भानू काळे यांचा श्री. सारडा यांच्यावरील लेख वाचून जुनी आठवण जागली. दिलीपराज प्रकाशनाचे राजीव बर्वे यांनी मला सांगितले, की नाशिकच्या श्री.सारडा यांना तुमच्या ‘पत्रांजली’ कादंबरीच्या अनेक प्रती हव्या होत्या. त्या तेव्हा उपलब्ध नव्हत्या म्हणून दिलीपराजतर्फे दुसरी आवृत्ती काढण्याचे ठरले. इथून पुढे माझा दिलीपराज बर्वे यांच्याशी स्नेह जुळला. त्यांनी माझी बरीच पुस्तके प्रसिद्ध केली; पण याला निमित्त ठरलेले पण मला कधी न भेटलेले हे थोर व्यक्तिमत्त्व.
श्री.सारडा यांना श्रद्धांजली
विजय पांढरीपांडे, हैद्राबाद.
