स्वागत : सिंफनी (कादंबरी)

सिंफनी  (कादंबरी) : लेखक – विवेक गोविलकर 

एखाद्या कंपनीतल्या सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या उद्दिष्टांनुसार काम करणे अपेक्षित असते; पण त्यात वैयक्तिक दृष्टिकोनाने परस्पर विरोधी ताणतणाव निर्माण होऊ शकतात. सॉफ्टवेअर बनवणारे लोक टेस्टिंगसाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत असतील तर सेल्सच्या लोकांना ते सॉफ्टवेअर लवकरात लवकर ग्राहकापर्यंत पोहचवण्याची घाई असते. 

घर आणि ऑफिसमधल्या जबाबदार्‍यांची कसरत, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, पीआर आणि सोशल मीडिया, लैंगिक छळाची  तक्रार, अशक्यप्राय डिलिव्हरी डेट्स, देशी आणि विदेशी कायदे व कोर्ट-कचेर्‍या या आणि अशा गोष्टींमधून मित्र आणि सहकारी कधीकधी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना दिसतात. अशा वेळी सर्वांना सांभाळून घेत एकत्रितपणे काम करायला लावणे हे एखाद्या सिंफनी ऑर्केस्ट्राच्या कंडक्टरसारखे कौशल्याचे काम असते. त्यातून निर्माण झालेले मधुर संगीत ग्राहकांच्या संतोषाला कारणीभूत ठरते. 

एकविसाव्या शतकातल्या कॉर्पोरेट जगातली ही काल्पनिक पण खर्‍याच्या जवळ जाणारी कथा.

प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस 

आता उपलब्ध : www.majesticreaders.com 

दूरध्वनी : ०२२-२०८३०२०७, ०२२-२३८७३५२ .

Author

Leave a Reply