मंडळी,
आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू. त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.

केवळ बाणाचे टोक आणि झाडाच्या फांदीवर बसलेल्या त्या पक्ष्याचा डोळा पाहणारी एकाग्र नजर ही एका धनुर्धराची गोष्ट आपण ऐकत आलो आहोत. पण हे परिस्थितीचे सम्यक चित्र असू शकत नाही. बाण आणि डोळा यांच्यामध्ये जो अवकाश असतो त्याचे भान ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे असते का?
आपली उत्तरे/प्रतिसाद सदराच्या खाली कॉमेंट स्वरूपात देऊ शकता किंवा ई-मेल द्वारा jaysss12@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकता.
आपले मत आपण 9422647283 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारादेखील पाठवू शकता.
आणि हो,
या सदरासाठी आपल्याला पडलेले अशा प्रकारचे प्रश्नदेखील आपण पाठवू शकता.
संपादक
