मार्च २०२६

मुखपृष्ठ :  मार्च  २०२६ 

नवरंग : इंडियन पिट्टा  छायाचित्र : किशोर चोळकर  नवरंग (Indian Pitta) हा पक्षी त्याच्या अंगावरील नऊ सुंदर रंगांमुळे ओळखला जातो, म्हणूनच याला ‘नवरंग’ असे सार्थ नाव दिले गेले आहे. हा पक्षी दोन शिट्ट्या मारल्यासारखा ‘व्हिट-टीयू’ असा आवाज काढतो. पहाटे आणि सायंकाळी याचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. हा एक ‘स्थानिक स्थलांतरित’ (Local Migrant) पक्षी आहे. तो भारताच्या बाहेर जात नाही, तर… Continue reading मुखपृष्ठ :  मार्च  २०२६ 

संपादकीय : कोलंबियन आरोग्य व्यवस्थेच्या निमित्ताने

कोलंबिया हा दक्षिण अमेरिकेतील एक महत्त्वाचा देश. अमली पदार्थांच्या व्यापारासाठी आणि व्हेनेझुएलानंतर अमेरिकेचे लक्ष्य बनण्याची दाट शक्यता असलेला देश म्हणून आपल्या सर्वांना तो परिचित आहे. पाबलो एस्कोबार या अमली पदार्थ – तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या तस्करावर आधारित ‘नार्कोस’ ही नेटफ्लिक्सवरची मालिका खूप गाजली. या निमित्तानेही कोलंबिया व तेथील अमली पदार्थांचा व्यापार हा आपल्याला माहिती झाला. कोलंबिया हा दक्षिण अमेरिकेतील एकमेव असा… Continue reading संपादकीय : कोलंबियन आरोग्य व्यवस्थेच्या निमित्ताने

ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मानकरी 

‘महाकवी जी. शंकर कुरूप’ गेल्या महिन्यातील लेखात आपण विविध साहित्यिक पुरस्कार आणि विशेषकरून ‘ज्ञानपीठ पुरस्कारां’ची माहिती घेतली. ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे अशा सतरा साहित्यिकांचा यापुढील लेखांतून आपण परिचय करून घेणार आहोत.  तसे पाहता आतापर्यंत एकूण ६५ लेखकांच्या गळ्यात ज्ञानपीठ पुरस्कारांची माळ पडली आहे. त्या सर्वांचाच परामर्श घेणे शक्य नाही आणि मुळात त्याची आवश्यकतादेखील नाही. आपणांपैकी बरेच जण प्रामुख्याने मराठीतील… Continue reading ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मानकरी 

पाय फुटलेला व्यासंग

   फोडणीतली राई तडतडताना पाहून मीनाला फुटणाऱ्या लाह्यांची आठवण येते. लाह्यांवरून पॉपकॉर्न, तिथून  मॉलमधली पॉपकॉर्न  खाणारी, केस निळे रंगवलेली बाई असा राई ते बाई मनप्रवास घडतो. हे मानसशास्त्रीय विचार-साखळीचं एक उदाहरण आहे. ‘काट्याच्या अणीवर वसली तीन गावे,’ म्हणून सुरू केलेली विचारसाखळी संत ज्ञानेश्वर प्रारब्ध, संचित आणि क्रियमाणाच्या बुक्क्यांपर्यंत नेऊन सद्गुरूच्या पायीं पोचवतात. प्रत्येकाच्या मनातल्या  विचारांची भ्रमण-साखळी वेगवेगळी असते.  डॉ.आनंद जोशींनी… Continue reading पाय फुटलेला व्यासंग

अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा (९) 

 आकाशवाणीचं हे ….                                              ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।                                               वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’ (उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.) भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली.  भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे… Continue reading अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा (९) 

अरविंद पाटकर

विषय आणि लेखक निवडणारा, शोधणारा कार्यकर्ता     माझ्या आयुष्यात काही विलक्षण योगायोग आहेत. महाराष्ट्रातील साहित्यिक जीवनात राजहंस प्रकाशन आणि मनोविकास प्रकाशन या सुवर्णमुद्रा आहेत. अनुक्रमे दिलीप माजगावकर आणि अरविंद पाटकर या दोन धडपडणाऱ्या तरुणांनी अथक प्रयत्नांतून त्या उभ्या केल्या आहेत. माझ्या आयुष्यातील विलक्षण योगायोग हा, की या दोघांच्याही पहिल्या धडपडीच्या वाटचालीत जवळचा मित्र म्हणून मी त्यांच्याबरोबर होतो – त्या धडपडीच्या कालखंडाला… Continue reading अरविंद पाटकर

झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.१३  

लेखमाला सुरू  होऊन एक वर्ष झाले. हा लेख आणि पुढील लेख हे कोकण रेल्वे आणि इ . श्रीधरन यांच्याबद्दल आहेत. कोकण रेल्वेमध्ये विशेष नियुक्ती म्हणून मी तीन महिने होतो. माझ्या कामाबरोबर मी उत्सुकतेने इतर खात्यांची कामे पाहत होतो. त्यामध्ये स्थानकाची रचना, वापर केले गेलेले रूळ, त्यांचे वजन, बलास्ट (रुळाच्या खाली घालतात ती खडी आणि तिचा आकार) आमच्या आणि इतर खात्यांशी… Continue reading झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.१३  

जगभरातील चित्रपटांचा उत्सव पिफ  २०२६

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने २०२६ मध्ये २४ वर्षे पूर्ण केली. नुकताच हा महोत्सव पुण्यात १५ ते २२ जानेवारी या आठवड्यात थाटामाटात पार पडला. या महोत्सवात १०३ देशांतले १३० चित्रपट दाखवले गेले. स्पर्धा विभागात आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि मराठी चित्रपट या दोन्हीसाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रतिष्ठेचे पुरस्कार दिले गेले. पुरस्कारांचे परीक्षक म्हणून जगभरातील चित्रपट क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती आलेल्या होत्या. स्पर्धेच्या निवड समितीने आलेल्या… Continue reading जगभरातील चित्रपटांचा उत्सव पिफ  २०२६

पुनरपि जननं : प्रकरण तेरावे

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.  ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे : हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून… Continue reading पुनरपि जननं : प्रकरण तेरावे

पठण, वाचन आणि कुतूहल : ज्ञानसाधनेचा बदलता प्रवास

नवीन पिढीमध्ये इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोबाईल, टॅबलेट, संगणक आणि AI आधारित साधने आज दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. माहिती काही सेकंदांत उपलब्ध झाली आहे. प्रश्न विचारताच उत्तर मिळत आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची चिंता सतत व्यक्त केली जात आहे; ती म्हणजे नव्या पिढीमध्ये ‘वाचनसंस्कृती’चा होत असलेला ऱ्हास! अनेकांना असं वाटतं, की… Continue reading पठण, वाचन आणि कुतूहल : ज्ञानसाधनेचा बदलता प्रवास

दिलासा 

उमा बेडेकर, वय वर्षे ८५ यांनी, १४/०८/२००० ते १९/०८ /२००० या कालावधीत केलेल्या एका प्रवासाचे हे वर्णन आहे. पंचवीस वर्षांपूर्वी लिहिलेला हा लेख आहे. प्रवास साधाच, अक्कलकोट- पंढरपूर-तुळजापूर वगैरे असा आहे; पण लेखामध्ये जे जुन्या मराठी सांस्कृतिक वळणांचे उल्लेख आहेत, ते वाचनीय आहेत. उमाताई अगदी लहानपणी लग्न होऊन गुजरातमध्ये स्थायिक झाल्या. तिथल्या शाळांमध्ये त्यांनी चित्रकला आणि हिंदी शिकवले पण तरीही… Continue reading दिलासा 

गोष्ट बेंगलोरच्या उत्सवाची…

कोणतेही शहर हे एका रात्रीत घडत नसते. शहरातील रस्ते, इमारती, पुतळे इतकेच काही शहराची ओळख घडवत नसतात, तर त्या शहरात घडणार्‍या सांस्कृतिक गोष्टीदेखील तितक्याच महत्त्वाच्या असतात.  त्यामुळेच जयपूरसारखे शहर आता फक्त हवामहालामुळे नव्हे तर तिथल्या लिटरेचर फेस्टिव्हलमुळेदेखील ओळखले जाते. दर दोन वर्षांनी भरणारे कोची बिएन्नेल हेतर जगभरातील कला रसिकांचे हक्काचे ठिकाण. तसेच महत्त्व आहे मुंबईच्या काळा घोडा फेस्टिव्हलचे. जगभरात असे… Continue reading गोष्ट बेंगलोरच्या उत्सवाची…

शब्दांविना संवाद, डोळे बोलतात सारे… 

काही दिवसांपूर्वीचा  ‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्याना’मधील हा विलक्षण अनुभव – अनुभव म्हणण्यापेक्षा एक अनुभूती असे म्हणू या हवे तर…  नशीब म्हणा, योगायोग म्हणा, की काहीही असो, मला जंगलात किंवा सातारा शहराच्या आसपास, अगदी माझ्या घराच्या दारातदेखील  बिबट्याचे दर्शन पुष्कळ वेळा झाले आहे. प्रत्येक जंगल सफारीमध्येतर मला हमखास व्याघ्रदर्शन होणार हे नक्की असते.  बिबट्या पुष्कळ वेळा मला अगदी निकट दर्शन देऊन… Continue reading शब्दांविना संवाद, डोळे बोलतात सारे… 

माझा मॅरेथॉन( चा) प्रवास.. २०१७ ते २०२५ 

सदानंद पाटील हे पंढरपुरातील एक  प्रथितयश डॉक्टर आहेत. एक काऊच पोटॅटो ते सराईत  मॅरेथॉनपटू असा त्यांचा प्रवास कसा झाला ते त्यांच्याच शब्दांत ऐकू या. या निमित्ताने त्यांनी मॅरेथॉन धावण्याचे तंत्र व मंत्र याबाबत त्यांचे विचार मांडले आहेत. हे विचार अर्थातच त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांवर आधारित आहेत. त्यांचा स्वीकार करण्यापूर्वी  आपापल्या व्यक्तिगत डॉक्टरांशी बोलून मगच कसलाही निर्णय घेणे श्रेयस्कर ठरेल.  संपादक    … Continue reading माझा मॅरेथॉन( चा) प्रवास.. २०१७ ते २०२५ 

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

श्रेयनामावली 

 मार्गदर्शक : भानू काळे

 संपादक : अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी 

तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी

Author

2 thoughts on “मार्च २०२६

  1. अंक सर्वांग सुंदर..
    मुखपृष्ठ👌
    संपादकीय …वाचनीय…
    पण आपल्याकडे अजून चांगलं मॉडेल यायला हवं…
    छोट्या हॉस्पीटल (आमच्या सारख्या १५/२०बेड) खाजगी इन्शुरन्स कंपनी अडवतात…tie up साठी भरमसाठ पैसा (१०/१२लाख) २वर्षा साठी मागतात..
    त्यामुळे multispeciality hospital ना इन्शुरन्स परवडतो..
    झुक झुक गाडी..knowlagable…
    उमा ताई च्या लेखाने मी पण भूतकाळात गेले.. माझं सर्व मेडिकल शिक्षण Dr VM Govt medical college madhye झालं..
    तरी कधी तेंव्हा आणि अजून गाणगापूर दर्शन घडले नाही..
    पण बाकी सर्व झालं.. अक्कलकोट..तुळजापूर…पंढरपूर..सिद्धेश्वर…
    त्या आठवणी जाग्या झाल्या…
    जी शंकर… लेख ही छान 👌

Leave a Reply