डिसेंबर २०२५

मुखपृष्ठाविषयी : डिसेंबर २०२५ 

“The maple wears a gayer scarf, The field a scarlet gown.” – Emily Dickinson छायाचित्र : मिहीर जोशी  रेड मेपल (Red Maple – Acer rubrum) :  पूर्व उत्तर अमेरिकेतील एक मोठ्या प्रमाणावर आढळणारे झाड. हे झाड शरद ऋतूमध्ये आपल्या सुंदर, तेजस्वी लाल रंगाच्या पानांसाठी विशेष ओळखले जाते. हे रंग खूप आकर्षक आणि नेत्रदीपक असतात. शुगर मेपलएवढा नसला तरी, रेड मेपलच्या… Continue reading मुखपृष्ठाविषयी : डिसेंबर २०२५ 

संपादकीय : डिसेंबर  २०२५

 टेल्को परिवाराचे मैत्र  पूर्वी टेल्को या नावाने प्रसिद्ध असलेली टाटा समूहातील एक अग्रगण्य कंपनी आता टाटा मोटर्स नावाने ओळखली जाते. टेल्को हे नाव घेतले की आपल्याला अपरिहार्यपणे सुमंत मुळगावकर यांची आठवण होते. सुमंत मुळगावकर (जन्म : ५ मार्च १९०६, मृत्यू : १ जुलै १९८९) हे  दूरदृष्टीचे आणि देशाला स्वावलंबी बनवण्याचे स्वप्न पाहणारे उद्योजक होते. त्यांना विशेषतः ‘टाटा मोटर्सचे शिल्पकार’ म्हणून… Continue reading संपादकीय : डिसेंबर  २०२५

गुजरातेतील पुणे – वडोदरा

    सुरत ते वडोदरा अंतर साधारण दीडशे किलोमीटर आहे पण रस्ता खूप चांगला असल्याने आम्हाला ते अडीच-तीन तासांत कापता आले. पूर्वी या शहराला आपण मराठीत बडोदे म्हणायचो किंवा इंग्रजीत बरोडा म्हणायचे पण त्यालाच १९७४ साली वडोदरा हे शहराचे मूळ नाव परत एकदा दिले गेले. या शहरात पूर्वी बरेच वटवृक्ष होते आणि त्यावरून वडोदरा हे नाव पडले होते असे म्हणतात. पण अजूनही… Continue reading गुजरातेतील पुणे – वडोदरा

सर्वतोभद्र बन्ध 

सगळ्या बाजूंनी – म्हणजे डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, वरून खाली, खालून वर असा वाचला असता तसाच चरण येतो अशा काव्याला सर्वतोभद्र बंधकाव्य म्हणतात.भारवीने किरातार्जुनीयम् मध्ये या बंधाची रचना केली आहे. अतिशय अवघड असा हा बंध.या काव्यप्रकाराचा विचार करताना माणसाचा पैशाचा लोभ, माज यांचा विचार माझ्या मनात आला. ही वासना नासून जावी अशी प्रार्थना मनात आली.हवं हवं करून जमवलेल्या संपत्तीचा चांगल्या… Continue reading सर्वतोभद्र बन्ध 

झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.१०

माझ्या कामाची व्याप्ती वाढतच  होती. अधूनमधून मला कोकण रेल्वेलासुद्धा जावे लागायचे. त्या ठिकाणी आधीच OFC Cable घातली होती. नवीन उपकरणे बसवण्यासाठी मला  कोकण रेल्वेला जाण्याचा आदेश  नवी दिल्लीहून  निघाला. आता मी थेट  रेल्वे मंत्रालयाच्या अधीन होतो; कारण सोलापूर परिक्षेत्रात  पुणे ते वाडी   ह्या भागात  फक्त केबल  घालण्याचेच काम होते. बाकीचे सोपस्कार म्हणजे – केबल तपासणे, जोडणे, उपकरणे लावणे आणि… Continue reading झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.१०

अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(६) 

आकाशवाणीचं हे ….                                              ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।                                               वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’ (उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.) भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली.  भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे… Continue reading अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(६) 

कविता : डिसेंबर २०२५ 

सुख दुःख  दुःख एकटेच कोपऱ्यात बसलेले मी विचारले काय झाले? कुणी काही बोलले, रागावले? मनात विचार आला  दुःखालाही दुःख असू शकते की! आपल्याला कसे नाही कळले? त्याच्याच बाजूला सुख बसलेले प्रत्येकाला हवे असलेले  पण तेही हिरमुसलेले! मला वाटले याला काय झाले? मनात विचार आला  सुखाला सुखाचे अजीर्ण होऊ शकते की! आपल्याला कसे नाही कळले? Continue reading कविता : डिसेंबर २०२५ 

कॅनडातील बॅगपायपर 

नुकताच अमेरिकेत माझ्या मेव्हण्याच्या – (मकरंद गोखले) मुलीच्या लग्नाला अमेरिकेत गेलो होतो. त्याच्याकडे गेल्यावर प्रत्येक वेळी तो आम्हां सर्वांना अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागांत तिथल्या पद्धतीने रोडट्रीपला घेऊन जात असतो.या वेळी त्याला थोडा रजेचा प्रॉब्लेम होता त्यामुळे सलग मोठी ट्रीप करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याला आणि गेल्या तीन ट्रिप्समध्ये ओळख झाल्याने आम्हांलाही, बरेच दिवस बोलावणाऱ्या कॅनडामधील त्याच्या काही स्नेह्यांकडे जाण्याचे ठरले. ही सर्व… Continue reading कॅनडातील बॅगपायपर 

पुनरपि जननं : प्रकरण दहावे 

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.  ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे : हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून… Continue reading पुनरपि जननं : प्रकरण दहावे 

‘संस्कृति’कारण : मानसिक समाधानाचा मार्ग

मानवजातीच्या विकासप्रक्रियेत समाजाचं रूप सतत बदलत गेलं. अविकसित अवस्थेत माणसाचे प्रमुख प्रश्न होते : अन्न, निवारा आणि उपजीविका. जगण्यासाठी लागणाऱ्या या तीन गरजाच त्याच्या आयुष्याचं केंद्रबिंदू होत्या. संघर्ष होता फक्त अस्तित्व टिकवण्याचा. हे आदिमानवाच्या स्थितीचं वर्णन आहे का? नाही! अगदी स्वातंत्र्योत्तर भारतातही अनेक ठिकाणी हीच परिस्थिती दिसून येत होती. त्यांच्यासाठी जीवन म्हणजे फक्त ‘जगणं’ – एवढंच! हळूहळू भारतीय समाज विकासाच्या… Continue reading ‘संस्कृति’कारण : मानसिक समाधानाचा मार्ग

स्थलांतरित

विंदांच्या कवितेत ‘किती कठीण परदेशात पोहोचणे स्वदेशाचा त्याग केल्याशिवाय’ ही ओळ वाचली आणि ती विंदांनी माझ्यासाठीच लिहिली आहे असे मला वाटले. स्वदेश कधीतरी कुणी सोडतं का?…दिवाळीच्या पणतीकडे बघता-बघता माझ्या मनात विचार आला. ही पणती लागली होती माझ्या मैत्रिणीच्या घरी जिथे आम्ही नेहमीप्रमाणे दिवाळी पहाट साजरी करायला जमलो होतो. अर्थात आमच्या घरांमधली अंतरं बघता पहाटे येणं म्हणजे कसरतच झाली असती. म्हणून… Continue reading स्थलांतरित

तवाडा योको, जपानी – जर्मन लेखिका

  योको तवाडा (जन्म १९६०) या जपानी लेखिका सध्या बर्लिनमध्ये राहतात. यांचे हायस्कूलपर्यंत शिक्षण जपानमध्ये झाले. वयाच्या विसाव्या वर्षी त्या जर्मनीत स्थायिक झाल्या. उच्चशिक्षण जर्मनीत. ही माहिती नेटवरही मिळेल. मुख्य म्हणजे त्या जपानी आणि जर्मन दोन्ही भाषांत ललित तसेच वैचारिक लेखन करतात. मायबोलीव्यतिरिक्त दुसऱ्या भाषेत लिहिणारे लेखक-लेखिका पूर्वी होऊन गेले आहेत; पण योको तवाडा जपानी तसेच जर्मन भाषेत लेखन करतात आणि… Continue reading तवाडा योको, जपानी – जर्मन लेखिका

पुस्तक परीक्षण – डिसेंबर  २०२५

  दूरदृष्टीचा, समाजहितैषी     – :  र.धों.कर्वे  : – ‘ समाजस्वास्थ्य’कार, संततिनियमनाचे आद्य पुरस्कर्ते, र. धों.कर्वे, हे डॉ.अनंत देशमुख यांचे पुस्तक संधिकाल प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये अनंत देशमुख यांनी र.धों.कर्वे यांच्या, त्यांनी लिहिलेल्या तीन चरित्रांचे, अन्य उपलब्ध तीन चरित्रांशी तुलना करून, सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. या पुस्तकात एकूण अठरा प्रकरणे आहेत. शेवटी रघुनाथ कर्वे यांचा जीवनपट सविस्तरपणे  उलगडला आहे.  सूची… Continue reading पुस्तक परीक्षण – डिसेंबर  २०२५

प्रतिसाद – डिसेंबर  २०२५

‘अंतर्नाद’ मधील(नोव्हेंबर २०२५)  बेंगळुरू विषयीचा लेख आवडला. २० नोव्हेंबर १९९४ ते २१  फेब्रुवारी १९९५ असे तीन महिने अध्ययनासाठी मला या शहरातील एका नामांकित संशोधन संस्थेत काढावे लागले. तेव्हा हे शहर आजच्याइतके घाईगर्दीचे धावपळीचे नव्हते; तरीही त्याच्या उगवणे ते मावळणेचा एक दमदार फ्लेवर, दरवळ मनीमानसी दाटून राहिला. ‘अस्तिसूत्र’ या माझ्या दीर्घकथेत ते तपशिलात आले आहे. व्हाईटफिल्ड, केंपगौडाचे नंदीमंदिर, इंदिरानगर उडुपी कॅफे ही… Continue reading प्रतिसाद – डिसेंबर  २०२५

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

श्रेयनामावली 

 मार्गदर्शक : भानू काळे

 संपादक : अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी 

तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी

Author

Leave a Reply