मुखपृष्ठ : जानेवारी २०२६
प्रकाशाचे आणि लाटेचे नाते हा फोटोग्राफ माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, हे नाते आणि भावना टिपायचा. केप कॉडचा नॉसेट समुद्र किनारा अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. हा फोटो त्याच ठिकणी सूर्योदयाच्या वेळी थंडीच्या मोसमात काढलेला आहे. सकाळची सोनेरी किरणे लाटांवर पसरून लाटा खूपच सुंदर दिसत होत्या. हे फक्त एक क्लिक नाहीये; तर लाटांचे स्वरूप आणि सौंदर्य कॅमेऱ्यात चित्ररूपात बद्ध करण्याचे… Continue reading मुखपृष्ठ : जानेवारी २०२६
संपादकीय : जानेवारी २०२६
अनिश्चितता भारतातील सुशिक्षित आणि उच्च कौशल्यप्राप्त तरुणांचे अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये होणारे स्थलांतर (Brain Drain) हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि बहुआयामी विषय आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात लागू झालेले कठोर आयात शुल्क धोरण आणि स्थलांतरितांविषयीचे बदललेले नियम यांमुळे हा मुद्दा जागतिक स्तरावर चर्चेत आला असला तरी, या स्थलांतराची मुळे भारतीय समाज, शिक्षण आणि अर्थव्यवस्थेतील काही मूलभूत समस्यांमध्ये खोलवर रुजलेली आहेत. यांपैकी… Continue reading संपादकीय : जानेवारी २०२६
व्हाईट मॅन्स बर्डन
हा शब्दप्रयोग इ.स. १८९८ मध्ये प्रसिद्ध ब्रिटिश लघुकथाकार, लेखक,पत्रकार व कवी रुडयार्ड किपलिंग याने केला. आपल्या सर्वांना माहिती असलेली जंगल बुक ही कथा त्याचीच आहे. या शब्दप्रयोगाचा किपलिंगला अभिप्रेत असलेला अर्थ असा आहे, की युरोपियन व अमेरिकन (फिलिपाईनच्या संदर्भात) वसाहत करणाऱ्या गोऱ्या लोकांच्या डोक्यावर नियतीने त्यांच्या निरनिराळ्या वसाहतीतील ‘सो कॉल्ड पागन’ लोकांना सुसंस्कृत करण्याचे ओझे ठेवले आहे. त्याचाच एक गर्भित… Continue reading व्हाईट मॅन्स बर्डन
मी, बाबा आणि रॅशनॅलिटी
अनंत माधव लिमये (१३.१.१९३४-८.२.२०२०) B.E.(Civil)यशवंत बर्वे आणि सतीश मराठे यांच्याबरोबर अनेक रस्ते, पूल आणि धरणांची निर्मिती. अलीकडे त्याच्या मजबूतीसाठी चर्चेत आलेल्या पुण्यातील चांदणी चौकातील पुलाची निर्मिती. हा पूल पाडण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त कष्ट पडले होते. सुरेश बापट यांच्याबरोबर expansion type foundation bolts चा कारखाना सुरू केला. Shakti fasteners या नावाने हा ब्रॅंड सुप्रसिद्ध झाला. त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्याबरोबरच ते एक विवेकवादी म्हणून … Continue reading मी, बाबा आणि रॅशनॅलिटी
झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.११
माझा कोकण दौरा छान चालला होता. नवीन रेल्वे मार्ग, नवा निसर्ग. रेल्वेचे तेच नियम; पण वेगळ्या पद्धतीची ‘अंमलबजावणी’ पाहत होतो. एक-एक स्टेशन कार्यान्वित करत करत मी उडुपीला पोहोचलो. संध्याकाळी काम झाल्यावर तेथील कृष्णमंदिरात जाऊन आलो. खूपच छान आणि प्रसन्न आहे. प्रसाद म्हणून पुजाऱ्याने मला मूर्तीवर लावलेल्या हळद आणि चंदनाच्या लेपाचा छोटासा गोळा आणि त्याच रंगाचा पेढा दिला. मी चुकून लेपाचा… Continue reading झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.११
अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(७)
आकाशवाणीचं हे …. ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च। वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’ (उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.) भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली. भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे… Continue reading अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(७)
कविता : जानेवारी २०२६
आयुष्य पुरेसे नाही आयुष्य ही परीक्षा सुटणार प्रश्न नाही उत्तरे शोधताना हे आयुष्य पुरणार नाही आलो इथे कशाला उद्दिष्ट काय आहे सत्य जीवनाचे हे कोणास ठाव नाही सुख लाटांच्या भरतीने चिंब जाहले अंग दुःखाच्या मानसिकतेचे रडगाणे संपत नाही चेहरा बघण्याआधी स्वच्छ कराव्या काचा आरसा कधी भिंतीचा खोटे बोलत नाही रेशमी बंध नात्याचे विस्कटले तुटले धागे जोडायचे कसे ते पुन्हा या… Continue reading कविता : जानेवारी २०२६
बरोबर आलेला पाढा…
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि शाहूपुरी यांनी एकत्र येऊन सातारा जिल्ह्यातील मुक्काम पोस्ट मर्ढे येथील बा. सी.मर्ढेकर यांच्या घराचे एका सुंदर स्मारकात रूपांतर केले. या गोष्टीला २९ जानेवारीला एक वर्ष होत आहे. त्या निमित्ताने… नव्या वर्षातला २९ जानेवारी(२०२४). स्थळ : मु.पो.मर्ढे. वेळ : हिवाळी दुपारची(पितात सारे गोड हिवाळा!). एक अतिशय सुंदर सोहळा अनुभवण्याचं भाग्य लिहिलं होतं सटवाईनं. मराठी कवितेला नव्या वळणावर… Continue reading बरोबर आलेला पाढा…
पुनरपि जननं : भाग ११
अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले. ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे : हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून… Continue reading पुनरपि जननं : भाग ११
ॲमेझॉनच्या जंगलात कॉप ३०
INECC (इंडियन नेटवर्क ऑन इथिक्स अँड क्लायमेट चेंज) हे वंचित समुदायांच्या दृष्टिकोणातून हवामान बदलाच्या (Climate Change) मुद्द्यावर एकत्र काम करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींचे एक राष्ट्रीय जाळे आहे. १९९६ साली भारतातील काही विकास व्यावसायिकांनी (Development Practitioners) याची सुरुवात केली. त्यांना हवामान संकट (Climate Crisis), शाश्वत विकास (Sustainable Development) आणि सामाजिक न्याय (Social Justice) यांतील असलेला थेट संबंध दिसला. हवामान बदल… Continue reading ॲमेझॉनच्या जंगलात कॉप ३०
काफ्काच्या दोन कथा – विषय आणि आशय
फ्रान्झ काफ्काने (१८८३-१९२४) १९२३-२४ च्या हिवाळ्यात दोन कथा लिहिल्या. ते त्याच्या जीवनातले अखेरचे दिवस होते. एकमेकांना बिजागराने जोडलेल्या दोन चौकटींत दोन चित्रं असतात तशा या द्विपुटचित्री कथा. काफ्काचा देहांत झाल्यानंतर मॅक्स ब्रॉड या त्याच्या मित्राने प्रकाशित केल्या. कोणत्या या कथा? कशाविषयी आहेत या कथा? ‘Josephine (the singer) or the Mouse Folk’ ही त्याची देहांतापूर्वीची शेवटची कथा.‘The Burrow’ ही जोसेफिनच्या आधीची… Continue reading काफ्काच्या दोन कथा – विषय आणि आशय
मन वढाय वढाय : विस्मरण ( Dementia )
मन वढाय वढाय या ‘मानसिक आरोग्य’ या विषयावरील लेखमालिकेतील पुढील लेख हा जरा वेगळ्या, काहीशा अपरिचित परंतु सध्याच्या घडीला अतिशय महत्त्वाच्या विषयावर आहे. Dementia म्हणजेच विस्मरण किंवा स्मृतिभ्रंश हा ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येणारा आजार! काही दिवसांपूर्वी जवळच्या एका खेडेगावातील सरपंचबाई मला भेटायला आल्या होत्या. त्या स्वतः पन्नाशीच्या आसपास होत्या आणि त्यांच्या सासूबाई ऐंशीच्या घरात. तर सासूबाईंना बरं वाटत नव्हतं. त्यांच्या… Continue reading मन वढाय वढाय : विस्मरण ( Dementia )
पुस्तक परीक्षण : जानेवारी २०२६
श्रेष्ठ नाटककाराची सार्थ ओळख शेक्सपिअर आणि त्याचा नाट्यसंसार ‘शेक्सपिअर आणि त्याचा नाट्यसंसार’ हे प्रदीप कुलकर्णी लिखित पुस्तक, मुंबईच्या मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची वेधक आणि सविस्तर प्रस्तावना लाभली आहे. त्यांच्या मते शेक्सपिअरचे महत्त्व जगातील तमाम सुसंस्कृत समाजाने अतिशय प्रगल्भपणे स्वीकारले आहे. शेक्सपिअरची अनेक वचने, सुभाषिते झाली आहेत. जगातील जवळजवळ सर्व भाषांमध्ये शेक्सपिअरची… Continue reading पुस्तक परीक्षण : जानेवारी २०२६
भारतीय शिल्पकला
भारतीय संस्कृतीत चौसष्ट कलांचा समावेश आहे. त्यांतील एक महत्त्वाची कला म्हणजे शिल्पकला होय. सध्याच्या काळात शिल्पकला काहीशी दुर्लक्षित वाटते. आपल्या सर्वांना सिंधू संस्कृतीची ओळख आहे. या संस्कृतीतील मोहेंजोदारो, हरप्पा ही नगरे व त्यांची आदर्श रचना आपणां सर्वांनाच माहीत असते. या नगरांच्या उत्खननात मिळालेली नर्तिका, दाढीवाला पुरुष यांसारख्या मूर्ती व या शहराची एकंदरीतच रचना व त्यातील वैशिष्ट्यपूर्ण स्नानगृहे शालेय जीवनात आपण … Continue reading भारतीय शिल्पकला
महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
श्रेयनामावली
मार्गदर्शक : भानू काळे
संपादक : अनिल जोशी
व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी
तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी
