि अकाउंटिंगचा स्वतःचा व्यवसाय. लॉस एंजेलिसच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्यानं सक्रिय सहभाग. वाचन, लेखन, नाट्य, अभिनय यांची आवड.  स्थानिक संगीतकार गोपाळ मराठे यांनी संगीतबद्ध केलेल्या… Continue reading अभिवाचन भाग १२

महुद  ते ह्युस्टन : १ 

माझी २६ वर्षांची शिक्षण मॅरेथॉन १) महुदची वर्षे (इयत्ता १ ली ते ४ थी) १९६२-६६ लोक मला विचारतात  माझ्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये २६ वर्षे शिक्षण घेण्याचा उत्साह आणि संयम कसा होता?  मी गमतीने सांगतो,  “मी खरंतर माझ्या शिक्षणाची ३ वर्षे वाचवली! देवाचे आभार, माझ्या पालकांना मला झोपण्यासाठी आणि खेळण्यासाठी शाळेत… Continue reading महुद  ते ह्युस्टन : १ 

मन वढाय वढाय : लेख २ रा

चिंता रोग…मनात उसळलेली दंगल माझ्या पहिल्या लेखाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप धन्यवाद. मानसिक आजारांची ओळख तर आपली झालीच आहे. सध्या परीक्षांचा काळ असल्यामुळे  यावेळी  चिंतारोग म्हणजेच स्ट्रेस हा विषय घेत आहे. “डॉक्टर मला खूप अस्वस्थ वाटतंय; काही सुचतच नाही; खूप टेंशन आलंय.” साधारणपणे ४५ वर्षे वयाचे जोशीकाका त्यांच्या… Continue reading मन वढाय वढाय : लेख २ रा

कवितेचं एक पान : खोलवर रुतणारा उद्गार – विराणी 

‘विराणी’ हा शब्द वाचला की संत ज्ञानेश्वर आठवतात… मीराबाई आठवते… लता मंगेशकर आठवतात… मग आठवतो त्यातील विरहिणीचा आर्त, व्याकूळ भाव. मन कातर कातर होतं; तरी कुठेतरी उदात्त असं, अलौकिक असं काही उरात दाटूनही येतं. पण कवी अनिलांची ‘विराणी’ वाचली –  मन खिन्न, उदास उदास होऊन गेलं. अनिलांच्या या विराणीत मिलनाची… Continue reading कवितेचं एक पान : खोलवर रुतणारा उद्गार – विराणी 

प्रतिसाद: फेब्रुवारी  २०२५ 

भानू काळे यांचा श्री. सारडा यांच्यावरील लेख वाचून जुनी आठवण जागली. दिलीपराज प्रकाशनाचे राजीव बर्वे यांनी मला सांगितले, की नाशिकच्या श्री.सारडा यांना तुमच्या ‘पत्रांजली’ कादंबरीच्या अनेक प्रती हव्या होत्या. त्या तेव्हा उपलब्ध नव्हत्या म्हणून दिलीपराजतर्फे दुसरी आवृत्ती काढण्याचे ठरले. इथून पुढे माझा दिलीपराज बर्वे यांच्याशी स्नेह जुळला. त्यांनी माझी बरीच… Continue reading प्रतिसाद: फेब्रुवारी  २०२५ 

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

श्रेयनामावली 

 मार्गदर्शक : भानू काळे

 संपादक : अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी 

तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे

Author

2 thoughts on “फेब्रुवारी २०२५

  1. Namaskar, I am Friend of Shirish Paripatyedar. Can You Please Give Me Your Mobile Contact. I Want to Save it. My Mob Number is 9822009673 Yogesh V. Abhyankar, Originally Dombivali , Now Pune

Leave a Reply