मुखपृष्ठाविषयी : ऑगस्ट २०२५
या वेळच्या मुखपृष्ठ कलाकार आहेत साताऱ्याच्या मनस्विनी लाटकर. त्या स्वतःविषयी सांगतात : मी मनस्विनी लाटकर, सातारा. मी फाईन आर्ट्स घेऊन पुण्याच्या भारती विद्यापीठामधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर मी freelancing करायचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात २०१७ पासून केली. लोकांना माझं काम माहीत होण्यास थोडासा वेळ लागला. पहिलं काम कसं… Continue reading मुखपृष्ठाविषयी : ऑगस्ट २०२५
संपादकीय : ती गोळी आज मारली गेली असती तर?
माल्कम ग्लॅडवेल हे लेखक अमेरिकेत खूप लोकप्रिय आहेत. एखाद्या सामाजिक प्रश्नाची सहसा आपल्याला न जाणवणारी एखादी बाजू समोर आणून त्यावर आपण विचार करणे आणि वाचकाला विचार करायला भाग पाडणे ही त्यांची खासियत. त्यांची प्रज्ञा अवकाशात त्यांना हवी तशी विहार करते आणि त्यातून अनेक नवनव्या शक्यता निर्माण होतात. त्यांच्या प्रज्ञेच्या असाधारण… Continue reading संपादकीय : ती गोळी आज मारली गेली असती तर?
बिजू पटनाईक : आधुनिक ओडिशाचे एक मानबिंदू
प्रत्येक प्रांतात कुठल्या ना कुठल्या श्रेष्ठ विभूती होऊन गेलेल्या असतात आणि त्यांचा सार्थ अभिमान तेथील जनतेला असतो. त्यात काहीच गैर नाही. ‘यांची तेजस्वी परंपरा म्हणजे मी’ ही जाणीव कुठल्याही समाजात एक अस्मिता निर्माण करते आणि समाजाच्या सांस्कृतिक घडणीसाठी तशी सामूहिक अस्मिता आवश्यकही असते. म्हणूनच एखादा प्रांत नीट समजून घेण्यासाठी… Continue reading बिजू पटनाईक : आधुनिक ओडिशाचे एक मानबिंदू
काव्यचमत्कृती
या नवीन सदरात प्राचीन काळातील बंधरचनांचा अभ्यास करून सुषमा जोशी स्वरचित काव्यरचना मांडणार आहे . १)अष्टदल कमल बंध काव्याचं सौंदर्य नक्की कशाकशांत असतं? शब्द, मांडणी, विचार, जाणिवेत झिरपणारी अनुभूती! कधी विषयाचं सौंदर्य, कधी कल्पनाचातुर्य, कधी शाब्दिक सौंदर्य, कधी छंद-वृत्तांमुळे लाभलेलं गेयतेचं सौंदर्य; तर कधी यमकादी अलंकारांनी लहडून आलेलं सौंदर्य. मम्मट… Continue reading काव्यचमत्कृती
कविता : ऑगस्ट २०२५
१) मला आवडेल मला आवडेल संध्याकाळी लांब लांब होत जाणाऱ्या सावल्यांशी लपंडाव खेळायला मला आवडेल जागेपणीच असंख्य स्वप्नांचे मनोरे रचून त्यांच्याबरोबर लगोऱ्या खेळायला मला आवडेल एखाद्या खूप गाजलेल्या पुस्तकातील एकच अक्षर होऊन चिरंजीव व्हायला मला आवडेल साधुसंतांच्या आध्यत्मिक चैतन्यातून स्फूर्ती घेऊन अन्यायाशी सतत दोन हात करायला २) मन कोठे तरी… Continue reading कविता : ऑगस्ट २०२५
गावोगाव…
गाव आभाळ जिथे घन गर्जे ते गाव मनाशी निजले. अंधार भिजे धारांनी घर एक शिवेवर पडले… अन् पाणवठ्याच्या पाशी खचलेला एकट वाडा मोकाट कुणाचा तेथे कधी हिंडत असतो घोडा… झाडातून दाट वडाच्या कावळा कधीतरी उडतो. पारावर पडला साधू हलकेच कुशीवर वळतो… गावातिंल लोक शहाणे कौलांवर जीव पसरती पाऊस परतण्याआधी … Continue reading गावोगाव…
कथा – सैनिक
गोळ्यांचे आवाज थांबले होते; तरी सावध असायला हवंय. शत्रू तसा हुशार आहे. तोही मी बाहेर पडायचीच वाट बघत असणार. मेजरसाहेबांनी सांगितलंय, “सकाळपर्यंत जागा सोडायची नाही. शत्रूला थोपवून ठेवायचा आहे. शत्रू हुशार आहे. त्याची पद्धत म्हणजे, आधी तुफान गोळाबारी करायची आणि नंतर भयाण शांतता. असे वाटावे, की तो निघून गेलाय. मग… Continue reading कथा – सैनिक
पुनरपि जननं : प्रकरण सहावे
अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले. ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप… Continue reading पुनरपि जननं : प्रकरण सहावे
मन वढाय वढाय :भाग ७
स्किझोफ्रेनिया भाग २ गोष्ट लखू आणि रेखाची. मागील भागामध्ये आपण स्किझोफ्रेनिया या गंभीर आणि प्रदीर्घ आजाराची माहिती घेतली आणि प्रातिनिधिक स्वरूपातील एका रुग्णाची कथादेखील वाचली. आज मी तुम्हांला तीन वेगवेगळ्या रुग्णांच्या गोष्टी सांगणार आहे. लखूपासून आपण सुरुवात करू या. लखू पंढरपूरजवळच्या एका वस्ती-वजा खेडेगावात लखूचे कुटुंब राहत होते. लखू, त्याचा… Continue reading मन वढाय वढाय :भाग ७
प्रश्नोपनिषद : ऑगस्ट २०२५
मंडळी, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू. त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा. मराठीतील एक ख्यातनाम समीक्षक रा. ग. जाधव आपल्या ‘माझे चिंतन’ या पुस्तकात म्हणतात, “ माझी अशी श्रद्धा आहे, की १००% सेक्युलर मीमांसेलाही प्राचीनातील श्रेष्ठ साहित्य कृतींचे अवमूल्यन करता येणार नाही. यासाठी समग्र सांस्कृतिक… Continue reading प्रश्नोपनिषद : ऑगस्ट २०२५
अभिवाचन : शाकारणी घराची व मनाची
अभिवाचन व लेखन : स्वानंद कुलकर्णी, इचलकरंजी Continue reading अभिवाचन : शाकारणी घराची व मनाची
झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.६
माझे सोलापूर आणि रेल्वे आता तांत्रिकदृष्ट्या मी बराच सक्षम झालो होतो. एक उत्तम संकेत आणि दूरसंचार रेल्वे अभियंता म्हणून मी सरावलेला म्हणण्यापेक्षा, रेल्वेच्या प्रत्येक कामाला ‘रुळावलेला’ झालो होतो असे म्हणायला हरकत नाही. कोणतेही काम सराव झाल्याखेरीज आणि आपल्याला काय-काय करायचे आहे व कसे करायचे आहे याचे थोडक्यात पूर्वनियोजन असल्याशिवाय उत्तम… Continue reading झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.६
अथातो न्याय जिज्ञासा (३)
‘दैव रुसले दैव हसले’ अहिल्यानगर जिल्ह्यातील ही सत्यकथा आहे. श्रीपती पवार आणि त्यांची पत्नी सोजराबाई हे अल्पभूधारक शेतकरी आपल्या दोन लहान मुलांसोबत आनंदात राहत होते. शेती थोडी असल्यामुळे भाजीपाला पिकवून आठवड्याच्या बाजाराला तालुक्याच्या गावी किंवा जवळच्या मोठ्या गावी जाणे, धान्य व भाजीपाला विक्रीतून येणाऱ्या पैशांतून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणे असा त्यांचा… Continue reading अथातो न्याय जिज्ञासा (३)
महुद ते ह्यूस्टन :लेख(७)
माझ्या अमेरिकेमधील आयुष्यातील आणि शेलमधील कारकिर्दीतील अनुभव आणि शिकवण (‘मेल्टिंग पॉट’ संस्कृती आणि अमेरिकेतील व्यावसायिक जीवन) (सप्टेंबर १९८१ – सध्या) हा जवळपास ४४ वर्षांचा प्रदीर्घ काळ आहे, त्यामुळे मी फक्त काही ठळक गोष्टी सांगेन : ह्यूस्टनसारख्या मोठ्या अमेरिकन शहरांतील भारतीय समुदायाचे जीवन, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण, काम व आराम यांचे… Continue reading महुद ते ह्यूस्टन :लेख(७)
प्रतिसाद – ऑगस्ट २०२५
अर्कचित्र : मनस्विनी लाटकर ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ नुकताच आषाढी एकादशीला ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या नाट्यवाचनाचा प्रयोग पाहिला. मधुराणी गोखले आणि इतर कलाकारांनी इतकं सुरेख उभं केलेलं वारीचं चित्र पाहताना मला पंढरपूरच्या वारीतले माझे ते दिवस आठवले. अर्थात, संपूर्ण वारी मी कधी केली नाही; पण त्यातला एक दिवसाचा टप्पा मात्र बऱ्याच… Continue reading प्रतिसाद – ऑगस्ट २०२५
अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(२)
आकाशवाणीचं हे… ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च। वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’ (उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे. ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.) भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली. … Continue reading अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(२)
महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
श्रेयनामावली
मार्गदर्शक : भानू काळे
संपादक : अनिल जोशी
व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी
तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी, स्नेहल आपटे
