सर्वतोभद्र बन्ध 

सगळ्या बाजूंनी – म्हणजे डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, वरून खाली, खालून वर असा वाचला असता तसाच चरण येतो अशा काव्याला सर्वतोभद्र बंधकाव्य म्हणतात.
भारवीने किरातार्जुनीयम् मध्ये या बंधाची रचना केली आहे. अतिशय अवघड असा हा बंध.
या काव्यप्रकाराचा विचार करताना माणसाचा पैशाचा लोभ, माज यांचा विचार माझ्या मनात आला. ही वासना नासून जावी अशी प्रार्थना मनात आली.
हवं हवं करून जमवलेल्या संपत्तीचा चांगल्या कारणासाठी विनियोग केला नाही, माझ्या आपमतलबी मनोवृत्तीमुळे, मी, मी, ‘माझं माझं’च्या नादामुळे दानावर बंधन घातलं… दान केलंच नाही तर काय उरेल? दातृत्वाला खीळ बसवली तर माझं माझं माझं माझं याशिवाय काहीही उरत नाही.
असा अर्थ असलेले सर्वतोभद्र बंधकाव्य रचण्याचा हा प्रयत्न.

सर्वतोभद्र बन्धकाव्य
छंद : अनुष्टुभ
( चाल : भीमरूपी महारुद्रा)
रचना : सुषमा जोशी

कविता डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे,
वरून खाली, खालून वर अशी वाचली तरी सारखीच वाचता येते.

हे वा दा म, म दा वा हे
वा स ना म म ना स वा
दा ना या म म या ना दा
म म म म म म म म
म म म म म म म म
दा ना या म म या ना दा
वा स ना म म ना स वा
हे वा दा म म ना वा हे


Author

One thought on “सर्वतोभद्र बन्ध ”

  1. फारच कठीण असा हा काव्यप्रकार आहे. उच्च मराठीतून शालेय शिक्षण घेऊन सुद्धा कधी हा काव्यप्रकार कानावर किंवा वाचण्यात आला नव्हता. इंग्रजीतील Palindrome नावाचा शब्दप्रकार जो हेन्री पिचमने सतराव्या शतकात प्रचलित केला तो सर्वतोभद्र बंधच्या मानाने खूपच सोपा आणि बाळबोध वाटतो.मराठी भाषेतील असे शब्दालंकार लोकांपर्यंत पोहोचविल्याबद्दल धन्यवाद.

Leave a Reply