ग्रंथयात्रा – एक प्रवास  ८

ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी  वेगवेगळ्या  मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे.  यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी…

अवघ्या ११७ पानांची, छोट्या आकाराची परंतु तिच्या कक्षेत अतिशय विस्तृत असा जीवनपट मांडणारी आणि आशयगर्भित अशी ही कादंबरी आहे, ‘सावित्री!’ लेखक आहेत पुरुषोत्तम शिवराम रेगे अथवा पु. शि. रेगे. तत्काळ मिळणार्‍या मेसेजेसनी जग जोडलं जाण्यापूर्वी पत्र हेच जेव्हा दूरस्थ व्यक्तींशी संवाद साधण्याचं माध्यम होतं, त्या जगातील एका मनोहारी नात्याचा प्रवास दाखवणार्‍या कादंबरीविषयी जाणून घ्या या व्हिडिओमधून. प्रोफेसर मनीषा नागपुरे यांच्याकडून ऐका, या कादंबरीच्या लेखनातील वैशिष्ट्ये.

Author

Leave a Reply