अर्धभद्रक बंध

हा सर्वात अवघड बंध मानला जातो. 

छंद अनुष्टुभ (चाल : भीमरूपी महारुद्रा) 

नाना  वि  द्या  क था वा  क

ना ट्य  नि  वा  स्तुगा  न  वा

वि  नि  यो  गा    री  गा  था

द्या  वा  गा  जे  स    स्तु  

यामध्ये विविध विद्या,  विविध कलांनी आपलं जीवन कसं समृद्ध केलं आहे हा विचार मांडायचा प्रयत्न आहे. 

नाना विद्या, कथासौंदर्य, वाक (वाणी) नाट्य, वास्तुकला, गायन यांचा योग्य रितीने विनियोग केला तर द्यावा म्हणजे पृथ्वी आणि स्वर्ग निरंतर गाजत राहतात. सवस्तुक यातील वस्तुक म्हणजे रसत्व किंवा सत्त्व. सवस्तुक म्हणजे रसाळतेसह. कलांमुळे जीवन रसपूर्ण होते आणि पृथ्वी आणि स्वर्गही निनादत राहतो. 

वाचायची पद्धत

हा अर्धभद्रक बंध आहे. प्रत्येक ओळ सरळ – आडवी –  वाचता येते तशीच दोन अर्धुकांमध्येही वाचता येते. 

पहिल आडवी ओळ आहे :

नाना विद्या कथा वाक

उभी वाचली की

नाना विद्या 

हेच शब्द दिसतात. पुढचे 

कथा वाक हे शब्द 

सगळ्यात शेवटच्या ओळीतील शेवटच्या अक्षरापासून उलटे दिसतात.

दुसरी ओळ 

नाट्य नि वास्तु गान वा

ही ओळ आडवी वाचता येते, तशीच 

नाट्य नि वा डावीकडून दुसऱ्या उभ्या ओळीत दिसतं. पुढचा अर्धा भाग स्तु गा न वा शेवटून दुसऱ्या ओळीत खालून वर गेलेला दिसतो. 

तिसरी ओळ सरळ वाचली, की

विनियोगावरी गाथा अशी दिसते. 

तिसरी उभी ओळ विनियोगा एवढंच अर्धुक दाखवते. वरी गाथा हे उरलेलं अर्धुक शेवटून तिसऱ्या ओळीत खालून वर गेलेलं दिसतं. 

शेवटची ओळ आहे

द्यावा गाजे सवस्तुक

आडवी ओळ वाचता येते. उभ्या ओळीत द्यावा गाजे एवढंच दिसतं. सवस्तुक हे अर्धुक उजव्या बाजूने चौथ्या ओळीत खालून वर गेलेलं दिसतं. 

Author

Leave a Reply