मुखपृष्ठाविषयी : नोव्हेंबर २०२५
छायाचित्र सौजन्य : सौ. शुभदा दांडेकर, मुंबई. कोकणातील ही मनमोहक हिरवाई पाहून त्या म्हणतात, “रंग हिरवा,गंध हिरवा, मनही ओले, अधीर हिरवे, सृष्टीचे ते रूप मनोहर, बीज तृणांनी अंकुरले” Continue reading मुखपृष्ठाविषयी : नोव्हेंबर २०२५
संपादकीय
एक गोष्टीवेल्हाळ वाचकाग्रणी पालघर येथील सुधीर दांडेकर अंतर्नाद वाचकांना एक व्यासंगी लेखक म्हणून सुपरिचित आहेत. या नोव्हेंबरच्या अंकातदेखील त्यांचा एक अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळेल. सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक घटनांचा वेध घेण्याची त्यांची एक निराळी पद्धत आहे. अशा प्रकारचा वेगळा विचार करण्यासाठी आवश्यक असणारे वाचन आणि चिंतन ते विपुलपणे करत असतात. त्यांचा… Continue reading संपादकीय
भटकंतीत दिसलेली बेंगळुरूची झलक
बेंगळुरूमध्ये प्रवाशांनी बघण्यासारखे खूप काही आहे; अशा कांही आगळ्यावेगळ्या जागांविषयी लिहिण्यासारखेही खूप काही आहे. उदाहरणार्थ : इंटरनॅशनल आयटी पार्कमुळे आणि वर्षातील चार महिने जिथे सत्यसाईबाबा वास्तव्य करीत त्या त्यांच्या भव्य आश्रमामुळे प्रसिद्ध असलेले उच्चभ्रू व्हाइटफिल्ड. तेथील एका लॉजमध्ये होणाऱ्या वीकएंड पार्ट्यांना सव्वाशे वर्षांपूर्वी बंगळुरूमधे राहणारा तरुण विन्स्टन चर्चिल जात… Continue reading भटकंतीत दिसलेली बेंगळुरूची झलक
बिनकाट्याचा गुलाब
२०२५ साल हे पु.ल. देशपांडे यांच्या २५ व्या स्मृतिदिनाचे (दि.१२ जून २०२५) आणि सुनीताबाईंच्या जन्मशताब्दीच्या शुभारंभाचे (दि. ३ जुलै २०२५) वर्ष आहे आणि चालू महिन्यात पु.लं. चा जयंती दिन (दि. ८ नोव्हेंबर) आहे. याचे औचित्य साधून पु. लं.च्या बाबा आमटे यांच्या आनंदवनाशी जुळलेल्या ऋणानुबंधांचा धांडोळा घेणारा हा लेख ‘अंतर्नाद ’च्या… Continue reading बिनकाट्याचा गुलाब
शंकुकाव्य
या काव्यप्रकाराचा उगम हल्लीचाच असावा. पहिल्या ओळीत जितकी अक्षरं असतात त्यापेक्षा एक अक्षर कमी दुसऱ्या ओळीत, असं एक-एक अक्षर कमी कमी करत शेवटी एका अक्षरावर यायचं. त्यामुळे काव्याचं रूप शंकूसारखं निमुळतं दिसतं. या बंधात्मक प्रकाराचा प्रयत्न केला आहे. मला एकच नियम माहीत आहे — अक्षरसंख्येचा. जाणकारांनी आणखी नियम सांगितले तर… Continue reading शंकुकाव्य
झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.९
पंढरपूर मिरजचे ब्रॉड गेजमध्ये कसे रूपांतर झाले झाले ते गेल्या लेखात आपण पाहिले. परिणामतः आता थेट मुंबई-पंढरपूर गाडी सुरू झाली आणि ‘पांडुरंग प्रसन्न झाला’ असे वारकरी म्हणू लागले. मग सोलापूर मंडळ खऱ्या अर्थाने पूर्णपणे ब्रॉडगेज झाले. काही वारकऱ्यांचा रोष आम्हांला पत्करावा लागला पण तो भाग वेगळाच; कारण पंढरपूर-मिरजमधील छोटी-छोटी… Continue reading झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.९
पुनरपि जननं : प्रकरण नववे
अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले. ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप… Continue reading पुनरपि जननं : प्रकरण नववे
अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(५)
आकाशवाणीचं हे …. ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च। वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’ (उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.) भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती… Continue reading अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(५)
संस्मरणीय व्यक्तिविशेष! अनंतराव लिमये
अनंत लिमये हे पेशाने सिव्हिल इंजिनियर होते. त्यांनी ६० च्या दशकापासून पुढे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासाठी कंत्राटी पद्धतीने बरीच कामे केली.पंढरपूरचा नवीन पूल त्यांच्याच कारकिर्दीत झाला.कामानिमित्त ते रत्नागिरीत असताना लेखक श्याम जोगळेकर यांचे कुटुंब त्यांच्या शेजारी राहायचे. पुढे अनंतराव व श्याम जोगळेकर या दोघांनीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी काम केले. त्यामुळे… Continue reading संस्मरणीय व्यक्तिविशेष! अनंतराव लिमये
भूगोलाचे बंदी
भारतीय माणूस व नकाशा यांची गाठ शालेय शिक्षणानंतर क्वचितच पडते. शालेय जीवनातसुद्धा भूगोलाचे शिक्षक भिंतीवरती मोठा नकाशा लावून जेव्हा काही शिकवतात तेव्हासुद्धा विद्यार्थी लांबूनच नकाशा बघतात. आपली नकाशाशी क्वचितच दोस्ती होते त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बहुतेकांच्या दृष्टीने भूगोल हा काही महत्त्वाचा विषय नसतो. त्याचा परिणाम असा होतो, की आपल्याला दिशांचे… Continue reading भूगोलाचे बंदी
अखेरचा हा तुला दंडवत
दोनच दिवसांपूर्वी लातूरच्या पॅथाॅलाॅजीच्या राज्य परिषदेत नेहमीप्रमाणेच सर्वांना मोहवून टाकणारे ‘सर्जिकल पॅथाॅलाॅजी’ या विषयावरचे अस्खलित व्याख्यान देणार्या डाॅ.अनिता बोर्जेस यांचे हृदयविकाराने निधन झाल्याचे अनपेक्षित वृत्त आले व मन एकदम गलबलून गेले. कसा विश्वास ठेवायचा या दुःखद वृत्तावर? त्यांच्याबद्दल अत्यंत आदर बाळगणार्या व्यक्तींच्या शोकसंदेशांची मालिका गेले दोन दिवस अव्याहत सुरू आहे.… Continue reading अखेरचा हा तुला दंडवत
🦚 मोर – ‘पिसाऱ्याची भाषा’
“मी आलोय… मी आलोय…” दुपारी दोन वाजले, की कंपाऊंडवर बसून तो मियांव मियांव अशी आरोळी ठोकायचा. जसं काही, ‘मी आलोय… मी आलोय… ये आता बाहेर,’ असं म्हणायचा. त्या आरोळीबरोबर तो माझ्या बागेत नव्हे… तर जणू एखाद्या दरबारात जातोय अशा राजेशाही थाटात उतरायचा. त्याच्यामागे आणखी एक-दोन शिकाऊ मोर आणि चार-पाच उत्साही… Continue reading 🦚 मोर – ‘पिसाऱ्याची भाषा’
एका लेटरहेडची गोष्ट
काय झाले, सध्या आमच्या घरात, घरातील काही खोल्यांचे जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे हस्तांतरण चालू आहे. चिरंजीव आणि सूनबाई ह्यांनी घराचा ताबा घेतलेला आहे; आमच्या आयुष्यभर जपून ठेवलेल्या आणि दहा-वीस वर्षे आम्हीच ढुंकूनदेखील न बघितलेल्या अशा सर्व गोष्टींचा, वस्तूंचा, पुस्तकांचा एका अर्थाने पंचनामा चालू आहे. हे कचरा निर्मूलन (त्यांच्याच शब्दात) चालू… Continue reading एका लेटरहेडची गोष्ट
कविता: नोव्हेंबर २०२५
मी अजूनही ‘लिहितो’ कविता ~~~~~~ मी लिहायचो कविता तिला भेटण्यापूर्वीपासूनच तेव्हा मात्र ती अस्फुट असायची तरी करायची घुसखोरी माझ्या कवितेत अलगद, अनायासेच, माझ्या नकळत लिहित गेलो मी कविता यमक टाळत तरी ती घुसायची एखाद्या ओळीत देऊन चकमा यमकाला गूढरम्य सरकत गेले दिवस असेच प्रकाशित होऊ लागल्या माझ्या कविता इथेतिथे, माय… Continue reading कविता: नोव्हेंबर २०२५
महुद ते ह्युस्टन: ९
माझ्या जीवनावरील चिंतन मला हा लेख लिहिणे दोन कारणांमुळे सर्वात कठीण गेले : मी यावर नक्कीच विश्वास ठेवतो : प्रथम एक निर्णय घ्या (अर्थातच, साधक-बाधक विचार करूनच; पण नेहमीच काही अनिश्चिततेसह) आणि नंतर त्याला ‘योग्य’ ठरवण्यासाठी कृती करा! १. पहिल्या २४ वर्षांत शिकलेले ‘मराठी’ आणि भारतीय मूल्ये मी नेहमीच माझ्या… Continue reading महुद ते ह्युस्टन: ९
महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
श्रेयनामावली
मार्गदर्शक : भानू काळे
संपादक : अनिल जोशी
व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी
तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी

छान आहे अंक. शंकुकाव्य हा प्रकार रोचक आहे.