ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर वेगवेगळे मराठी साहित्य प्रकार मांडत आहेत. यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी…
मराठीमध्ये केशवसुतांनी पहिल्यांदा स्वतःच्या भावना व्यक्त करणारी आणि आत्मनिष्ठ स्वरूपाची कविता लिहिली. आपल्या मनातील भावविश्व शब्दांत साकार करून त्यांनी मराठी कवितेचे रूपच बदलून टाकले. कवितेला अक्षरगणवृत्तांच्या बंधंनातून मुक्त करून मनातील भाव व्यक्त करण्यास ती सुकर केली. केशवसुतांच्या कवितेचा सर्वात महत्त्वाचा विशेष म्हणजे त्या कवितांतून त्यांनी केलेलं रूढीभंजन. त्यांच्या अत्यंत गाजलेल्या तुतारी या कवितेत ते मागासलेल्या प्रथांविरुद्ध बंडच पुकारतात. स्वतःला येणारे जीवनातील खोल अनुभव व्यक्त करणारी, मानवी हक्कांचा आणि समतेचा आग्रह धरणारी, मनातले प्रेम धीटपणे व्यक्त करणारी केशवसुतांची कविता समजून घेण्यासाठी अवश्य पहा हा व्हिडिओ.
