सप्टेंबर २०२४

मुखपृष्ठाविषयी : सप्टेंबर २०२४

या वेळचे आपले छायाचित्रकार आहेत अद्वैत कुलकर्णी.  पक्ष्यांच्या छायाचित्रणाविषयी बोलताना ते म्हणतात की या प्रकारच्या छायाचित्रणासाठी आत्यंतिक संयम व तंत्रज्ञानावरची हुकमत या दोन्ही गोष्टी कामी येतात. आपले गुरू, पुण्यातील फर्गसन  महाविद्यालयातील प्राध्यापक चंद्रशेखर बापट यांच्याकडून अद्वैत  छायाचित्रणाचे कसब व फिल्म प्रोसेसिंग शिकले.  एमबीए झाल्यानंतर नोकरीनिमित्त सध्या ते ऑस्ट्रेलियात आहेत.  तेथेही… Continue reading मुखपृष्ठाविषयी : सप्टेंबर २०२४

संपादकीय : शितावरून भाताची परीक्षा

ब्रिटनच्या मुदतपूर्व निवडणुकीची घोषणा झाली त्या वेळी योगायोगाने आम्ही लंडनमध्ये होतो.  कसलीही लिखित घटना नसताना चालणाऱ्या या आगळ्यावेगळ्या लोकशाहीबद्दल मनात कुतूहल होतेच. मजूर पक्षाचे नेते व आताचे पंतप्रधान सर किर  स्टारमर यांनी या निवडणुकीसाठी मजूर पक्षाच्या प्रचार मोहिमेचा आरंभ केला.  ती सभा  बीबीसीवरून पाहता आली.  वक्तृत्व फारसे प्रभावी नसले तरी… Continue reading संपादकीय : शितावरून भाताची परीक्षा

तमिळनाडू (२): ममल्लापुरम आणि पुदूचेरी

चेन्नईला यायच्या आधीच तिथे असताना मम्मलापुरम आणि पुदूचेरी या दोन ठिकाणी जायचे नक्की केले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळी अगदी लवकरच आम्ही घर सोडले – उन्हाचा त्रास टाळायचा म्हणून. कोरोमंडल किनाऱ्यालगतच्या समुद्राला समांतर असलेला इस्ट कोस्ट रोड घेतला. दोन्ही शहरे तशी याच रस्त्यावर आहेत. दुतर्फा छान दाट झाडी होती. अण्णांना (आशुतोष… Continue reading तमिळनाडू (२): ममल्लापुरम आणि पुदूचेरी

प्रश्नोपनिषद : सप्टेंबर  २०२४

मंडळी,   आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.   या वेळच्या प्रश्नाची थोडीशी पार्श्वभूमी अशी : मराठीतील एक ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांनी  मागील महिन्यात ९१व्या वर्षात पदार्पण केले आहे. तब्बल ३७ वर्षे रसाळ सरांनी मराठी साहित्य आणि भाषेचे अध्यापन केले.… Continue reading प्रश्नोपनिषद : सप्टेंबर  २०२४

स्वागत : कविता संग्रह : ” अंतर्मुखी..”

       ” पुरुषातल्या सगळ्या  गाळलेल्या जागा         आई लपवत जाते         बायको भरत जाते         आम्ही यालाच पौरुष मानत जगतो..” इतकं सटीक आणि खरं लिहिणाऱ्या कवी मकरंद गोडबोले यांचा ” अंतर्मुखी ” हा पहिला वहिला कवितासंग्रह !  व्यवसायाने वास्तुविशारद  असलेला मकरंद खूप लहानपणापासूनच लिहितोय आणि ते ही थोडं हटके !एका मोठ्या कंपनीत संस्थापक… Continue reading स्वागत : कविता संग्रह : ” अंतर्मुखी..”

पुनर्भेट नॅशनल पार्कची(१०)

श्रावणात पाहिलेले विरही प्राणी   रिमझिम पाऊस  सुरू झाला.                                 पाऊस पडत असतानाच पडणाऱ्या लख्ख उन्हाने श्रावणाची वर्दी आसमंतात पोहोचवली. जांभळ्या तुऱ्यांनी बहरलेली एक ताम्हण आमच्या हॉस्पिटलच्या खिडकीतून माझे लक्ष वेधून घेते. मी दीड वर्षांपूर्वी कोकणात होते. तिथे ताम्हणीचा बहर वैशाखाच्या  शेवटी संपून जायचा आणि श्रावणात त्यावर चिकूच्या आकाराची गोल फळं… Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची(१०)

बेंगलोर डायरी ११

  कोणतेही शहर परिचयाचे करून घ्यायचे असेल तर चालत ते शहर पाहावे. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन नक्की सापडते. काही दिवसांपूर्वी मी अशीच बेंगलोरमध्ये चालत असताना एम जी रोडच्या बाजूला अचानक एक पुतळा दिसला. हातात पुस्तक घेतलेला हा पुतळा कोणाचा म्हणून कुतूहलाने त्या पुतळ्याजवळ गेले आणि खरोखरीच आश्चर्यचकित करणारी माहिती तिथे होती.… Continue reading बेंगलोर डायरी ११

कविता:वाडा वोss माय

माय,मला येळ वाडा वो दादा, दे की जरा तुज्जोळचा येळ ए मैतरनी,अगं एss भयनी, अगं घाल की उलुसा येळ माझ्या वाडग्यात काय म्हंता दादा, काय म्हंता ताई माज्जोळ तं म्वाप वाडगा भरून सांडुस्तो हाय की वेळ हा हा हा बरूबर हाय बगा तुमचं सकाळी उठल्यापासून रात्री कवातरी झोपूस्तो हा ss… Continue reading कविता:वाडा वोss माय

स्वागत : सिंफनी (कादंबरी)

सिंफनी  (कादंबरी) : लेखक – विवेक गोविलकर  एखाद्या कंपनीतल्या सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या उद्दिष्टांनुसार काम करणे अपेक्षित असते; पण त्यात वैयक्तिक दृष्टिकोनाने परस्पर विरोधी ताणतणाव निर्माण होऊ शकतात. सॉफ्टवेअर बनवणारे लोक टेस्टिंगसाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत असतील तर सेल्सच्या लोकांना ते सॉफ्टवेअर लवकरात लवकर ग्राहकापर्यंत पोहचवण्याची घाई असते.  घर… Continue reading स्वागत : सिंफनी (कादंबरी)

शारीरिक व्यायामाचे रेणवीय प्रभाव

                                                  मानव प्रजातीच्या उत्क्रांतीची कहाणी बारीक नजरेने पाहिली तर  शारीरिक श्रम – ज्याला आज आपण व्यायाम म्हणतो – हा महत्त्वाचा दोरखंड आरंभापासून मानवाच्या मादी आणि नराला (स्त्री आणि पुरुष) उत्क्रांत करत आला आहे असे दिसते.                             … Continue reading शारीरिक व्यायामाचे रेणवीय प्रभाव

कोट्यधीश भारतीय संगीत : २ 

(हा लेख कणकवलीत वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान  आयोजित एका संगीत-रसग्रहण कार्यशाळेच्या दरम्यान झालेल्या चर्चेच्या आधाराने  लिहिला आहे.) आता यानंतर आपण ज्या सांगीत कोटीचा विचार करणार आहोत ती आहे लोकसंगीताची. लोकसंगीत म्हणजे भारताच्या विविधतेचं  मनोज्ञ दर्शन घडवणारी सांगीत कोटी आहे. विविधता आणि अनेकवाद या दोन्ही तत्त्वांचं  दर्शन या कोटीत आपल्याला घडतं. लोकसंगीतात… Continue reading कोट्यधीश भारतीय संगीत : २ 

ग्रंथयात्रा – एक प्रवास  ८

ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी  वेगवेगळ्या  मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे.  यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी… अवघ्या ११७ पानांची, छोट्या आकाराची परंतु तिच्या कक्षेत अतिशय विस्तृत असा जीवनपट मांडणारी आणि आशयगर्भित अशी ही… Continue reading ग्रंथयात्रा – एक प्रवास  ८

नात्यांचे शिवधनुष्य..

परवा मित्राचा फोन आला. माझ्याच वयाचा… चांगला पाऊण एक तास बोलत होता. या वयाचे एक दुखणे असते – एकटेपण वाढीला लागलेले; शिवाय वाढत्या वयाच्या शारीरिक दुखण्यातून उद्भवलेल्या नैसर्गिक तक्रारी… खरे दुःख असते ते जवळची नाती तुटत चालल्याचे – आपलीच रक्ताची माणसे दुरावत चालल्याचे. हा दुरावा अनेक कारणांनी आलेला! मुलं मोठी… Continue reading नात्यांचे शिवधनुष्य..

बोल सुना जानी – अर्थात चिजांच्या मुखड्यावर आधारित चित्रपटगीते (१) 

हिंदी चित्रपटांतील जी गाणी मूळ शास्त्रीय बंदीश किंवा उपशास्त्रीय (ठुमरी, दादरा वगैरे) गाण्यांवर बेतलेली आहेत आणि ज्या गाण्यांचा मुखडादेखील मूळ बंदिशीशी साधर्म्य असलेलाच आहे त्या गाण्यांबद्दल लिहीत आहे; पण त्यापूर्वी काही मराठी गाण्यांबद्दलही लिहितो. महाराष्ट्रात शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्यात नाट्यसंगीताने खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक जुनी नाट्यपदे त्या काळी… Continue reading बोल सुना जानी – अर्थात चिजांच्या मुखड्यावर आधारित चित्रपटगीते (१) 

एक दक्षिणी लग्न

ह्यूस्टनमधली आर्द्रतेची शाल पांघरलेली सकाळ! हिम सूर्यकिरणांनी वितळतं; ही आर्द्रता आणखीनच घन होत जाणारी… हवेला जडशीळ करणारी! मर्टलची जागोजागी फुललेली प्रसन्न मोठाली झाडं, काही वृक्षागतदेखील. आमच्या ॲरिझोनातील नेहमीच्या पालो वेर्दे, फायकस, कॅक्टस या सदाहरितांपेक्षा कितीतरी वेगळी. या झाडाफुलांमधून व्यक्त होणारी भूमीची भाषा मला अनोळखी आणि म्हणून आकर्षक. लाल विटांच्या इमारतीत… Continue reading एक दक्षिणी लग्न

कोळवली…एक घरेलू सहल

                        सुनीलच्या म्हणजे माझ्या यजमानांच्या घरची वडिलोपार्जित जमीन अबलोलीच्या पुढे कोळवली या गावी आहे, असं काही वर्षांपूर्वी समजलं होतं. तिकडे कधीच कुणी गेलेलं नव्हतं. आमची ही जमीन बघायला जायचा घाट आम्ही घातला, तेव्हा गुहागर या गावाशिवाय आजूबाजूचं आम्हांला काहीच माहीत नव्हतं.                          गुहागरला जाताना वाटेत अबलोली गावाकडे जाण्याचा फाटा लागतो. तिथून पुढे… Continue reading कोळवली…एक घरेलू सहल

अभिवाचन भाग ७

७ ग्रंथाली प्रकाशित ‘मोरपिसं’ या अनुराधा गानू लिखित ललित लेखांच्या अभिवाचनाची शृंखला आपण  सुरू केली आहे.   लेखिकेचा परिचय…  १९७८ सालापासून अमेरिकेत वास्तव्य होतं. टॅक्स आणि अकाउंटिंगचा स्वतःचा व्यवसाय. लॉस एंजेलिसच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्यानं सक्रिय सहभाग. वाचन, लेखन, नाट्य, अभिनय यांची आवड.  स्थानिक संगीतकार गोपाळ मराठे यांनी संगीतबद्ध केलेल्या व… Continue reading अभिवाचन भाग ७

आगामी

 इच्छामरण, सुखमरण, दयामरण; काही समानार्थी शब्दांची मालिका.  वाढते आयुर्मान, विदेशांत होणारे तरुण सुशिक्षितांचे वाढते स्थलांतर,  वैद्यक शास्त्रातील तंत्रज्ञानाने गाठलेले प्रगतीचे नवनवे टप्पे या सर्वांमुळे समाजापुढे काही वेगळेच प्रश्न उभे केले आहेत.  दुर्धर आजाराने ग्रस्त, आसन्नमरण व प्राणांतिक वेदना सहन करणाऱ्या लोकांचे नक्की करायचे काय- हा  त्यातला एक ठळक प्रश्न.  या… Continue reading आगामी

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

श्रेयनामावली 

 मार्गदर्शक : भानू काळे

 संपादक : अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी 

तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे

Author

3 thoughts on “सप्टेंबर २०२४

Leave a Reply