आकांताच्या काठावर…

सक्काळीच फोन वाजला. आजींना दचकून जाग आली. कोणाचा असेल एवढ्या सकाळी फोन? या विचारात त्यांनी उशीखाली चाचपडत चष्मा शोधला, डोळ्यांवर चढवत किलकिल्या नजरेने स्क्रीनवर बघितलं; पण झोपेचा अंमल असलेल्या डोळ्यांना धुरकट दिसत होतं. मग त्यांनी तो चष्मा काढला आणि गाऊनच्या झालरीला पुसला. तोवर फोन वाजून वाजून गप्पच झाला. “मेल्यांनो,जर्रा म्हणून फोन उचलेपर्यंत धीर नाही,” म्हणत त्यांनी नाव बघितलं. समोरच्या फ्लॅटमधल्या रिचर्डचा फोन होता. ‘याचं काय … Continue reading आकांताच्या काठावर…

कविता:वाडा वोss माय

माय,मला येळ वाडा वो दादा, दे की जरा तुज्जोळचा येळ ए मैतरनी,अगं एss भयनी, अगं घाल की उलुसा येळ माझ्या वाडग्यात काय म्हंता दादा, काय म्हंता ताई माज्जोळ तं म्वाप वाडगा भरून सांडुस्तो हाय की वेळ हा हा हा बरूबर हाय बगा तुमचं सकाळी उठल्यापासून रात्री कवातरी झोपूस्तो हा ss इथून तिथ्थोर  हातपाय पसारल्याला येळच येळ हाय वो, पन एकलाच हाय पाठचं पोटचं कुनीच न्हाई  … Continue reading कविता:वाडा वोss माय