मंडळी,
आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू. त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.
मराठीतील एक ख्यातनाम समीक्षक रा. ग. जाधव आपल्या ‘माझे चिंतन’ या पुस्तकात म्हणतात,
“ माझी अशी श्रद्धा आहे, की १००% सेक्युलर मीमांसेलाही प्राचीनातील श्रेष्ठ साहित्य कृतींचे अवमूल्यन करता येणार नाही. यासाठी समग्र सांस्कृतिक दृष्टीकोन नि स्वच्छ इतिहासदृष्टी यांची गरज मात्र आहे. मराठी समीक्षेला व प्रज्ञेला हे केवढे तरी मोठे आव्हान आहे. पण आपली समीक्षा आव्हाने स्वीकारतच नाही, असे मला वाटते.
मला वाटते, समाजातील कलासाहित्यांत चिकित्सक रस घेणारा जो अभिजन वर्ग असतो त्याला उद्देशून समीक्षा केली जाते. या वर्गाचे कसलेही व्यावहारिक हितसंबंध कलासाहित्यात गुंतलेले नसतात. सगळ्याच सांस्कृतिक आविष्कारांची चोखंदळपणे दाद घेणारा व सांस्कृतिक संचिताचे संवर्धन करणारा हा वर्ग असतो.”
जाधव सरांच्या या मताबद्दल आपल्याला काय वाटते?
आपली उत्तरे/प्रतिसाद सदराच्या खाली कॉमेंट स्वरूपात देऊ शकता किंवा ई-मेल द्वारा
jaysss12@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकता.
आपले मत आपण 9422647283 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारादेखील पाठवू शकता.
आणि हो,
या सदरासाठी आपल्याला पडलेले अशा प्रकारचे प्रश्नदेखील आपण पाठवू शकता.
संपादक
