मुखपृष्ठाविषयी : एप्रिल २०२४
मुखपृष्ठ छायाचित्र : श्रीराम दांडेकर जर्मनीतल्या एका बागेत फिरताना हिरव्यागार पार्श्वभूमीवर फुललेल्या या फुलाने लक्ष वेधून घेतले. Continue reading मुखपृष्ठाविषयी : एप्रिल २०२४
संपादकीय : जयपूर लिटफेस्ट आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
प्रतिवर्षी जानेवारीत जयपूर शहर एका वेगळ्याच कारणाने सांस्कृतिक विश्वाच्या केंद्रस्थानी येते – निमित्त असते तेथे भरणाऱ्या जयपूर लिटफेस्टचे. नुसत्या भारताचेच नाही; तर एक प्रकारे जगाचे लक्ष वेधून घेण्यात या आयोजनाला यश आले आहे. सुरू होण्याच्या आधी दरम्यान आणि नंतरदेखील सर्व प्रसार माध्यमे या फेस्टिवलला चांगली प्रसिद्धी देतात. आयोजनादरम्यान सादर झालेले… Continue reading संपादकीय : जयपूर लिटफेस्ट आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
राम दिखाया पत्थरोंने : १
रामकथा ही भारतीय संस्कृती आणि धर्माचा एक अविभाज्य भाग आहे. रामायण महाकाव्यातील कथानकावर आधारित अनेक कलाकृती निर्माण केल्या गेल्या आहेत.त्यामध्ये शिल्पकला हा ही एक महत्त्वाचा प्रकार आहे.रामकथेचे शिल्पांकन हे अनेक रूपात आढळते. मंदिरे, स्तूप, गुंफा, आणि इतर अनेक वास्तूंवर रामायणा मधील विविध प्रसंगांचे शिल्पांकन पहायला मिळते . या शिल्पांमध्ये… Continue reading राम दिखाया पत्थरोंने : १
मोठी माणसे ७ : आनंद यादव
मला वाटतं, साधारण १९७९ च्या सुमाराला महाराष्ट्र सरकारने नवीन लेखकांच्या पुस्तकांना उत्तेजन मिळावे म्हणून नवलेखक उत्तेजन अनुदान योजना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा (म.रा.सा.सं.मं.) तर्फे सुरू केली होती. तेव्हा माझ्या कविता नियतकालिकांतून प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या .त्याबरोबरच मी मोठ्या कवींच्या कवितांची विडंबनेही करू लागलो होतो . आपणही या योजनेसाठी अर्ज… Continue reading मोठी माणसे ७ : आनंद यादव
डॉमिनिक लापिएर : समाजातून साहित्य, साहित्यातून समाज ???
साहित्याच्या पलीकडे जाऊन समाजावर आपला ठसा उमटवणारा आणि भारताबद्दल विशेष जवळीक असलेला एक प्रतिभावान साहित्यिक फ्रांसमधील आपल्या घरी ४ डिसेम्बर २०२२ ला वारला. १९३१ साली जन्मलेले डॉमिनिक लापिएर मृत्यूसमयी ९१ वर्षांचे होते. शेवटची दहा वर्षे ते कोमामध्ये होते. निमित्त झाले होते पाय घसरून पडल्याचे. ‘वेदनांपासून त्यांना आता मुक्ती मिळाली आहे,’… Continue reading डॉमिनिक लापिएर : समाजातून साहित्य, साहित्यातून समाज ???
बेंगलोर डायरी ६
क्रिकेट आणि चित्रपट या भारताला जोडून ठेवणाऱ्या दोन गोष्टी आहेत. चित्रपट समजण्यासाठी प्रत्येक वेळी भाषा ओळखीची असावी लागतेच असे नाही तर अनेकदा चित्रभाषा सगळी बंधने तोडून माणसांना जोडतात. दक्षिण भारतीय असे वर्णन केले जाते तेव्हा या दक्षिण भारतात पाच वेगवेगळी राज्ये आहेत आणि त्यांच्या चार भाषा, वेगळी संस्कृती आहे याचा… Continue reading बेंगलोर डायरी ६
संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला :भाग ६वा
‘संत-पंतांच्या मधले मौक्तिक’ मुक्तेश्वर (भाग १) ‘आता कथेचे अन्नसत्र| घाली विश्वामाजी पवित्र||’ सरस्वतीचा असा आशीर्वाद लाभलेले कवी मुक्तेश्वर! या आशीर्वादाने मुक्तेश्वरांच्या मनात स्फूर्तीचे धुमारे फुटले. ‘त्या कारुण्यवसंत वातें| मूढमानसशुष्कलतें| स्फूर्तीचे पल्लव फुटले तेथे| कवित्व फळे फळभारें||’ कवी म्हणून मुक्तेश्वरांची ओळख जनमानसाला झाली तो काळ होता संतकवींचा. संतांच्या काव्याचा मुख्य हेतू… Continue reading संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला :भाग ६वा
खरा इंस्टंट चहा
कोको, कॉफी आणि चहा ! गेल्या काही दिवसांत नेटवर घरगुती इंस्टंट चहा अशा अनेक पोस्ट्स दिसल्या. मला विचारावेसे वाटतेय की यावर लोक विश्वास कसा ठेवत असावेत? आता मला सांगा फिल्टर कॉफी (किंवा साधी कॉफी) आणि नेसकॉफी यांत काही फरक आहे की नाही ? (नेसकॉफी हे एक ब्रांडनेम आहे; पण ते… Continue reading खरा इंस्टंट चहा
कविता :परीस्पर्श
तशी साऱ्यांच्याच मनात असते लपलेली आभाळाला स्पर्श करण्याची इच्छा आपले पाय असतात जखडबंद अदृश्य अनुल्लंघनीय गुरुत्वाकर्षणाने येते एखादी परी वेगळ्याच मितीतून उतरते जमिनीवर अगदी अलगद असते ती आपली पण नसते आपल्यात मुक्तहस्ते देऊन जाते काही विलक्षण चाकोरीबद्ध चौकटीपलीकडचे परीस्पर्शाने होत नाही आपले सुवर्ण आपण नसतो धड लोखंडही तरी काही अपार्थिव… Continue reading कविता :परीस्पर्श
पुनर्भेट नॅशनल पार्कची ५ : वसंत ऋतूतील आठवणी
थंडी कमी होऊ लागली तसतसा ग्लीरीसिडीयाचा गुलाबी बहर कमी होऊ लागला. ग्लीरीसिडीयाची जागा आता वसंत ऋतूत शेवरीच्या लालभडक फुलांनी घेतली. घंटेच्या आकाराची शेवरीची फुलं दरवर्षी वसंतावर जणू चवऱ्या ढाळत असतात. आमच्या व्याघ्रविहाराच्या रस्त्यावर एक काळा कुडा अंगांगाने बहरून आला आहे. नावात याच्या काळा रंग असला तरी फूल मात्र पांढऱ्या शुभ्र… Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची ५ : वसंत ऋतूतील आठवणी
*उर्दू भाषा आणि उर्दू गझल* : भाग २
मागील लेखात आपण गझलची काही रचनात्मक वैशिष्ट्ये पाहिली. आता गझलचे प्रकार पाहू. याचे प्रकार मुख्यत्वे करून असे आहेत : १) सुफियाना ( हम्द, नआत , मनकबत) २) रुमानी गझल ३) तरक्की पसंद ( सुधारणावादी ) ४) जदीद ( नवमतवादी ) ५) आझाद गझल तुम्ही म्हणाल की ती तलत अज़िज,… Continue reading *उर्दू भाषा आणि उर्दू गझल* : भाग २
ग्रंथयात्रा – एक प्रवास ३
ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर वेगवेगळे मराठी साहित्य प्रकार मांडत आहेत. यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी… मराठीमध्ये केशवसुतांनी पहिल्यांदा स्वतःच्या भावना व्यक्त करणारी आणि आत्मनिष्ठ स्वरूपाची कविता लिहिली. आपल्या मनातील भावविश्व शब्दांत साकार करून त्यांनी मराठी… Continue reading ग्रंथयात्रा – एक प्रवास ३
आणिले टिपूनी अमृतकण : भाग २
‘मनी आणावे ते ते होते कृपा केलिया रघुनाथे प्रचिती येते’ समर्थ रामदासांचे हे शब्द ग. दि. माडगूळकरांच्या लेखन-प्रतिभेला तंतोतंत लागू पडतात. त्यांच्या गीतांच्या झोक्यांनी गाव-खेड्यातले चिमुकले डोळे झोपी जातात. ‘गोरी गोरी पान’, ‘नाच रे मोरा’ अशी बालगीतं शाळाशाळांची स्नेहसंमेलनं गाजवतात. ‘गीत-रामायण’नं ओसऱ्या राममय होऊन जातात. चित्रपटगीतांनी मराठी वाद्यवृंदांना ओळख मिळते.… Continue reading आणिले टिपूनी अमृतकण : भाग २
नाही पुण्याची मोजणी
नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगौघाचे पाणी कशाचा न लागभग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे पराग आम्हा नाही नाम-रूप आम्ही आकाशस्वरूप जसा निळा निळा धूप पूजेतल्या पानाफुला मृत्यू सर्वांग सोहळा धन्य निर्माल्याची कळा —बा. भ. बोरकर मोठ्या रुबाबात ‘पोएट बोरकर’ अशी स्वतःची ओळख करून देणारे कविवर बाळकृष्ण… Continue reading नाही पुण्याची मोजणी
अभिवाचन : मोरपिसं
ग्रंथाली प्रकाशित ‘मोरपिसं’ या अनुराधा गानू लिखित ललित लेखांच्या अभिवाचनाची शृंखला आपण सुरू केली आहे . लेखिकेचा परिचय… १९७८ सालापासून अमेरिकेत वास्तव्य होतं. टॅक्स आणि अकाउंटिंगचा स्वतःचा व्यवसाय. लॉस एंजेलिसच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्यानं सक्रिय सहभाग. वाचन, लेखन, नाट्य, अभिनय यांची आवड. स्थानिक संगीतकार गोपाळ मराठे यांनी संगीतबद्ध केलेल्या व… Continue reading अभिवाचन : मोरपिसं
मालिकांचा सावळा गोंधळ
कृष्णधवल जमान्यातील मालिका हा एक वेगळाच जिव्हाळ्याचा विषय होता. त्याबद्दल अजूनही मन:पूर्वक बोललं जातं. अगदी सुरुवातीच्या काळात टीव्ही फक्त संध्याकाळी असायचा. बातम्यांमध्ये सर्वात आधी स्मिता गोविलकर ( तळवलकर ) शाळेच्या युनिफॉर्मचीच साडी नेसून interview साठी गेली आणि थेट बातम्या देऊनच आली! प्रदीप भिडे, शोभा तुंगारे, ज्योत्स्ना किरपेकर ह्याही होत्या. सुरभि… Continue reading मालिकांचा सावळा गोंधळ
रद्दीतील रत्ने १
एका अस्पृश्याच्या मुंजीची मौज पालघर येथील सुधीर दांडेकर यांचे लिखाण अंतर्नादच्या माध्यमातून आपण वाचत आहोत. दांडेकर यांच्याकडे सुमारे पन्नास वर्षांच्या कालावधीतील वृत्तपत्रांतून किंवा इतर नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या विषयांवरील कात्रणांचा खूप मोठा संग्रह आहे. यांतील निवडक कात्रणांवर आधारित ‘रद्दीतील रत्ने’ ही लेखमालिका सुरू करीत आहोत. आजचे वृत्तपत्र हे उद्याची… Continue reading रद्दीतील रत्ने १
महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
श्रेयनामावली
मार्गदर्शक: भानू काळे
संपादक: अनिल जोशी
व्याकरण सल्लागार: सुषमा जोशी
व्यवस्थापन मंडळ: अजित कानिटकर, अनिल शिदोरे, उमाकांत घाटे, स्नेहा अवसरीकर
तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे

सर्व लेख विषय मांडणी,हे मनुष्याचे जीवनाशी निगडीत,अभ्यासपूर्ण ,कुठ तरी लेखाचा विचार हृदयाला स्पर्श करतोय असे वाटते.ह्या अंकास माझ्याकडून खूप धन्यवाद.
श्री.भानू काळे यांची दोन भागातील प्रदीर्घ मुलाखत लक्षपूर्वक ऐकली…तद्नंतर जे विचारतरंग मनीं उमटले,.ते कोणते, हे शेअर करायला आवडेल……
त्यांचा व माझा कालखंड साधारण एकच,..
संवयी व बॅकग्राऊंड सारखेच वाटले,.त्यामुळे कदाचित empathy..(समानशीले व्यसनेषु…)
चोखंदळ वाचकांची अभिरुची उंचावून बहुजनांना आणखी समृद्ध करण्यात अंतर्नाद व काळे यांचा मोलाचा वाटा आहे,हे on record करुं इच्छितो.
काळ नित्य प्रवाही असतो,बदलतही असतोच,त्याला सामोरे जाऊन अंतर्नाद बंद झाला असला तरी इ-रूपाने अधिक उजळला आहे,आणि पुढेही नव्या रूपात फोफावणार हे निरीक्षणही नोंदवू इच्छितो.
शुभेच्छा.
सत्यविजय हरी नामदास
अंतर्नाद चा नव्या स्वरूपातील पुनर्जन्म भावला. धन्यवाद आणि अभिनंदन.
@ॲड.लखनसिंह कटरे,
अनिल
तुझा अंतर्नाद अक्षरशः मेजवानी असतो.
आणि संपादकीय पक्वान्न.
औरंगाबादच्या रा ग जाधवांच्या अध्यक्षतेतल्या साहित्य संमेलनाला हजर राहण्याचा योग आला तसा जयपूर लिटफेस्टचा माहौल बघायचाही यावा अशी आंस लागली आहे.
डॉमिनिक लापिएर, फ्रीडम ॲट मिडनाईट, सिटी ॲाफ जॅाय स्मृति चाळवून गेलं.
कन्नड सिनेसृष्टी, विनया जंगलेची सचित्र जंगल सफारी मस्तच.
आठवा शाहीर ग दि मा,
बुवांच्या सुरांमधून आधी पोहचणारी “ नाही पुण्याची मोजणी”, रद्दीतली अनोखी रत्नं, मुक्तेश्वरांच रसाळ काव्य… काय आणि किती बोलू …..
किती साक्षेपी संपादन …
अंतर्नादचं हे आंतरजाल रूप मस्तच आहे.
चित्र, छायाचित्र मजा आणतात. शिवाय कानांना ही मेजवानी. अगदी पंचेंद्रियांना सुखावणारा अनुभव…